Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Updates: सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

सकाळ डिजिटल टीम

Mumbai University senate election: दुसरा निकाल हाती, युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी

सीनेट निवडणूक दुसरा निकाल हाती. युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर (SC) 5498 मतांनी विजयी झाल्या असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मते पडली आहेत.

Sangli Live: राष्ट्रवादी आमदार सुमनताई पाटील गट आणि माजी खासदार संजयकाका पाटील या गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल

कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी आमदार सुमनताई पाटील (आर. आर. पाटील यांच्या पत्नी) आणि माजी खासदार संजयकाका पाटील (भाजप) या दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल

संजय पाटील यांच्या पीएला मारहाण झाल्याबद्दल ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसात केली आहे. तत्पूर्वी याच गटाकडून माजी उपनगराध्यक्षांना मारहाण झाली आहे

Mumbai Live: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या महिलेची ओळख पटली.

- दादरमधील एका सोसायटीत राहणारी ही महिला

- सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरते

- लोकांच्या दारांवर झाडूने मारते

- तिचे अनेक व्हीडिओ समोर

- यापूर्वी सुद्धा ती मंत्रालयात सातत्याने येते.

- मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ती करीत असते

- अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते

- यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.

Rajan Patil Live: माजी आमदार राजन पाटील यांची राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड,राज्य मंत्र्याचा दर्जा

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची "महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदे"च्या अध्यक्षपदी निवड झाली, तशा आशयाचा लेखी आदेश राज्याचे उपसचिव ए पी शिंगाडे यांनी काढला आहे. हे वृत्त मोहोळ येथे समजतात ठीक ठिकाणी या निर्णयाचे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या निवडीमुळे माजी आमदार पाटील यांना राज्यमंत्र्याचा दर्जा.

Nashik Live: अमित ठाकरे नाशिक मध्ये दाखल

अमित ठाकरे नाशिक मध्ये दाखल. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात बैठक होणार असून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे. अमित ठाकरे यांच्या पाठोपाठ राज ठाकरे देखील लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे

Badlapur Akshay Shinde Encounter Live Update: अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार

  • अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार

  • राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही

  • सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

  • सोमवारी होणार पुढील सुनावणी

  • अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या पालकांनी घेतली होती मुंबई उच्च न्यायालयात धाव

  • अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा पालकांचा आरोप

  • अंबरनाथ पालिकेने दफन विधीसाठीचा अर्ज स्वीकारण्यास दिला होता नकार

Pune Chaturshringi Temple Live Update: नवरात्रीमध्ये चतु:श्रृंगी मंदिर 24 तास भाविकांसाठी राहणार खुले 

गणेशोत्सव संपताच आता लगेच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. यंदा नवरात्री 10 दिवस असणार आहे. यानिमित्ताने पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे.

Manu Bhaker Live Update:  मनु भाकरने स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत सहभागी होण्याचं केलं आवाहन

पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकरने स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत स्वच्छता चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक लहान पाऊल स्वच्छ आणि हरित भारतासाठी महत्त्वाचं आहे.

Aadhaar Card Live Update: सरकारनं नागरिकांच्या माहितीचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं आधार आणि पॅन कार्डचा तपशील उघड करणारी संकेतस्थळं केली ब्लॉक

माहिती गोपनीयतेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचं निराकरण करण्याचे आणि नुकसान भरपाई देण्याचे अधिकार राज्याच्या माहिती तंत्रज्ञान सचिवांनी देण्यात आले

Allahbad High Court Live: हायकोर्टात पोहचले चायनीज लसणाचे प्रकरण

चीनमधून येणारा लसूण बाजारात बिनदिक्कतपणे विकला जात असल्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावत बंदी घातलेला 'चायनीज लसूण' अजूनही बाजारात कसा उपलब्ध आहे, अशी विचारणा केली.

देशाच्या विविध भागांमध्ये चायनीज लसूण विकला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या प्रकरणाने जोर धरल्यानंतर कारवाई सुरू झाली आणि उत्तर प्रदेशातील महाराजगंजमध्ये अनेक क्विंटल चायनीज लसूण जप्त करण्यात आला आहे.

ED Raid Live: तेलंगणाच्या मंत्र्याच्या घरी ईडीची धाड

अंमलबजावणी संचालनालय तेलंगणाचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या निवासस्थानी कथित हवाला व्यवहार प्रकरणी छापेमारी करत आहे.

