दिवसा जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनासंसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने सोमवारपासून नवे निर्बंध लागू केले आहेत. राज्यभरात नाईट कर्फ्यू लागू होणार असून दिवसा जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमावलीबाबत जाणून घेऊया...(new corona rules in maharashtra)
1. वर्क फ्रॉम होम कोणाला?
खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम करण्यात आले असून, ५० टक्क्यांपेक्षा अधिक जणांना परवानगी नाही. २४ तास सुरू राहणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणले जातील.
2. शाळा, महाविद्यालये सुरू राहणार का?
शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून, पुढील परिस्थितीनंतर त्याचा निर्णय होणार आहे.
3. परीक्षार्थींना प्रवास करता येईल?
एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा आहे.
4. सार्वजनिक वाहतुकीची सुविधा आहे का?
सार्वजनिक वाहतूक (एसटी, पीएमपी) सेवा सुरू राहणार असून, दोन डोस घेतलेल्यांना या वाहनांतून प्रवास करता येणार आहे. लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत.
5. आंतरराज्यीय प्रवासाचे काय?
राज्यात प्रवेश करायचा असेल तर दोन्ही डोस अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे.
6. मॉल सुरू राहणार आहेत का?
तुम्हाला मॉलमध्ये खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. मात्र त्यासाठी तुमचे दोन्ही डोस झालेले असावेत. मॉल ५० टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहेत. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत ते बंद राहतील.
7. हॉटेल, रेस्टॉरंट बंद असतील का?
नव्या नियमावलीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला दिलासा मिळाला असून, सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालविता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश असणार आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांचे लसीकरण अनिवार्य आहे.
8. क्रीडा स्पर्धा सुरू राहतील का?
नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. खेळाडूंना बायो बबलमध्ये राहावे लागणार आहे. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.
9. अंत्यविधीसाठी किती लोक असावेत?
अंत्यविधीसाठी केवळ २० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी टाळावी.
10. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात किती लोक असावेत?
लग्नासाठी ५० लोकांनाच उपस्थित राहता येईल. इतर कार्यक्रम म्हणजेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांमध्येही ५० लोकांची मर्यादा.
11. होम डिलिव्हरीचे काय?
राज्यात होम डिलिव्हरी सेवा पूर्णवेळ सुरू राहणार असून, नागरिकांना घरबसल्या खाद्यपदार्थ, वस्तू मागविता येणार आहेत.
12. चित्रपट, नाट्यगृहांचे काय?
चित्रपट, नाट्यगृहे खुली राहणार असून, रात्री १० ते सकाळी ८ या वेळेत ती बंद ठेवावी लागणार आहेत. या गृहांच्या क्षमतेच्या ५० टक्के लोक हजर राहू शकतात. तसेच लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच परवानगी देण्यात आली आहे.
13. संग्रहालये खुली आहेत का?
नव्या नियमावलीनुसार मनोरंजन उद्याने, प्राणिसंग्रहालये, संग्रहालये बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस तरी तुम्हाला तेथे जाता येणार नाही.
14. आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे काय?
आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर कोणतेही निर्बंध नसून, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू राहणार आहे.
15. जिमबाबत नियमावली काय?
जिम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी. दोन डोस झालेल्या व्यक्तींनाच जिममध्ये प्रवेश.
16. सलून, ब्युटी पार्लरबाबत नियमावली काय?
५० टक्के क्षमतेने सुरू करता येईल. मात्र, लशींचे दोन डोस झालेल्या व्यक्तींनाच सेवा देता येईल. त्याशिवाय, सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मास्क आवश्यक केला असून, मास्क नसलेल्यांवर कारवाई होईल. सेवा पुरविताना कोणत्याही कारणास्तव मास्क काढता येणार नाही.
17. रात्री उशिरा बस, ट्रेन, विमानाने येताय किंवा जाताय?
राज्य सरकारच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा वेळी प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. संबंधितांकडे वैध तिकीट असणे बंधनकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.