Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Updates: टाटा कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होण्यास सुरूवात

सकाळ डिजिटल टीम

Tata Live: टाटा कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होण्यास सुरूवात

रतन टाटा यांच्या अंत्यविधीला २४ तास उलटण्यापूर्वीच टाटाच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होण्यास सुरूवात झाली आहे.

PM Modi Live: लाओस भेटीनंतर पंतप्रधान मोदी मायदेशी रवाना.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवस लाओस दौऱ्यावर होते. आता या लाओस भेटीनंतर ते आज मायदेशी परतणार आहे.

Kolkata Doctors Live: कोलकात्यात उपोषणाला बसलेल्या डॉक्टरची प्रकृती चिंताजनक

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरसोबत घडलेल्या भीषण घटनेबद्दल देशभरात अजूनही संताप व्यक्त होत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या मागणीसाठी कनिष्ठ डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. सुमारे आठवडाभरापासून ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या डॉक्टरची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'महा सायबर'ची पाहणी

नवी मुंबई इथं महा सायबर या महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि 'महा सायबर'ची कार्यपद्धती, यंत्रणा नेमकी कशापद्धतीने कार्यान्वित आहे याचा आढावा घेतला.

PM Modi Live: पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी मांडली भारताची भूमिका

लाओस इथं १९ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. दहशतवाद हा जागतिक शांतता आणि सुरक्षेला असलेला मोठा धोका असून मानवतेमध्ये विश्वास असणाऱ्या सर्व राष्ट्रांनी एकजुटीनं याचा प्रतिकार करायला हवा असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Ajit Pawar Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची संध्याकाळी पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrakant Patil Live: नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र आघाडीवर - चंद्रकांत पाटील

नवी दिल्ली - नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे केंद्र सरकारकडून राज्याला ३०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या संदर्भात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहे.

Mahayuti Live: महायुती समन्वयकांच्या यादीत मयत पदाधिकारी सचिन कुर्मी यांचे नाव

महायुतीने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या समन्वयकांच्या यादीत भायखळा विधानसभा समन्वयक म्हणून सचिन कुर्मी यांचे नाव घोषित केले होते. विशेष म्हणजे, सचिन कुर्मी यांची हत्या ५ ऑक्टोबर रोजी झाली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर राजकीय वर्तुळात या निर्णयावर टीका होत आहे. महायुतीच्या समन्वयक यादीतील ही चूक उघड झाल्याने संबंधित पक्षावर टीका होत असून, यावर स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे.

Ashwini Vaishnaw Live Updates: राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था आणि राज्य सरकार यांच्यात ऑटोमेशन आणि रोबोटिक्स या क्षेत्रातला सामंजस्य करार

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या या करारावर स्वाक्षऱ्या.

PM Narendra Modi Live Updates: जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांचा सर्वात मोठा नकारात्मक परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर होतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

व्हिएन्टिन, लाओ पीडीआर 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांचा सर्वात मोठा नकारात्मक परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर होत आहे. लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होवो आणि हे युद्धाचे युग नाही असे मी वारंवार सांगितले आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Vijay Wadettiwar Live Updates: निवडणुकीपूर्वी कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगू नये - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाली की, हरयाणामध्ये काँग्रेसच्या बाजूने एकतर्फी मूड असल्याचे आपण सर्वच पाहत होतो. निवडणुकीपूर्वी कोणत्याही नेत्याने मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगू नये - आम्ही हरियाणातून हे शिकलो आहे की, मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा नसावी मुख्यमंत्री होणार हा आमच्यातला विषय नाही (महाविकास आघाडी).

Rajaram Factory LIVE : राजाराम कारखान्याचे संचालक नारायण चव्हाण यांचे निधन

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष नारायण बाळकृष्ण चव्हाण (वय ६८) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज सकाळी ८ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Pakistan LIVE : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला; कोळसा खाणीत ग्रेनेडसह गोळीबार, 20 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये असलेल्या कोळसा खाणीत मोठा हल्ला झाला आहे. कोळसा खाणीवर सशस्त्र लोकांनी हल्ला केला. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमधील दुकी भागात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. येथे असलेल्या जुनैद कोळसा कंपनीच्या खाणींवर सशस्त्र लोकांनी हल्ला केला.

Rain Alert LIVE : कोकण, मुंबई, पुण्यासह आज 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होणार आहे. तर, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे या विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.

Pune Crime LIVE : पुण्यातील दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. पुण्यातील कात्रजजवळील संतोषनगर परिसरातील ही घटना आहे. अर्जुन मोरे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Koyna Dam LIVE : कोयना धरणातून एक हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पाटण : सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जलाशयात प्रतिसेकंद एक हजार ६०३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे काल (ता. १०) सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

Milton Cyclonic LIVE : मिल्टन चक्रीवादळाचा फ्लोरिडाला तडाखा

टाम्पा : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांताच्या दिशेने घोंघावणारे मिल्टन हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले. मध्यम तीव्रतेच्या या वादळामध्ये ताशी १६० किमी वेगाने वारे वाहत असून किनारपट्टीवर पाऊसही कोसळत आहे. मिल्टन चक्रीवादळ टाम्पा या शहराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकले. वादळाच्या तडाख्यामुळे जलवाहिन्याही फुटल्याने शेकडो घरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तसेच, सुमारे तीस लाख घरे आणि उद्योगव्यवसायांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. घरे पडून काही जणांचा मृत्यू झाला.

Ambabai Temple LIVE : करवीर निवासिनी अंबाबाईचा आज नगरप्रदक्षिणा सोहळा

Latest Marathi Live Updates 11 October 2024 : कोल्हापुरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सजणार आहे. तसेच ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न सन्मान देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे जलाशयात प्रतिसेकंद एक हजार ६०३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून एक हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सचोटी, प्रामाणिकपणा, धडाडी, त्याग, स्नेह आणि प्राणिप्रेम या गुणांचा समुच्चय असलेले भारतीय उद्योगविश्वाचे पितामह रतन टाटा यांना गुरुवारी हजारो लोकांच्या तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. त्याचबरोबर पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Peace Prize 2024: जपानी संस्था निहोन हिडांक्योला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर, या महान कार्यासाठी मिळाला सन्मान

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: नवापुरात तिन्ही उमेदवारांमध्येच रंगणार लढत; उमेदवार तेच, मात्र पक्ष व चिन्ह बदलण्याची शक्यता

टीम इंडियाला Semi Final गाठण्यासाठी शेवटची संधी; पाकिस्तानची हवीय मदत, जाणून घ्या समीकरण

Kalyan Dombivli water supply : मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

Amitabh Bachchan : कुली सेटवरील 'त्या' घटनेनंतर अमिताभ साजरा करतात दोनदा वाढदिवस, हनुमान चालीसेने वाचवलेले प्राण

SCROLL FOR NEXT