हिमाचल प्रदेशच्या शिमला येथील कलगा गावात मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली.
परभणी अपघाता प्रकरणी पीडितांना ५० लाख रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहेत. मुंबईतल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या आशीर्वादाने सरकारकडे पैसे येत आहेत. कारण आमची नियत साफ आहे. लेने वाले घरी बसले आहेत आणि आत्ता फिरत आहेत, असं फिरणं तब्बेतीसाठी चांगलं आहे, असा टोमणा त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुस्लिम सामाजातील ३०० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे...
युती सरकार सत्तेत आल्यानंतर एवढा मोठा मुस्लिम समाजाचा मेळावा पहिल्यांदाच होत आहे
सईद खान मेहनत करणारा नेता आहे
३०० पदाधिकारी आलेले आहेत तसेच वकिल आणि डॉक्टर्स यांचं शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे
काँग्रेसचे लोक भीती पसरवतात की शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात आहेत
पण जोवर जवळ येणार नाही तोवर कसं समजणार?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत अनेक मुस्लिम समाजाची लोकं होती.
उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळच्या भाषणावेळी काही कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी मागणी केली.
दिल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
हार्बर लाइन वरील कुर्ला ते वाशी दरम्यान चा मेगा ब्लॉक काही तांत्रिक कारणांमुळे तास ते दीड तास इतका वाढवण्यात आला आहे.
सकाळी 11 वाजता सुरू झालेला मेगा ब्लॉक संध्याकाळी चार वाजता हा संपणार होता मात्र काही वाढीव कामामुळे साधारण तास ते दीड तास हा मेगाब्लॉक वाढवण्यात आला.
पुढील पाच ते दहा मिनिटात मेगा ब्लॉक संदर्भातील सर्व कामकाज पूर्ण होत असून हार्बर लाइन मधील लोकल रेल्वे सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
रायगडच्या आंबेनळील घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीय.
उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून पोहरादेवी येथे दर्शन घेऊन ते दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
इथून सुरूवात करण्यामागं पोहरादेवीचं दर्शन घ्यायचं माझ्या मनात होतं. जाहीर सभा झाल्या त्यापैकी एखादी सभा इकडे घ्यायची होती पण उन्हामुळे त्या पुढे ढकलल्या. पोहरादेवीचं दर्शन घेण्याचं माझ्या मानात होतं म्हणून महाराष्ट्र दोऱ्याची सुरूवात येथून केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा विदर्भ दौरा सुरू झााल असून ठाकरे यवतमाळला पोहचले आहेत. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
शरद पवार यांच्या येवला येथील कालच्या सभेचं नियोजन ज्यांनी केलं होतं ते माणिकराव शिंदे यांची शिस्तभंग केल्यावरून पक्षाने जानेवारी २०२० साली हकालपट्टी केली आहे. दोन महिने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली होती, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे.
काढलं त्यांचं पक्षासाठी काही योगदान नाही. येवल्यासाठी देखील काहीच योगदान नाही. पण दुसरे कोणी भेटले नाहीत तर त्यामुळे त्यांचं सहकार्य घेतलं असे भुजबळ म्हणाले.
उद्धव ठाकरे आज वाशीम येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दोऱ्याची सुरुवात करत आहेत. दरम्यान या दौऱ्याच्या निमीत्ताने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दौऱ्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साधारणतः तीनशे पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
सध्या अजित पवार यांचं बंड आणि आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्यानं होणार असून उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.