RBI  esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: शरद पवारांची दिल्लीत बैठक ते राहुल गांधींचा उद्या फैसला, एका क्लिकवर वाचा प्रत्येक अपडेट

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालय उद्या निकाल देणार

मोदी आडनावावरून झालेल्या बदनामीप्रकरणी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळावी या मागणीसाठी गुजरात उच्च न्यायालय ७ जुलै रोजी निकाल देणार आहे.

पी. वासुदेवन यांची RBI च्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पी. वासुदेवन यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

मुंबई दि. ६ :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती म्हणून त्यांचा मुंबईतील पहिलाच दौरा आहे. आज त्यांनी श्री सिध्दिविनायक गणपती मंदिरात दर्शन घेतले आणि श्रींची आरती केली.

दिल्लीच्या बांधकामाधीन इमारतीचा एक भाग कोसळला, सर्च ऑपरेशन सुरू...

दिल्लीच्या दक्षिणपुरी येथील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या नानकी पब्लिक स्कूल जी-ब्लॉकजवळ एका बांधकामाधीन इमारतीचा एक भाग कोसळला. एकाला वाचवण्यात आले आहे. सर्च ऑपरेशन चालू आहे.

कारागृहातील विदेशी कैद्यांना व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध

कारागृहातील विदेशी कैद्यांना व्हिडिओ कॉलची सुविधा उपलब्ध

आपल्या परिजनांशी व्हिडिओ कॉल द्वारे साधू शकतील संपर्क

दोन आठवड्यातून एकदा पंधरा मिनिटे व्हिडिओ कॉल वर बोलण्याची मुभा

केंद्र शासनाने विकसित केलेल्या एन आय सी, ई- प्रिझंस प्रणाली द्वारे साधू शकतील संपर्क

सुरुवातीला विदेशी कैद्यांकडून कडून घेतले जाईल अंडरटेकिंग

पाकिस्तानी बांगलादेशी तसेच अतिरेकी कारव्यांखाली कारागृहात असलेल्यांना असलेल्या कैद्यांना ही सुविधा मिळणार नाही

अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांचा निर्णय

राहुल गांधी शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत

काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आहेत.

पुण्यात आरोपींची धिंड काढून कारवाई

पुणे पोलिसांकडून आता आरोपींची "धिंड" काढून कारवाई केली जात आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एकावर खुनी हल्ला करून तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला शोधून त्याची "परेड" काढण्यात आली.

काँग्रेस देखील भाजपला पाठिंबा देणार, अशोक चव्हाण म्हणाले...

मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या अटकळीवर, "ही अफवा आहे आणि ती कोणी पसरवली हे मला माहीत नाही, काही लोकांना माझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडत आहेत हे आवडत नाही. त्यांचा हा खोटा दावा आहे.

असं कोणतं संकट आलं की निष्ठा गहाण ठेवली?-रोहित पाटील

'वळसे पाटलांवर असं कोणतं संकट आलं की निष्ठा गहाण ठेवली?' असा सवाल रोहित पवारांनी ट्विटरवरून केला आहे. तर पटेल साहेबांना मतांचं मूल्य, साहेबांचं पितृतुल्य प्रेम कळलंच नाही असा टोला प्रफुल पटेल यांना लगावला आहे.

काँग्रेसबाबत भाजप चुकीची माहीती पसरवत आहेत- नाना पटोले 

काँग्रेसबाबत भाजप चुकीची माहीती पसरवत आहेत, भाजपला जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपला जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत- नाना पटोले 

भाजपला जनतेचे प्रश्न सोडवायचे नाहीत- नाना पटोले 

काँग्रेस मविआला सोबत घेऊन ताकदीने लढणार आहे.

काँग्रेसबाबत भाजप चुकीची माहीती पसरवत आहेत.

अपघातग्रस्तांचे अंत्यविधी सुरू असताना दुसरीकडे शपथविधी सुरू होता.

भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आहे

दुसऱ्यांची घर फोडण्याचं आयुध भाजपकडे आहे.

मणिपूरकडे पाहण्यासाठी भाजपकडे वेळ नाही. दुसऱ्यांची घर फोडण्यासाठी वेळ आहे.

