बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजप सीईसीची बैठक सुरू आहे.
दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात महाराष्ट्र निवडणूक 2024 वर भाजप CEC बैठक सुरू झाली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज मॉरिटानियामध्ये आगमन झाले. भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच मॉरिटानिया दौरा आहे.
बहराइच घटनेच्या पार्श्वभूमीवर बहराइच पोलिसांनी आज शहरात फ्लॅग मार्च काढला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीतील भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन्ही नेते घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. उद्या चंदिगढ येथे अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता असून उद्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असल्याने दोन्ही नेते तिथेच अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पोहोचले आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे.
पुणे शहरासह उपनगरात नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये वाघोली, खराडी, लोहगाव या भागात आभाळ भरुन आलं असून पावसानं देखील जोरदार हजेरी लावली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. २० तारखेला काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे, त्यावेळी संध्याकाळी यादी येणं अपेक्षित आहे. मोठा भाऊ-लहान भाऊ यामध्ये आम्हाला अडकवू नका. दोनच दिवसात जागा वाटपाच चित्र स्पष्ट होईल, असं वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
दिवाळीपूर्वी दिल्लीच्या सदर बाजारामध्ये लोकांची मोठी गर्दी होत आहे.
"SCO कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटची एक फलदायी बैठक आज इस्लामाबादमध्ये संपन्न झाली. आठ निकाल दस्तऐवजांवर स्वाक्षरी केली. भारताने चर्चेत सकारात्मक आणि रचनात्मक योगदान दिले" असे EAM डॉ एस जयशंकर यांनी ट्विट केले.
"दिल्लीमध्ये, लोकांमध्ये अशी भीती पसरली आहे की भाजप कोणत्याही किंमतीत अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला रोखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी सर्व मर्यादा ओलांडत आहे. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आणि दिल्लीची प्रगती रोखण्यासाठी सर्व प्रकारे कट रचत आहे. या षडयंत्रांचा मुकाबला करा, 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज संपूर्ण दिल्लीत 'जनसंपर्क' मोहीम सुरू केली आहे," असे दिल्लीचे मंत्री आणि आप नेते गोपाल राय यांनी सांगितले.
दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची उद्या शपथ घेणार आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून मॉरिटानियाला रवाना झाल्या आहेत.
ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. श्रीनगर इथल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर मध्ये शपथ घेतली. सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी न होण्याचा घेतला आहे निर्णय जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिल्यानंतरच सरकारमध्ये सहभागी होण्याचा काँग्रेसचा निर्णय. सध्या काँग्रेसने दिला आहे सरकारला बाहेरून पाठिंबा राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह, सुप्रिया सुळे यांच्यासह 6 पक्षांचे नेते आहेत उपस्थित होते
पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतला धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
विदर्भातील भाजपचे तीन माजी आमदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच एका विद्यमान आमदारांचा मुलगाही जानकरांना भेटला आहे.
मविआ काळात सिंचन काम ठप्प होतं
स्थगिती सरकार गेल्यावर गती सरकार लोकांनी बघितले आहे
राज्यभरात दुष्काळी भागातील कामाना सुरुवात
समाजातील विविध घटकांना सरकारकडून दिलासा दिला आहे
आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत
यांनी तिजोरी मोकळी केली असे काहींनी आरोप केले
शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली
लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली
यवतमाळ मधील नाईक कुटूंबात पडणार अजून एक फूट ?
अजित पवार समर्थक आमदार इंद्रनील नाईक यांचे बंधू ययाती नाईक यांच्यात फूट पडण्याची शक्यता
ययाती नाईक हे शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याची शक्यता - सूत्र
ययाती नाईक पुसदमधून इच्छुक
ययाती नाईक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची घेतलेली भेट
सायन परिसरात पूर्व दूर्तगती मार्गावर अपघात झाला आहे. यामध्ये मालवाहतूक करणारा ट्रक झाला पलटी झाला असून, यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील अंधेरी भागातील रिया पॅलेस इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे.
श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (SKICC) जेथे JKNC उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आज जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
बंगळूर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, बंगळूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना आज (ता. १६) सुटी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबावामुळे कर्नाटकच्या मध्यवर्ती भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बंगळूरमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वरुणाचे वादळ राज्यात आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अमरावती : अमरावतीमध्ये भरचौकात एकाची हत्या करण्यात आली आहे. शहरातील रतनगंज परिसरातील गोलू उसरेटे या 30 वर्षीय युवकावर चित्रा चौकात चार जणांकडून जुन्या वादातून धारदार चायना चाकूने हल्ला करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भयंकर घटनेने अमरावती शहर हादरुन गेले आहे.
बंगळूर : मुडा घोटाळ्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापुढे आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अर्कावती वसाहतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. शिवलिंगप्पा, वेंकटकृष्णप्पा, रामचंद्रय्या, राजशेखर यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि बीडीए आयुक्त आणि अर्कावती वसाहतीतील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या 13 वर्षीय लहान मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला. आरोपीने लहान मुलीला रेल्वे स्टेशन येथील हॉटेलच्या रूममध्ये नेऊन अत्याचार केला. ट्रेनिंगसाठी मुंबईला निघायचे सांगून तिला रेल्वे स्टेशनवर बोलून घेतले. आरोपी शिवाजी जगन्नाथ याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जयपूर, राजस्थान : दम्मम (सौदी अरेबिया) येथून लखनौला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याचा दावा करणारा धमकीचा मेल आला होता. मात्र, तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
इचलकरंजी : दि. इचलकरंजी बार असोसिएशनचा ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२६ या दोन वर्षांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान २४ ऑक्टोबरला होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे. दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव खजिनदार व सदस्यपदासाठी ही निवडणूक होणार आहे. तीन महिन्यांपूर्वी दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला होता.
राज्यात काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. दुसरीकडे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
Latest Marathi Live Updates 16 October 2024 : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला. राज्यात एकाच टप्प्यात येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रियांका गांधी-वद्रा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, महाराष्ट्रातील कोअर कमिटीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची आज बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये महायुतीची आगामी निवडणुकीसाठीची भूमिका जाहीर होऊ शकते. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.