Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Live Updates : मराठा, ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचे आंदोलन

सकाळ डिजिटल टीम

Kolhapur Live: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ, 800 लाभार्थी अयोध्येला

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थी अयोध्येला रवाना झाले आहेत.

Nabhik Samaj Agitation Live : मराठा, ओबीसी समाजापाठोपाठ आता नाभिक समाजाचे आंदोलन

संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळासाठी नाभिक समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील नाभिक समाजाचे सरकारविरुद्ध महाधरणे आंदोलन होणार आहे. महामंडळ कार्यान्वित करून १ हजार कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. १२ प्रशासकीय अधिकारी व संचालक मंडळाची तात्काळ घोषणा करा अशीही मागणी आहे.

सलून, ब्युटी पार्लर असोसिएशन रस्त्यावर उतरणार असं महाराष्ट्र अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी माहिती दिली. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी आझाद मैदानात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Mumbai Senate Supriya Sule Live: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या निर्विवाद विजयानंतर सुप्रिया सुळेंच भाजपवरील टीकास्त्र

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेच्या निर्विवाद विजयानंतर सुप्रिया सुळेंचं भाजपवर टीकास्त्र. एक्सवर पोस्ट करून त्यांनी भाजवर निशाणा साधला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सीनेट निवडणूकीत युवासेनेच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. ही निवडणूक सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने पुढे ढकलण्यात येत होती. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाही सत्ताधाऱ्यांनी अशाच पद्धतीने अडवून धरलेल्या आहेत. जेंव्हा या निवडणूका होतील तेंव्हा जनता त्यांना चोख उत्तर देईल, असं त्या म्हणाल्या.

Nayar Hospital Live News: नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी

नायर रुग्णालयाच्या निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखीन १० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणखीन १० विद्यार्थीनीनी तक्रारी केल्या आहेत. विनयभंगाच्या आरोपानंतर सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं होतं. चौकशी समितीसमोर तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Tirupati laddu News Live: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरण; सुप्रीम कोर्टात सोमवारी होणार सुनावणी

तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केल्या होत्या . लाडू प्रसादामधे प्राण्यांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपाचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली SIT स्थापन करावी अशी याचिकेत मागणी करण्यात आलीय.

Mumbai High Alert Live: केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क

मुंबईत हाई अलर्ट आहे. केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. धार्मिक स्थळे गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे. दहशतवादी मुंबईला लक्ष्य करणार असल्याचं केंद्रिय तपास यंत्रणांच्या इनपुट नंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.

Israeli Air Strikes LIVE : इस्त्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर ठार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्ला संघटनेला नष्ट केल्यानंतरच आपण मरेन, अशी शपथ यूएनमध्ये व्यक्त केली होती. दरम्यान, इस्रायलकडून हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच आहेत. दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मुहम्मद अली इस्माइल आणि त्याचा नायब हुसेन अहमद इस्माइल इस्त्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.

Assam News आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक तीन बांगलादेशींना अटक

गुवाहाटी : आसाममध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठविण्यात आले. बांगलादेशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यापासून जवळपास १०० बांगलादेशींना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

PM मोदी पुणे मेट्रोचे करणार उद्घाटन, अनेक नवीन प्रकल्पांचीही करणार पायाभरणी

पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कॉरिडॉरच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी स्वारगेट-कात्रज मेट्रो विभागाची पायाभरणी करतील. विशेष म्हणजे, गुरुवारी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र मुसळधार पावसामुळे हा दौरा पुढे ढकलावा लागला होता.

Mukt Vidyapith LIVE : मुक्त विद्यापीठाच्या फेरपरीक्षेसाठी मुदत वाढ

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा जानेवारीच्‍या पहिल्या आठवड्यात नियोजित आहे. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थींनी परीक्षेसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज विनाविलंब शुल्कासह सादर करण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. ३०) आहे.

Devendra Fadnavis LIVE : अखिल भारतीय महानुभाव पंथाचा आज कृतज्ञता सोहळा, देवेंद्र फडणवीसांचा होणार सत्कार

नाशिक :अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे शनिवार (ता. २८) रोजी महाकवी कालिदास कला मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Central Railway Mega Block LIVE : मध्य रेल्वेवर रविवारी असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर काही ठिकाणी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेकडून नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी हार्बर मार्गावरील अंधेरी–गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्रकालीन १० तासांचा ब्लॉक असणार आहे. इथे क्लिक करा

Ambabai Temple LIVE : करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन आज बंद राहणार, काय आहे कारण?

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आज (शनिवारी) स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी नऊपासून सायंकाळी सहापर्यंत मुख्य मूर्तीचे दर्शन बंद राहणार आहे. देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिराशेजारी ठेवण्यात येणार आहे.

Senate Election Result LIVE : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या निकालात युवासेनेचा सर्व दहा जागांवर दणदणीत विजय

Latest Marathi Live Updates 28 September 2024 : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेटच्या 10 जागांचा निकाल जाहीर झाला. यात युवासेनेला सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळाला. तसेच करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील आज स्वच्छता केली जाणार आहे. तर, तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठही सज्ज होत आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केलेले कागल येथील नेते समरजितसिंह घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरील (डीपीडीसी) नामनिर्देशित सदस्यपदावरील नियुक्ती रद्द केली आहे. राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. सोन्याच्या भावात जोरदार वाढ झाली असून, सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी ७५ हजार रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

Dharmaveer 2 : खोट बोलावं पण किती? धर्मवीर 2 मधला राज ठाकरेंवरचा 'तो' सीन होतोय प्रचंड ट्रोल

BB Marathi Voting Trends: सुरज टॉपवर पण सगळ्यात कमी मतं कुणाला? शेवटच्या आठवड्यात हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये

IND vs BAN 2nd Test : मोठे अपडेट्स : भारतीय संघ Kanpur स्टेडियमवरून हॉटेलमध्ये परतला; आजचा खेळ होण्यावर शंका

Fire Erupted at Tata Company: तामिळनाडूतील टाटा इलेक्टॉनिक्सच्या प्लँटला भीषण आग; कंपनीत होते 4,500 कर्मचारी

SCROLL FOR NEXT