लेशपाल जवळगे, हर्षद पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट

लेशपाल जवळगे, हर्षद पाटील मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सदर प्रसंगी आमदार मा.अजय चौधरी, उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप गालिंदे,प्रतिक गालिंदे,गौरव नवले,जय गालिंदे उपस्थित होते.

कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीची कॉलेज मध्येच काढली धिंड

कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीची कॉलेज मध्येच धिंड काढली आहे. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या टोळक्यावर पोलिसांकडून कारवाई केली आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेज मधील विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या या ९ जणांची पोलिसांनी धिंड काढली.

विद्यार्थ्यांना धमकावणे तसेच त्यांच्याकडून पैश्याची मागणी करणे असे कृत्य ही टोळी काही दिवसांपासून करत होती. यातील २ जण हे त्याचं महाविद्यालयात शिकायला आहेत. पोलिसांनी कारवाई करत या सगळ्यांना अटक केली असून त्यांची वरात काढण्यात आली. सदाशिव पेठ प्रकरणानंतर आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहेत.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल 

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू मुंबईत दाखल झाल्या आहेत. मुंबई विमानतळावर राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसेंच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसेंच्या भेटीनंतर संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मनसे आणि ठाकरे गट एकत्रित येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे दिसुन येत आहे.

संजय राऊत यांच्या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवतीर्थवर दाखल 

संजय राऊत यांच्या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.संजय राऊत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? घडामोडींना वेग

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे

समरजित घाटगे यांचं आज कागलमध्ये शक्तीप्रदर्शन; मुश्रीफांना मंत्रीपद दिल्याने घाटगे नाराज

समरजित घाटगे यांनी आज कागलमध्ये शक्तीप्रदर्शन केलं आहे. हसन मुश्रीफांना मंत्रीपद दिल्याने घाटगे नाराज आहेत. अशा चर्चा सुरू आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने दिली समीर वानखेडेंना याचिकेत बदल करण्याची परवानगी

IRS अधिकारी समिर वानखेडे भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना याचिकेत बदल करण्याची परवानगी दिली आहे. कॉर्डेलीया क्रुझ ड्रग्स प्रकरणी लाच देणाऱ्याला आरोपी वानखेडे यांची मागणी आहे, या मागणीसाठी याचिकेत बदल करण्याची वानखेडे यांना परवानगी दिली आहे.

या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यनवर कारवाई न करण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आहे. लाचखोरी प्रकरणात लाच घेणारा तसेच देणारा दोघेही आरोपी वानखेडे यांच्या वकिलांचा दावा आहे. मात्र सीबीआयने फक्त कथित लाच घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे तर लाच देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची वानखेडे यांची मागणी आहे. वानखेडे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी वानखेडे उच्च न्यायालयात गेले आहेत.

 वणीमध्ये स्कुल बसला भीषण अपघात 

 वणीमध्ये स्कुल बसला भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये ३० ते ४० विद्यार्थी होते. ते थोडक्यात बचावले आहेत.

मागील २४ तासात मुंबईत झालेल्या पावसाची नोंद

मुंबई शहर- ५४.२८ मिमी.

पूर्व उपनगरे- ५१.८५ मिमी.

पश्चिम उपनगरे- ४८.०७ मिमी.

मंत्रिपदाच्या पदावरून शिंदे गटाचे दोन आमदार भिडले; CM शिंदेंनी केला हस्तक्षेप

एकनाथ शिंदे गटात नाराजीचे सुर दिसून येत आहेत. अशातच आता दोन आमदार एकमेकांमध्ये भिडल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना गडचिरोली दौरा रद्द करावा लागल्याचं समोर येतंय. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिलं आहे. मंत्रिपद मिळालेला एक आणि मंत्रिपद न मिळालेला एक गट एकमेकांसमोर आले होते. मंगळवारी दोन आमदार एकमेकांना भिडल्याचं सांगण्यात येतंय.


दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर बॅनरवरती गद्दार असा उल्लेख

दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गद्दार असा उल्लेख असणारे बॅनर लावण्यात आले होते. आज दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत असणार आहेत.


दिल्ली नगरपरिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स हटवले

नवी दिल्ली नगरपरिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढले.

दरम्यान, शरद पवार हे त्यांच्या निवासस्थानावरून दिल्लीला रवाना झाले असून तेथे आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या होत्या.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

SCROLL FOR NEXT