Vinod Tawde
Vinod Tawde  Sakal
महाराष्ट्र

Lok sabha result 2024: विनोद तावडे अमित शाहांच्या भेटीला; राज्यात राजकीय घडामोडींना वेग...

संतोष कानडे

Devendra Fadnavis Vinod Tawde: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभव बघावा लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यांचा रोख आहे. बुधवारी फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

महाराष्ट्र भाजपमध्ये दोन गट असल्याचं कायम बोललं जातं. एक गट फडणवीसांचा आणि दुसरा गट फडणवीसांवर नाराज असलेल्या नेत्यांचा. त्या गटाचं नेतृत्व विनोद तावडे करतात, अशीही छुपी चर्चा असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंची नेमकी भूमिका काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपमधल्या इतर नेत्यांनी फडणवीसांना सल्ला देत तशी भूमिका घेऊ नये, असं म्हटलं आहे. सरकारमध्ये राहून त्यांनी पक्षसंघटनेचं काम करावं आणि मार्गदर्शन करावं, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पाश्वभूमीवर देवेंद्र फडणवीस गुरुवारी दिल्लीकडे निघणार आहे. दिल्लीत पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांची ते चर्चा करतील. त्यापूर्वी त्यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. फडणवीस दिल्लीला जातात का आणि काय निर्णय घेतात,याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

यातच आणखी एक अपडेट येत असून भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे अमित अमित शाहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याचं सांगितलं जातंय. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. विनोद तावडेंचं दिल्लीदरबारी वजन वाढलेलं आहे. बिहारमध्ये सत्ताबदल झाला तेव्हा त्यांची भूमिका मोलाची होती. त्यामुळे तावडे-शाह यांच्या नेमकी कोणती चर्चा होते, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nithin Kamath: सेबीच्या नव्या नियमांमुळे शेअर बाजाराची व्यवस्थाच बदलणार, शून्य ब्रोकरेजचे युग संपणार?

Hathras Stampede: 'या' निष्काळजीपणामुळे हाथरसमध्ये १२१ निष्पाप भाविकांनी गमावला आपला जीव; घटनेला जबाबदार कोण?

WhatsApp AI Feature :व्हॉट्सॲपवर बनवा स्वतःचा हवा तसा फोटो; कंपनी लाँच करतीये नवीन फीचर, मेटा एआयला द्या फक्त 'ही' सूचना

Maharashtra Live News Updates : 'या' फ्लाइटने टीम इंडिया देशात परतणार

Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

SCROLL FOR NEXT