Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Updates : अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर उपस्थित

सकाळ डिजिटल टीम

Atul Parchure demise Live: अतुल परचुरे यांच्या अंत्यदर्शनासाठी महेश मांजरेकर आणि सचिन खेडेकर उपस्थित

Kolhaur Update: 7 आमदारांचा शपथविधी सोहळ्याला सुनील मोदी यांचा आक्षेप

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी सध्या न्यायप्रविष्ठ असताना राज्यपालांनी 7 आमदारांची यादी निश्चित केली आहे. आज या 7 आमदारांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडतोय. याला कोल्हापुरातील उबाठा शिवसेनेचे नेते सुनील मोदी यांनी आक्षेप नोंदवला आहे.

Mumbai Congress Live Update: काँग्रेस निरीक्षकांची थोड्याच वेळात बैठक

काँग्रेस निरीक्षकांची थोड्याच वेळात बैठक बैठक होणार आहे. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, टिळक भवनात दाखल झाले आहेत.

Atul Parchure Death Live Update: अतुल परचुरेंच पार्थिव  निवासस्थानी आणण्यात आलं

अतुल परचुरेंच पार्थिव त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आणण्यात आलं आहे. काही वेळ पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवलं अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल.

Tamilnadu Rain Live: तामिळनाडूत तुफान पाऊस, शाळा महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाचा अंदाज पाहता तामिळनाडू सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

Maharashtra Governer Live: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुरु

राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक सुरू आहे. राज्यात नागरिकांचं जीवनमान उंचावणारे अनेक प्रकल्प आणि विकासकामं सुरु आहेत, या विकासकामांना राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

Maharashtra Live: महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार पदी वर्णी; दुपारी 12 वाजता शपथविधी

महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार पदी वर्णी लागली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे. यामध्ये भाजपकडून 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 जणांना संधी देण्यात आली आहे.

दुपारी १२ वाजता विधीमंडळतात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.

Punjab Gram Panchayat Elections LIVE : पंजाब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू

पंजाब ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतपेटीद्वारे सरपंच आणि पंचपदासाठी मतदान होत आहे.

Maharashtra Vidhansabha LIVE : आज महाराष्ट्र विधानसभेची घोषणा होणार? दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची घोषणा होण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरे गावी

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (मंगळवार) सकाळी दहा वाजता आपल्या दरे (ता. महाबळेश्वर) गावी येत आहेत. सायंकाळी चार वाजता पुन्हा मुंबईला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे सकाळी दहा वाजता ठाणे येथून हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे निघतील. सकाळी पावणेदहा वाजता दरे हेलिपॅड येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर मोटारीने ते निवासस्थानाकडे जातील. सकाळी अकरा ते दुपारी पावणेचार वाजेपर्यंत दरे येथे राखीव राहणार आहे. चार वाजता ते हेलिकॉप्टरने दरे हेलिपॅडवरून राजभवन हेलिपॅड, मुंबईकडे रवाना होतील. सायंकाळी पावणेपाच वाजता त्यांचे राजभवन हेलिपॅडवर आगमन होईल. तेथून ते मोटरीने वर्षा निवासस्थानाकडे जातील व तेथे राखीव राहील.

Maharashtra Government LIVE : आज 7 आमदारांचा शपथविधी होणार; महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी

आज दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विधीमंडळात उपसभापती निलम गोरे यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदारपदी वर्णी लागली आहे. महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे.

Baba Siddique Murder Case LIVE : मारेकऱ्यांना बाबा सिद्दिकींची ओळख पटवण्यासाठी बॅनरवरील दाखवण्यात आला होता फोटो

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : मारेकऱ्यांना बाबा सिद्दिकींची ओळख पटवण्यासाठी बॅनरवरील फोटो दाखवण्यात आला होता. आरोपींच्या चौकशीत खुलासा झाल्याचा मुंबई पोलिसांचा दावा आहे. आतापर्यंत गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर यांना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

Sunil Kedar LIVE : काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी कर्जरोखे घोटाळ्याच्या वसुली सुनावणीला सुरुवात झालीये. सुनील केदार या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या मार्गदर्शनात ही सुनावणी सुरु आहे. चौकशी समिती 17 ऑक्टोबरपर्यंत नागपुरात सुनावणी करणार आहे.

S. Jaishankar LIVE : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आजपासून पाकिस्तान दौऱ्यावर

नवी दिल्ली : आज आणि उद्या एस. जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी जयशंकर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पाकने आमंत्रण दिलं होतं. मात्र, मोदी यांच्या ऐवजी एस जयशंकर बैठकीसाठी जाणार आहेत.

Adani Company LIVE : अदानी प्रकल्पाचा फेरविचार होणार, सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

कोलंबो : अदानी कंपनीमार्फत श्रीलंकेमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास दिलेल्या परवानगीबाबत फेरविचार करणार असल्याचे येथील विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. पंतप्रधान अनुराकुमारा दिसनायके यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील स्वायत्ततेला धोका निर्माण होणार असून सत्ता मिळाल्यास प्रकल्प रद्द करू, असे आश्‍वासन दिसनायके यांनी निवडणूक प्रचारावेळी दिले होते.

Monsoon Update LIVE : मॉन्सून लवकरच घेणार देशाचा निरोप, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. सोमवारी पूर्वोत्तर राज्यातून मॉन्सूनने माघार घेतली. मॉन्सूनचा उर्वरित प्रवास वेगाने होणार असल्याने लवकरच मॉन्सून महाराष्ट्रासह देशाचा निरोप घेणार आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Actor Atul Parchure LIVE : शिवाजी पार्क स्मशानभूमीत अभिनेते अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Latest Marathi Live Updates 15 October 2024 : अभिनेते अतुल परचुरे (वय ५७) यांचे कर्करोगाने रुग्णालयामध्ये निधन झाले. आज सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचे बहुचर्चित राजकारण आता एका टप्प्यावर पोहोचले असून, महायुतीने रिक्त जागांपैकी सात जागांवर उमेदवार नेमण्याचे निश्चित केल्याचे समजते. अदानी कंपनीमार्फत श्रीलंकेमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यास दिलेल्या परवानगीबाबत फेरविचार करणार असल्याचे विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. तिवसामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला आजपासून सुरवात होत आहे. पश्चिम बंगालमधील आर.जी.कर रुग्‍णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या निवासी डॉक्टरांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, सरकारचं पत्र मिळालं का? आचारसंहितेच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; योजनांची होणार आखणी

धोंडू, अरे एवढी काय घाई होती.... अतुल परचुरेंच्या निधनाचा संजय मिश्रा यांना धक्का, तो व्हिडिओ शेअर करत म्हणाले-

Petrol Pump Strike : ...अन्‍यथा ३१ ऑक्‍टोबरला पेट्रोलपंप बंद! पेट्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे प्रशासनाला निवेदन

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी चर्चा हवामान, खेळपट्टी आणि गोलंदाजांची!

AI-Gmail Login Scam : एआय वापरताना जीमेल लॉगिन केलंय? तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम; सर्व अकाउंट हॅक, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT