Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 3 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde Live: मुख्यमंत्री आज रात्री उशिरा दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्टीच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता

मुख्यमंत्री आज रात्री उशिरा दिल्लीत भाजप पक्ष श्रेष्टीच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे. जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे १०० जागा लढवण्यावर ठाम आहेत. अजित पवारांना बाहेरून लढवल्यास जास्त फायदा होईल, त्यातच महायुतीचा फायदा याबाबत अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार आहेत.

Neelam Gorhe Marathi Classical Language Live : केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; नीलम गोऱ्हेंकडून आभार व अभिनंदन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्याच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

Marathi Classical Language Live: ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस, अत्यंत अभिमानाचा क्षण- देवेंद्र फडणवीस

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. यामुळे राज्यात आनंदाचे वातावरण आहे. ६० वर्षांच्या प्रयत्नाला यामुळे यश आलं आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बरेली फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट : ६ ठार, मुख्य आरोपी अटकेत

बरेली फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. यात ६ जण ठार झाले आहेत. यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे.

यूपीच्या गोंडा येथे बस अपघातात पीएसी कॉन्स्टेबलचा मृत्यू

यूपीच्या गोंडा येथे बस अपघातात पीएसी कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे.

विजेच्या धक्क्याने इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कालकाजी मंदिर येथे 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री विजेच्या धक्क्याने इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. यात एक जण जखमी झाला आहे. चेंगराचेंगरीमुळे इतर ६ जण जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. चौकशी केली असता नवरात्रीच्या काळात हॅलोजन दिवे लावण्यासाठी वापरलेली विद्युत तार तुटून लोखंडी रेलिंगच्या संपर्कात आल्याचे आढळून आले. कलम 289, 125(9) आणि 106(1) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.

अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिने चेन्नईतील तिरुवोट्टीयुर श्री वादिवुदाई अम्मान मंदिरात प्रार्थना केली

पंतप्रधान ५ ऑक्टोबरला ठाणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (५ ऑक्टोबर) ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पंतप्रधान लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ठाणे शहरातील कासारवडवली येथे जाणार आहेत.

Kolhapur Live : राहुल गांधी 4, 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर

तब्बल 14 वर्षानंतर राहुल गांधी ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. एका महिन्याच्या कालावधीतील राहुल गांधींचा हा दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन.

Ajit Pawar Live Updates: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी उपक्रम उद्धाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी उपक्रम उद्धाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत पार पडला. या योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना योग्य ती उपचार सुविधा वेळोवेळी उपलब्ध होईल आणि मोठा लाभ मिळेल - अजित पवार.

ISSF Junior World Championship 2024 Live Updates: कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये खुशीनं पटकावलं कांस्यपदक

कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये खुशीनं पटकावलं कांस्यपदक. यासह भारताच्या पदकांची संख्या 15 वर पोहोचली, ज्यात 10 सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश.

Badlapur Case Live: बदलापूर प्रकरणातल्या सहआरोपींना घेऊन पोलिस कोर्टात

बदलापूर प्रकरणातल्या सहआरोपींना ताब्यात घेतल्यानंतर एसआयटीचं पथक कल्याण कोर्टात दाखल झालं आहे.

Pune Live: पुण्यात अकरावीच्या प्रवेशाची अंतिम संधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आता शेवटची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी ‘दैंनदिन गुणवत्ता फेरी’चे आयोजन करण्यात आले असून ही फेरी येत्या शनिवारपर्यंत (ता. ५) राबविण्यात येणार आहे.

Ranjeet Savarkar: "निवडणुका आल्या की काँग्रेस सावरकरांची  बदनामी करते"

कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद आणखी वाढला आहे. या मुद्द्यावरून सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विशेषत: निवडणुका येत असताना सावरकरांची वारंवार बदनामी करण्याची काँग्रेसची रणनीती असल्याचे ते म्हणाले.

USA Live: अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाचा कहर; 183 जणांचा मृत्यू

अमेरिकेत हेलेन चक्रीवादळामुळे मृतांचा आकडा 183 वर पोहोचला आहे. यामुळे शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर उत्तर कॅरोलिनामध्ये सुमारे 90 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Uddhav Thackeray: शिवाजी पार्कचे मैदान ठाकरेंचेच

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान ठाकरेंना मिळाल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदानाची परवानगी जवळपास निश्चित असल्याचे वृत्त आहे.

Live: सर्व आदिवासी आमदारांची आज बैठक

- सर्व आदिवासी आमदारांची आज बैठक

- बैठकीत आंदोलनाची भूमिका ठरणार

- आज संध्याकाळी सर्व आदिवासी आमदारांची बैठक होण्याची शक्यता

Raj Thackeray : विधानसभेसाठी राज ठाकरेंची महत्वाची बैठक

राज ठाकरेंच्या उपस्थितीत ठाणे, कल्याण आणि मुंबईतले विधानसभेसाठी नेमलेले निरक्षक आणि नेत्यांची बैठक शिवतीर्थ शेजारील कार्यालयात होत आहे

Pune crime live:पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाख रुपयांचा गंडा

पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोन नागरिकांना 57 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यावेळी शिवाजीनगर आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur Live: रवींद्र पडवळांनी घेतली रामगिरी महाराजांची भेट

विशाळगड प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ याने घेतले रामगिरी महाराज आणि अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांची भेट

 Nagpur Live: नागपूरमध्ये बससेवा बंद: कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा आज पूर्णपणे ठप्प झाली आहे. कर्मचाऱ्यांनी पगारवाढ न मिळाल्याच्या कारणास्तव बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रभावित झाले आहेत, ज्यात दैनंदिन कामावर जाणारे आणि शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 2010 पासून पगारवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे, आणि वाढती महागाई लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

H.D. Kumaraswamy LIVE : केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामींविरोधात तक्रार दाखल, 50 कोटींची मागणी केल्याचा आरोप

कर्नाटक : जेडीएसचे सोशल मीडिया उपाध्यक्ष विजय टाटा यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री एचडी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत एचडी कुमारस्वामी आणि रमेश गौडा यांच्यावर ५० कोटी रुपयांची मागणी केल्याचा आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.

Nashik News : नाशिकमध्ये आज उद्योगभरारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थितीत

राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतलेले निर्णय, उद्योजकांना दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा आणि औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आलीये. उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीत भरारी घेत प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा उद्योग विभागाने केला आहे. याचसाठी आज नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील डेमॉक्रसी हॉटेलमध्ये उद्योगभरारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे व प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली.

Nagpur News : सिग्नलवर थांबलेल्या दांपत्यावर पोलीस कर्मचाऱ्याने खर्रा खाऊन थुंकले

नागपूर : सिग्नलवर उभ्या असलेल्या दांपत्यावर पोलीस कर्मचाऱ्याने थुंकल्यावर दांपत्याने पोलिसांना खडे बोल सुनावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सिग्नल वर थांबलेल्या दांपत्याच्या अंगावर पोलिसांच्या वाहनातील एक कर्मचारी खर्रा खाऊन थुंकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागपूर शहरातील लक्ष्मी नगर चौकात एक जोडपे सिग्नलवर थांबले असतानाचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

Bangladesh Ministry of Foreign Affairs : बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या 5 राजदूतांना परत बोलावले ढाक्यात

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या 5 राजदूतांना ढाका येथे परत बोलावले आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, पोर्तुगाल आणि संयुक्त राष्ट्रांचे हे राजदूत आहेत.

Doctor Shot Dead LIVE : दिल्लीतील रुग्णालयात डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीतील डॉक्टरची हॉस्पिटलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांना 2 हल्लेखोरांवर संशय आहे. हॉस्पिटलच्या केबिनमध्ये डॉक्टरवर गोळ्या झाडण्यात आल्या.

Navratri Festival LIVE : मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज

मुंबईतील मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर शारदीय नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरा आणि बॅग स्कॅनिंग मशीनची सोय करण्यात आली आहे. मुंबादेवी मंदिर पहाटे ५.३० वाजता मंगल आरती करुन उघडले. ७ ॲाक्टोबरला सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव होणार आहे.

Tyre Factory LIVE : बागपतमध्ये टायर कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

उत्तर प्रदेश : बागपतमधील बरौतच्या बोहला गावात टायर कारखान्याला आग लागली आहे. या आगीत टायरीचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Dnyaneshwar Patil Passed Away : माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन; आज 11 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. फुफुसाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री साडेदहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी 11 वाजता परंडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Navratri Festival LIVE : आजपासून शक्तीचा जागर, अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण

Latest Marathi Live Updates 3 October 2024 : साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या शुक्रवार (ता. ४) आणि शनिवारी (ता. ५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. तर, आज वर्षा गायकवाड यांची सकाळी १० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या शिवाय, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT