Rahul Narvekar Latest Marathi News  Esakal
महाराष्ट्र बातम्या

LIVE Marathi News Updates : नार्वेकरांची सेंट जॉर्ज रुग्णालयाला अचानक भेट, दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांची कानउघडणी

सकाळ डिजिटल टीम

नार्वेकरांची सेंट जॉर्ज रुग्णालयाला अचानक भेट, दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांची कानउघडणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणची दुरावस्था उघड झाली. यावरुन नार्वेकरांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

नार्वेकरांची सेंट जॉर्ज रुग्णालयाला अचानक भेट, दुरावस्था उघड

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयाला सरप्राईज भेट दिली. यावेळी रुग्णायलयाची दुरावस्था उघड झाली.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसकडून मध्यप्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्याच्या भेटीला

विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपुत प्रकरणात आदित्य ठाकरेंकडून कव्हेट दाखल करण्यात आला आहे.

पुणे पोलीस मागणार ललित पाटीलचा ताबा

ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला आज सकाळी चेन्नई येथून मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. आता पुणे पोलिसांकडून ललितचा ताबा मागितला जाणार आहे.

रश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीची आरती

रश्मी ठाकरे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या देवीची आरती करण्यात आली.

रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल, ठाण्यात टेंभी नाक्याच्या देवीचं घेणार दर्शन

रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्या टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेतील.

राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती

पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाशा पटेल हे भाजप नेते आहेत.

 ठाकरे गटाच्या डोंबिवली जिल्हाप्रमुखांचा राजीनामा; म्हणाले, माझ्याकडून

डोंबिवली : उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख (कल्याण लोकसभा) सदानंद थरवळ यांनी राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र देत त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यानंतर ते शिवसेना (शिंदे गटात ) जाणर असल्याची चर्चा आहे.

माझ्याकडून अपेक्षीत काम होत नसल्याचे वाटते, म्हणून राजीनामा दिला असी प्रतिक्रिया सदानंद थरवळ यांनी दिली आहे. थरवळ यांचे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

दिल्लीत अजित पवार गटाच्या नव्या कार्यालयाचे प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत त्यांच्या पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले.

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत आठ ठिकाणी छापेमारी

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील अंदाजे आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

हातकणंगलेमधून जयंत पाटलांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी

हातकणंगलेमधून जयंत पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. तर कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभानिहाय आढावा बैठकीत पदाधिका-यांची शरद पवारांकडे एकमुखाने ही मागणी करण्यात येत आहे. दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असून मविआच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच घेण्याची पदाधिका-यांची विनंती आहे.

ललित पाटील अटकेनंतर मुंबई पोलिसांच्या पत्रकार परिषद सुरू

मुंबई पोलिसांच्या पत्रकार परिषदेला सुरवात झाली असून ड्रग्ज केसमध्ये १५ वा आरोपी ललीत पाटील याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक मधून १५० कोटी रूपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. सत्यनारायण चौधरी सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

दिल्लीत एका कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील बवाना भागात एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ड्रग माफिया ललित पाटील याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी त्याला अटक केल्यानंतर काही वेळापूर्वी अंधेरी कोर्टात सादर करण्यात आलं.

पोलीसांनी ललित पाटील याला केलं अंधेरी कोर्टात हजर

मुंबई पोलीसांनी अटक केलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी HBT ट्रॉमा केअर रुग्णालय मध्ये नेण्यात आले . त्यानंतर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले

ललीत पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी; रोहित पवारांची मागणी

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान ललीत पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे. मुद्दा आज अटक झाली की काल झाली यापेक्षा ज्या दिवशी जी घटना घडली त्यावेळेस कारवाई करणं महत्त्वाचं होतं. त्यांच्यासाठी कोणाचा फोन आला हे सांगण्याची गरज आहे, शहानिशा करण्याची गरज आहे. नेतेच पाठराखण करत असतील तर चुकीचा आहे

त्याला सोडण्यासाठी कोणाचा फोन आला होता हे पुढं येणं महत्त्वाचं आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे, अशा मुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जातेय. एका एका पिढीला अशी चोर लोक बरबाद करतात. त्यामुळे यासाठी न्यायालयीन चौकशी होणे गरजेचं आहे असेही रोहित पवार म्हणाले.

चिपळूण येथील 'त्या' कोसळलेल्या पुलाची उद्योग मंत्र्यांकडून पाहणी

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे बहादुरशेख नाका चौकातील कोसळलेल्या पुलाची आज पाहणी केली. तांत्रिक अडचणींमुळे पुलाचा काही भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती असून त्रिसदस्यीय समिती याप्रकरणाची चौकशी करुन अहवाल देतील,असं स्पष्ट केलं. या प्रकरणी कोणीही दोषी आढळलं, तरी कारवाई केली जाईल अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक्सवरील पोस्टमधून दिली आहे.

 अंबाबाईसाठी शालू डोक्यावर घेऊन नार्वेकर मंदिरात दाखल

कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात उद्धव ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर प्रथेप्रमाणे तिरूपती देवस्थानाकडून शालू घेऊन दाखल झाले आहेत. नार्वेकर हे तिरूपती देवस्थानाचे ट्रस्टी आहे.

बांगलादेशातील बॉम्बस्फोटातील आरोपीला पुण्यात अटक

पुणे पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर कमरूल मंडल याला अटक केली आहे. कमरूल मंडल हा बांगलादेशातील बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. याने बेनापोल येथे हातबॉम्ब टाकल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटल्यावर त्याने विनापरवाना भारतात प्रवेश केला. तसेच त्याने पुण्यातून बनवट भारतीय पासपोर्ट मिळवल्याची माहिती पुण्यातील हडपस पोलिसांनी कोर्टात दिली आहे.

अखेर ललित पटील पोलिसांच्या जाळ्यात

पुण्यातील ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपासून ललित पाटील फरार होता. त्याच्या तपासासाठी १० पोलीस पथके नेमण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला चेन्नईतून अटक केली आहे. आज दुपारी ललितला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाणार आहे. दरम्यान याप्रकरणी थोड्याच वेळात मुंबई पोलिस पत्रकार परिषद घेणार आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT