इम्रान खान समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने निदर्शना दरम्यान आंदोलकांवर गोळीबार केला. गोळ्या लागल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
श्रद्धा हत्या प्रकरणाध्ये आता आफताब पूनावाला याच्यावर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत. येत्या १ तारखेपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होत आहे. खून करुन पुरावे नष्ट केल्याच्या गंभीर आरोपाखाली आफताब पूनावाला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद कोर्टात हजेरी न लावल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले. आता त्यांच्या पत्नीवरही अटकेची टांगती तलवार आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद कोर्टात हजेरी न लावल्यामुळे त्यांना अटक करण्यात आले आहे.
पुण्यातील विमाननगर येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
मी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काही बोलणार नाही. आमदारांवर केवळ विधानसभा अध्यक्ष कारवाई करू शकतात असं नार्वेकर म्हणालेत. तर दौऱ्यावर बोलताना म्हणाले की, माझा लंडन दौरा पुर्वनियोजित आहे. ११ मेला मी ब्रिटनला जाणार आहे. लंडन दौऱ्याचा कोर्टाच्या निकालाशी संबध नाही. आमदारांवर केवळ अध्यक्ष कारवाई करु शकतात. पुढील सर्व गोष्टी न्यायालयाच्या निकालावर अवलंबुन आहेत.
केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे. सत्य परिस्थिती केरळची वेगळीच आहे. परदेशातून भारतात येणारा जो पैसा आहे त्याच्यातील 36 टक्के पैसा हा केरळचे नागरिक पाठवतात. मागच्या वर्षी त्यांनी 2.36 लाख कोटी रुपये पाठवले. केरळचा साक्षरतेचा दर 96 टक्के आहे. जो भारताचा 76 टक्के आहे. केरळमध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणारी लोक ही 0.76 टक्के आहेत. देशामध्ये ती 22 टक्के आहे. बालमृत्यूचे प्रमाण केरळमध्ये 6 टक्के आहे. आसाममध्ये 42 टक्के आहे आणि उत्तरप्रदेश मध्ये 46 टक्के आहे. केरळचे दरडोई उत्पन्न हे भारताच्या 7 टक्के अधिक आहे. त्या चित्रपटामध्ये जी 32 हजार महिलांची कथा सांगितली गेली, त्याबद्दल स्वतः चित्रपटाचा प्रोड्यूसर म्हणतो की ही कथा फक्त 3 महिलांची आहे. चित्रपट चालवा यासाठी 32 हजार महिला सांगितल्या होत्या. म्हणजे एकंदरीत काय तर आपल्या महिला भगिनींची बदनामी करायची. आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत त्यांना काही समजतच नाही त्या वाटेल तश्या वागतात असे प्रदर्शित करायचं आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिला ह्या गौण आहेत असं चित्र उभं करायचं. हेच केरळ वर आधारीत चित्रपटाच खरं सत्य आहे. असत्याच्या आधारावर हिंसा, द्वेष निर्माण करायचा आणि त्याच माध्यमातून पुढे निवडणूका जिंकायच्या हे गणित लावूनच असे चित्रपट काढले जातात.
- जितेंद्र आव्हाड ट्विट
मुंबई गोवा महामार्गावर महाड शहराजवळ नाते खिंड येथे ST बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात बसचे फार मोठे नुकसान झाले असून ST मधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखंमींवर महाडच्या ग्रामिण रुणालयामध्ये उपचार सुरु आहेत.
पुलावरून बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात तब्बल 15 जण ठार झाले आहे तर 25 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशीतील खरगोनमध्ये हा अपघात घडला असून बचाव कार्य सुरू आहे.
द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या क्रू मेंबरला अनोळखी नंबरवरून धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी याबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून चित्रपटातील कथा दाखवून तुम्ही चांगली गोष्ट केली नाही, त्यामुळे घराबाहेर एकटं पडू नका, अशी धमकी क्रू मेंबरला देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली आहे
परशुराम घाटात दरड कोसळली आहे. पहाटेपासून अनेक प्रवासी ताटकळत आहेत. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटे पडलेल्या जोरदार पावसामुळे दरड माती खाली आली आहे. पर्यायी मार्गाने लोटे-चिरणी-कळंबस्ते - चिपळूण मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. सध्या राज्यात बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाले आहेत
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.