mohan bhagwat esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या अस्मितेवर प्रश्न निर्माण झाल्यास संघाचे कार्यकर्ते प्राणांची आहुती देतील- सरसंघचालक मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, "संघाच्या परंपरेत, जर देशाच्या अभिमानावर आणि राष्ट्रीय ध्वजावर कोणताही प्रश्न निर्माण झाला तर संघाचे कार्यकर्ते प्राणांची आहुती देण्यात सर्वात पुढे असतील."

आशियान परिषदेत सामील होण्यासाठी पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला रवाना

आशियान (ASEAN) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जकार्तासाठी रवाना झाले आहेत.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे- आरबीआय अध्यक्ष शक्तीकांत दास

आरबीआयचे अध्यक्ष शक्तीकांत दास म्हणाले की, "भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे."

तृतीयपंथींना ओबीसीतून प्रवर्गातून मिळणार आरक्षण, महिन्याला मिळणार १००० रुपये

ओबीसी प्रवर्गात ट्रान्सजेंडरचा समावेश करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आरक्षणाच्या कोणत्याही श्रेणीत समाविष्ट नसलेल्या ट्रान्सजेंडर्सना ओबीसी यादीमध्ये रिक्त अनुक्रमांक 46 वर समाविष्ट केले जाईल. दुसर्‍या प्रस्तावानुसार, मुख्यमंत्री राज्य सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत, ट्रान्सजेंडर्सना प्रति महीना 1000 रुपये दिले जातील- झारखंड कॅबिनेट सचिव वंदना डडेल

अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे यांनी पुन्हा घेतली जरांगेंची भेटी

मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. यावेळी जरांगे काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.

मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरु

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. त्यांच्या उपोषणाचा हा ९वा दिवस आहे.

ठाकरे गटाच्या नगरसेवकाला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप असेलल्या महिलेचा जामीन कोर्टानं फेटाळला

ठाकरे गटाचे माजी नगरसेवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या महिला वकिल निलीमा चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला होता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

कुर्ला जी आर पीने मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवर नीलिमा चव्हाण यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आपल्यावरील आरोप अत्यंत अस्पष्ट असल्याचा दावा अटकपूर्व जामीनाच्या अर्जामध्ये करण्यात आला होता. १ सप्टेंबरला घाटकोपर स्थानकाजवळ मोरे यांनी ट्रेन खाली येत आत्महत्या केली होती.

मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरु

मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे.

केंद्र सरकारकडून उर्जा  साठवणूक प्रकल्पासाठी ३७६० कोटी रुपये मंजूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी घोषणा केली आहे की उर्जा साठवणूक प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून ३७६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

गृहमंत्री अमित शाहांनी घेतली रामनाथ कोविंद यांची भेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' बाबत कमिटीची आज पहिली बैठक होत आहे

जर उत्तर कोरियाने रशियाला हत्यारं दिली, तर त्यांना याची किंमत चुकवाली लागेल- अमेरिका

काही दिवसांपुर्वी उत्तर कोरिया आणि रशियाच्या राष्ट्रपतींमध्ये भेट झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर अमेरिकेकडून कोरियाला धमकी देण्यात आली आहे. जर उत्तर कोरियाने रशियाला हत्यारं दिली, तर याची किंमत त्यांना चुकवावी लागेल,

ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यानंतर बोलताना नेते अंबादास दानवेंनी या भेटीबाबत माहिती दिली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारासंदर्भात नेत्यांनी राज

राज्य सरकारच्या मंंत्रिमंडळ बैठक दोन तासांपासून सुरू

राज्य सरकारच्या मंंत्रिमंडळ बैठक दोन तासांपासून सुरू आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या मंंत्रिमंडळाला बैठकीला सुरूवात

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरूवात झाली आहे. यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळणार दिलासा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत बटन दाबून वितरित केला जाणार आहे. प्रती क्विंटल साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांना समुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून तीन लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींच सानुग्रह अनुदान वितरित होणार आहे. काही शेतकऱ्यानी ऑफलाईन अर्ज केल्याने त्यांना दुसरा हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

नवी मुंबईत खारघरमध्ये बसला भीषण आग; जीवितहानी नाही 

नवी मुंबईत खारघरमध्ये बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आलं आहे.

वसईच्या सातिवली पुलावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

वसईच्या सातिवली पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ६ वाजता हा अपघात झाला आहे.

मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. काही समाज कटंकांकडून जरांगे यांना धोका असू शकतो त्यामुळे जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरूणकुमार सिन्हा यांचे निधन 

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे संचालक अरूणकुमार सिन्हा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी गुरुग्राम मधील खासगी रुग्णालयात त्याचं निधन झालं आहे. 2016 पासून SPG चे प्रमुख म्हणून काम केलं होतं.

संभाजीनगर देवगाव येथे रास्तरोको आंदोलन

संभाजीनगर देवगाव येथे रास्तरोको आंदोलन केलं आहे. जालन्यातील लाठीचार्जचा निषेध व्यक्त करण्यासाठी याठिकाणी रास्तरोको करण्यात येत आहे.

सनातन धर्माबद्दल टिप्पणी भोवणार! उदयनिधी स्टॅलिन,  प्रियांक खरगेंविरोधात गुन्हा दाखल

वकिलांच्या तक्रारीनंतर तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये 'सनातन धर्म' याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राजकीय पराभवाच्या भीतीमुळे सरकार देशाचं नाव बदलत असल्याचा संजय राऊतांचा आरोप

सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे? अनन्यसाधारण परिस्थितीत अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? भाजप चा निरोप समारंभ आहे.नक्की काय अजेंडा आहे.हे काय सुरू आहे देशात? देशात मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून सरकारला भीती वाटत आहे घटनेतील नावाबद्दल भीती वाटत आहे. राजकीय पराभवाच्या भीतीमुळे सरकार देशाचं नाव बदलत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल

मराठा आरक्षणासाठी मागील ९ दिवसांपासून मनोज जरांगे उपोषण करत आहेत. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान आज (बुधवार) मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून डॉक्टरांचे पथक आंदोलनस्थळ दाखल झाले आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बाॅम्ब स्फोट करणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्यास अटक

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला नागपाडा या ठिकाणी बाॅम्ब स्फोट करणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दिलीप राऊत असे या आरोपीचे नाव आहे. राऊत याच्या अफवेच्या फोनमुळे पोलिस कामाला लागले. मात्र सत्यता पडताळली असता काहीही आढळून आलं नाही. खोडसाळ वृत्तीतून हा फोन केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी काॅलरचा नंबर ट्रेस केला असता नायर रुग्णालय परिसरात आरोपी दिलीप याला पोलिसांनी अटक केली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : छगन भुजबळ यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT