Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Updates : तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

Supreme Court Live: तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसाद बनवताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नवीन स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. स

र्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एसआयटीमध्ये दोन सीबीआय अधिकारी, दोन आंध्र प्रदेश पोलिस अधिकारी आणि एफएसएसएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश असेल. सीबीआयचे संचालक एसआयटीच्या तपासावर लक्ष ठेवतील.

Marathi News Updates Live: आदिवासी आमदार आज मंत्रालयात दाखल, अजित पवारांना भेटणार

आदिवासी आमदार आज मंत्रालयात दाखल झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी भेटणार आहेत. या भेटीत आदिवासी समाजाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यात त्यांचे हक्क, विकास योजना, तसेच शासकीय धोरणे यांचा समावेश असेल.

Cabinet meetings lIVE: आजच्या कॅबिनेट बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

आजच्या कॅबिनेटच्या अजेंड्यात विविध महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. मागील बैठकीच्या इतीवृत्तांताला मान्यता देणे हा पहिला विषय होता. राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याच्या स्थितीवर चर्चा झाली. 'लाडकी बहीण' योजनेचा विभागवार आढावा घेण्यात आला. ॉ

पुणे आणि कोकणात कायमस्वरूपी नवी SDRF टीम तैनात करण्याचा प्रस्ताव देखील चर्चेत आला. धरणांवरील जलविद्युत प्रकल्प BOT तत्त्वावर देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Coldplay concert live: कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुक माय शो या तिकिट बुकिंग संकेतस्थळाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. बुक माय शो ने संशयितांची नाव, मोबाईल क्रमांक, संकेतस्थळे आणि समाज माध्यमांवरील खात्यांची माहिती पोलिसांना दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६(क) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Tirupati Laddu Prasad LIVE : तिरुपती लाडू प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाची FSSAI ला नोटीस

Tirupati Laddu Prasad : मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने FSSAI ला पुरवणी नोटीस जारी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि तिरुपती लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या पुरवठ्याशी संबंधित प्रकरणात एआर डेअरी फूडला उत्तर देण्यासाठी वेळ द्यावा.

Nitin Gadkari LIVE : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज निपाणी दौऱ्यावर

निपाणी : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज (ता. ४) निपाणी दौऱ्यावर येत आहेत. केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार व व्हीएसएम सोमशेखर कोठीवाले एमबीए, एमसीए इमारत उद्‌घाटन या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. गडकरी सकाळी ८.३० वाजता नवी दिल्ली येथून विमानाने कोल्हापूरच्या दिशेने प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता उजळाईवाडी विमानतळावर आगमन होईल.

Mirzapur Accident LIVE : मिर्झापुरात मोठी दुर्घटना; ट्रॅक्टर-ट्रकच्या धडकेत 10 जण ठार, तिघे जखमी

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे गुरुवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. भदोही जिल्ह्यातून 13 जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून जोराची धडक दिली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

CM Eknath Shinde LIVE : सर्वपक्षीय आदिवासी आमदार आज मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार

सर्वपक्षीय आदिवासी आमदार मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पेसा भरती आणि धनगरांना आदिवासीतून आरक्षण नको, ही प्रामुख्याने त्यांची मागणी आहे.

Tirupati laddu Controversy LIVE : सुप्रीम कोर्टात आज तिरुपती लाडू प्रकरणाचा फैसला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय आज तिरुपती लाडूमधील प्राण्यांच्या चरबीच्या कथित भेसळीच्या प्रकरणासह न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी करणार आहे. तुषार मेहता यांनी या प्रकरणी सुनावणीची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ही विनंती मान्य केली आणि आज सकाळी प्रथम सुनावणी घेण्यास सांगितले.

Hupari Crime : तरुणावर तलवार हल्लाप्रकरणी चौघांना अटक

हुपरी : खुन्नस देत असल्याच्या कारणातून नवनाथ बाळासाहेब चोरमुले (वय २४ रा. तळंदगे) या तरुणावर तलवारीने हल्ला केल्याच्या घटनेचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लावला. याप्रकरणी चौघांना अटक केली. पप्पू ऊर्फ आशितोष आप्पासो जाधव (वय २३, रा. पट्टणकोडोली) या मुख्य संशयित आरोपीसह प्रथमेश उर्फ चिक्या बाजीराव दाईंगडे (वय २२, रा. तळंदगे), समर्थ विजय पाटील (वय १९, रा. नवीन घरकुल वसाहत, कागल) व अभिषेक ऊर्फ नमक संजय मलके (वय १९, रा. कोरवी गल्ली, कागल) अशी संशयितांची नावे आहेत.

Hindurao Shelke LIVE : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी घेतली शरद पवार यांची भेट

इचलकरंजी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी सांगलीत ज्येष्‍ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे ते निकटचे सहकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात परिचित आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधातही त्यांनी प्रदीर्घ काळ इचलकरंजीत राजकारण केले आहे.

Rahul Gandhi LIVE : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

Latest Marathi Live Updates 4 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर त्यांचं आगमन होईल. तर, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज निपाणी दौऱ्यावर येत आहेत. सांगली जिल्ह्यात काँग्रेसकडून इच्छुक विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिल्ह्याच्या निरीक्षक, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे शनिवारी (दि.५) सांगलीत येणार आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation बाबत सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला

Hyundai Motor IPO: सणासुदीत कमाईची मोठी संधी! देशातील सर्वात मोठा IPO दिवाळीपूर्वी येणार

Teerth Darshan Yojana : तीर्थदर्शन योजनेसाठी आले दोन हजार अर्ज; अयोध्या, बुद्धगया, केदारनाथला जाणारे सर्वाधिक

Nashik News: टायटल क्लिअर नसताना घरे फ्री होल्ड कशी? सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीचा सवाल, निवडणूक ‘स्टंट’चा आरोप

शरद पवार माढ्यातून 'मविआ'ची कोणाला उमेदवारी देणार? विजयसिंह मोहिते-पाटलांच्या पुतण्याचं नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT