Ajit Pawar and Jayant Patil
Ajit Pawar and Jayant Patil esakal
महाराष्ट्र

Jayant Patil: "जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने," माजी अर्थमंत्र्यांनी असं केलं बजेटचं विश्लेषण

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

महायुती सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या घोषणा केल्या आहेत.

दरम्यान माजी अर्थमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पातून सरकारवर टीका केली आहे. पराभवाच्या भीतीने या सरकार भरमसाठ घोषणा केल्या आहेत, असे पाटील म्हणाले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, "आपल्या महाराष्ट्राचे बजेट आज मांडण्यात आले. देशातील लोकसभा निवडणुकीचा फटका इतका मोठा आहे की, एक म्हण आहे 'जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने.' आता चादर फाटली असल्याने सत्ताधाऱ्यांनी खैरात वाटायला सुरूवात केली आहे. यांना आता खात्री झाली आहे की, आपला पराभव निश्चित आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रयत्न सरकारने केला आहे."

"सरकारने केलेला हा प्रयत्न फक्त तीन महिन्यांसाठी आहे. कारण तीन महिन्यांनी आचारसंहिता लागेल. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, पुढचे तीन महिने पैसे वाटप करायचे आहेत बाकीचं नंतरचे आल्यावर बघतील. त्यामुळे हे एक बेजबाबदारपणे मांडलेले बजेट आहे. हा एक आकडेवारीचा खेळ आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेलचा दर कमी करण्याचा फक्त आव आणला आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने देखील हेच केले होते," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त केले.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळणारे अजित पवार यांनी 28 जून रोजी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला.

यामध्ये इतर घोषणांसोबत 'मुख्यमंत्री मांझी लाडकी बेहन योजना' जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशावर प्रकाश आंबेडकरांनी बोलणं टाळलं! म्हणाले, 'आयाराम गयारामचं जे राजकारण...'

Congress: भाव वाढला! लोकसभेत 99 जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये 6 आमदारांचा प्रवेश

RBI Action: आरबीआयने आणखी एका बँकेला ठोकलं टाळं; पैसे काढता येणार की नाही? जाणून घ्या सविस्तर

Team India Victory Parade: ढोल-ताशांच्या गजरात वानखेडेवर विराट-रोहितसह टीम इंडियाचा गणपती डान्स, Video एकदा पाहाच

Maharashtra Live News Updates : गुजरातच्या बसवरुन विधान परिषदेत राडा

SCROLL FOR NEXT