NDA meeting 
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Updates: जाणून घ्या दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

रोहित कणसे

बैठकीसाठी पंतप्रधान मोदी दाखल

एनडीएच्या महाराष्ट्र सदनातील महाराष्ट्रातील खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. याआधी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र सदनात पोहोचले होते.

बैठकीसाठी आलेले नेते आणि खासदार  

हिना गावित, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि रामदास आठवले

NDA Meeting : राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल बैठकीसाठी पोहोचले

NDAच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदारांची आज बैठक होत आहे. 8.30 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील खासदार दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात पोहोचायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदारांसोबत 'डिनर डिप्लोमसी' होत आहे.

हरयाणाच्या नूह जिल्ह्यात इंटरनेट सेवा ११ ऑगस्टपर्यंत बंद

हरयाणात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये नूंह जिल्ह्यात प्रामुख्यानं जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. याच नूह जिल्ह्यात सध्या इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. ११ ऑगस्टपर्यंत ही सेवा पुढे स्थगित राहिलं असं हरयाणा सरकारनं अधिकृत निवेदन काढलं आहे.

बकवास सुरू आहे, त्यावरच देश चालतोय - नेमाडे

माहीत नसणं आणि जास्त बोलणं हे सध्या सुरु आहे. यातून कसा मार्ग काढावा हा एक प्रश्नच आहे. सध्या सगळीकडं बकवास सुरू आहे, त्यानुसारच देश चालतोय असं वाटतंय, असं विधान ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. मुंबईत रविंद्र नाट्यगृह इथं एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नेमाडे बोलत आहेत.

महिला अत्याचारांसदर्भात राजस्थान सरकारनं उचललं मोठं पाऊल!

राजस्थानातील गेहलोत सरकारनं महिला अत्याचारांसदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिला छेडछाड आणि अत्याचार प्रकरणांमध्ये आरोपींना सरकारी नोकरीसाठी प्रतिबंध करण्यात येणार आहे. अशा आरोपींचं पोलीस ठाण्यांमध्ये रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

देशात ७ ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

देशातील ७ मतदारसंघांमध्ये विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे. पण लोकसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळं पुण्यात गरीष बापट आणि चंद्रपूरमध्ये सुरेश धानोरकरांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार नाही.

मालाड, कांदिवली, चारकोपमधील कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे

मालाड, कांदिवली, चारकोपमधील सेनेचे कार्यकर्ते नाराज असल्यानं त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडं तक्रार करत आपले राजीनामे सादर केले आहेत.

सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, अल्पवयीन मुलासह दोघांना अटक

सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील मानखुर्द इथं हा प्रकार घडला होता. याप्रकरणी कलम ३७६ ड आणि पॉक्सो अंतर्गत ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलाला डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील काही पक्ष आमच्यासोबत येतील, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वडेट्टीवारांची चर्चा

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीचे नियोजन करण्यासंदर्भात त्यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली. आज संध्याकाळी पुन्हा बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष आमच्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला. मल्लिकार्जुन खर्गे यांची यासंदर्भात यावरही चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अधिकारी मारहाण प्रकरणात बच्चू कडूंच्या अडचणींमध्ये वाढ

मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण केलेल्या प्रकरणात आमदार बच्चू कडूंच्या अचडणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येतंय. सत्र न्यायालयात साक्षीदार तपासणीस सुरुवात झालेली असून मारहाण केलेल्या अधिकाऱ्याची साक्ष नोंदवली आहे. पुढील सुनावणीवेळी कोर्टात हजर होण्याचे आदेश कडूंना दिले आहेत.

 भाजपच्या 'त्या' खासदाराचं लोकसभा सदस्यत्व अबाधित राहाणार, कोर्टाने शिक्षेला दिली स्थगिती

भाजप खासदार कथेरिया यांना शनिवारी 2011 मध्ये वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आग्रा येथील न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. टोरेंट पॉवर कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 2011 मध्ये कथेरियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानंतर त्यांची खासदारकी धोक्यात आली होती.

दरम्यान आता भाजप खासदार राम शंकर कथेरिया यांच्या शिक्षेला आता आग्रा कोर्टने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व अबाधित राहणार आहे.

केरळ विधानसभेत UCC विरोधात एकमताने ठराव मंजूर 

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज केरळच्या विधानसभेत समान नागरी संहितेच्या विरोधात ठराव मांडला. त्यानंतर हा ठरवा एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी 'एडलवाईज'च्या २ अधिकाऱ्यांची आज होणार चौकशी

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आरोप असलेल्या एडलवाईज कंपनीच्या २ वरीष्ठ अधिकाऱ्यांना खालापूर पोलिसांनी चौकशीला बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करता बोलावले असून आज दुपारी ३ वाजेपर्यंत कंपनीचे २ वरीष्ठ अधिकारी चौकशीला हजर राहणार आहेत.

बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेतला संप मागे घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य होताच संप मागे घेण्यात आला आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

असंसदीय वर्तनासाठी टीएमसीचे खासदार निलंबित

राज्यसभा सभापतींनी डेरेक ओ ब्रायन यांना चालू सत्राच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे. सभागृहात असंसदीय वर्तनासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पियुष गोयल यांनी प्रस्ताव मांडला होता.

काही काळाच्या बिघाडानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत

चर्चगेट स्थानकावर सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यामुळे चर्चगेटवरुन सुटणाऱ्या लोकल काही काळ खोळंबल्या होत्या. दरम्यान सकाळी ८.५० वाजता झालेला बिघाड ९.२२ वाजता दुरुस्त करण्यात आला असून सध्या पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

 अविश्वास प्रस्तावावरील चर्चेपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक

संसदेतील राज्यसभा विरोधीपक्ष नेत्याच्या कार्यालयात इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. यापार्श्वभूमिवर इंडिया आघाडींच्या नेत्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित आहेत. लोकसभेत आजपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होणार आहे.

महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची आज PM मोदींसोबत बैठक

महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. या पार्श्वभूमिवर आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे.

सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करम्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे.

मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. लँडलाईवर फोन करून एक-दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी देण्यात आली. या फोननंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

Latest Marathi News Updates live : राहुल गांधींची थोड्याच वेळात सभा

'सिंघम अगेन'मध्ये झळकतायत एक दोन नाही तर तीन मराठी कलाकार; एकाला तर दीपिकाने ऑनस्क्रीन धुतलाय

IPL Mega Auction 2025 : लिलावात Unsold राहण्याची भीती; पृथ्वी शॉ अन् सर्फराज खान यांनी घेतला मोठा निर्णय, सर्वांना वाटले आश्चर्य

SCROLL FOR NEXT