Live News Updates : निवडणूक आयोगाची आज मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, आज मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अजितदादा गटाकडून अनिल पाटील आणि शिवाजीराव गर्जे उपस्थित होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून रवींद्र पवार आणि अदिती नलावडे सहभागी झाले, तर ठाकरे गटाकडून सुभाष देसाई यांची उपस्थिती होती. भाजपकडून आशिष शेलार यांनी या चर्चेत भाग घेतला, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Pune Metro Live: पुण्यात महाविकास आघाडीचा पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न

सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर महाविकास आघाडीचं आंदोलन सुरु आहे.

Badlapur Crime Live : अक्षय शिंदेच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Latur Crime: लाच घेताना आरटीओ अधिकारी जाळ्यात

महाराष्ट्र सीमेवर वाहनधारकांकडून महाराष्ट्रात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक अमोल खैरनार यासह अन्य एका खासगी व्यक्तीला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.२५) रात्री रंगेहाथ पकडले.

Dombivili Live: आरपीआय आठवले गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ह्यांचे निधन

डोंबिवली मधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि आरपीआय (आठवले गटाचे) विद्यमान डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड ह्यांचे निधन झाले आहे.

Vijay Singh Rajemane Passed Away : म्हसवड येथील विजयसिंह राजेमाने यांचे निधन

म्हसवड : येथील विजयसिंह भोजराज राजेमाने (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. म्हसवड पालिकेच्या माजी नगराध्यक्षा हिंदमालादेवी राजेमाने यांचे पती व येथील फलटण एज्युकेशन शिक्षण सोसायटीच्या भय्यासाहेब राजेमाने कॉलेज कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज राजेमाने यांचे वडील होत.

Sunil Tatkare LIVE : खासदार सुनील तटकरे यांना केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीतून बाहेर पडणार अशा चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने रायगडचे खासदार आणि एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

Ajit Pawar LIVE : उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर

गडहिंग्लज : जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत. मसणाई मंदिराजवळच्या मैदानात सकाळी साडेअकराला हा कार्यक्रम होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या पवार यांचा दौरा महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे.

Uddhav Thackeray LIVE : उद्धव ठाकरेंकडून आज जिल्ह्याचा आढावा, 'मातोश्री'वर बैठ

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांचा आढावा आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी ते जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विधानसभाप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना आज पाऊस झोडपून काढणार आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Siliguri Police LIVE : सिलीगुडीला परीक्षा देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना धमकावल्याप्रकरणी दोघांना अटक

पश्चिम बंगाल : सिलीगुडी पोलिस आयुक्तालयाअंतर्गत बागडोगरा पोलिसांनी बिहारमधून सिलीगुडी येथे परीक्षा देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना धमकावल्या आणि छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. रजत भट्टाचार्य आणि गिरीधारी रॉय अशी आरोपींची नावे असून ते सिलीगुडीचे रहिवासी आहेत, अशी माहिती बिस्वचंद ठाकूर, डीसीपी, सिलीगुडी पोलीस आयुक्तालय यांनी दिली.

Election Commission Team LIVE : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल

रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल झालीये. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही टीम मुंबईत आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, सहआयुक्त ज्ञानेश कुमार आणि एस. एस. संधू यांच्या सोबत इतर अधिकारी देखील दाखल झालीयेत. उद्या टीम राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. सोबतच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर परवा आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. इथे क्लिक करा

RTO Employees Association LIVE : आरटीओ कर्मचारी संघटनेचा संप मागे

मुंबई : विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत सकारात्मक संप मागे घेतल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले. आरटीओ कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला होता.

Kolhapur School Closed LIVE : कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आज बंद, काय आहे कारण? 

Latest Marathi Live Updates 27 September 2024 : अन्यायी संच मान्यता आदेश त्वरित रद्द करावा, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अघोषित बंद राहणार आहेत. तसेच विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला होता. प्रशासनासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेत सकारात्मक संप मागे घेतल्याचे आरटीओ कर्मचारी संघटनेने सांगितले. रात्री उशिरा निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात दाखल झालीये. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ही टीम मुंबईत दाखल झाली आहे. राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहे. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आजही पावसाची शक्यता आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Crime: मुंबई हादरली! पत्नीवर अॅसिड हल्ला, पतीचं संतापजनक कृत्य, धक्कादायक कारण समोर

Devendra Fadnavis: फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली; सोसायटीमध्ये चाकू घेऊन फिरते....

Binny and Family : जुन्या आणि नवीन पिढीला विचार देणारा 'बिन्नी अ‍ॅण्ड फॅमिली' चित्रपट

Mumbai University Senate Election Result: सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, युवासेना उमेदवाराचा विजय

SCROLL FOR NEXT