Latest Maharashtra News live Updates esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Marathi News Updates: 2016 बिहार रेल्वे ट्रॅक IED लावल्याप्रकरणी NIA पटना कोर्टाने 6 जणांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली

Breaking Marathi News Updates 5 October 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ डिजिटल टीम

2016 बिहार रेल्वे ट्रॅक IED लावल्याप्रकरणी NIA पटना कोर्टाने 6 जणांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली

2016 बिहार रेल्वे ट्रॅक IED लावल्याप्रकरणी NIA पटना कोर्टाने 6 जणांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई मेट्रो लाईन-३ च्या BKC ते आरे JVLR सेक्शन दरम्यानच्या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला

मुंबई मेट्रो लाईन-३ च्या BKC ते आरे JVLR सेक्शन दरम्यानच्या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

जम्मूच्या घ्रोटा भागात संशयास्पद स्फोटक सापडले

जम्मूच्या घ्रोटा भागात संशयास्पद स्फोटक सापडले आहेत.

जबलपूरमधील बांधकामाधीन हॉटेलमध्ये गॅस पाइपलाइनच्या स्फोटात महिलेचा मृत्यू

जबलपूरमधील बांधकामाधीन हॉटेलमध्ये गॅस पाइपलाइनच्या स्फोटात महिलेचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Live : मोदींना कोणीतरी चुकीचं ब्रिफिंग केलं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

आम्ही जी उद्घाटन करतोय ती खऱ्या कामांची करतोय. या देशात अशा पण काही व्यक्ती आहेत ज्यांनी २०१७ शिवस्मारकाचे भूमिपूजन केले पण त्याचं पुढे काही झालं नाही.घाईघाईत शिवरायांचा पुतळा उभारला तो पडला. राम मंदिराचं उद्घाटन केलं त्याला गळती लागली. संसद भवनाचे उद्घाटन केलं त्याला गळती लागली. आमच्या उद्घाटनात आणि त्यांच्या उद्घाटनात खूप फरक आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यावर टीका केली.

महा विकास आघाडीच्या काळात मेट्रो 3 चं काम एक दिवसही थांबलं नव्हतं पंतप्रधानांना चुकीची ब्रीफिंग करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना कोणाची फोटो कोणाचे त्यांच्या त्यांच्यातले इगो प्रॉब्लेम त्यांनी बघावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Mumbai LIve : वरळीत पाळीव प्राणी उद्यान अन् ई-अभ्यासिकेचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

वरळीत पाळीव प्राणी उद्यान आणि ई-अभ्यासिका सुविधा केंद्राचं आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. आमदार सचिन अहिर यांच्या आमदार निधीतून हे बांधण्यात आलं आहे. वरळीतील प्राणी प्रेमींना आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

Pune News Live : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ केलेले पाच पोलिस पुन्हा सेवेत

पुणे, ता. ५ ः अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. बडतर्फ केलेल्या पोलिसांनी पुन्हा सेवेत घेण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.

Dombivli News Live : शहाड उड्डाणपुल होणार चार पदरी! एमएमआरडीएकडून निविदा जाहीर

डोंबिवली, ता. 5 - शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. नागरिकांना आता दिलासा मिळणार असुन या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेगवान होण्यास मदत होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगर शहरात २० हून अधिक कॅफेवर पोलिसांच्या धाडी

छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या कॅफेवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. डीसीपी, क्राईम ब्रँच, स्थानिक पोलीस महापालिका यांचे संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी शहरातील 20 ठिकाणी एकाच वेळेस धाडी आणि कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai News Live : मुंबईतील मीरा रोड परिसरात ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात गोंधळ

मुंबई जवळच्या मीरा रोड येथे धर्मांतराचा आरोप करत हिंदू संघटनांना ख्रिश्चन धर्मियांच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाने धर्मांतर होत असल्याचा आरोप करत हा गोंधळ घातला आहे.

Sanjay Shirsat Live Updates:  शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

-राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते. काँग्रेसच्या लाचार लोकांनी आज गांधी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

-राहुल गांधी यांनी ठरल्याप्रमाणे आज नौटंकी केली. विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारा एका ड्राईव्हरच्या घरी जेवल्याचे कौतुक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय.

-काँग्रेसने नेहमची ही दुटप्पी भूमिका बाळगली. एखाद्या लहान मुलाला उचलायचे. एखाद्या वयोवृद्ध माणासाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्याचे दर्शन घ्यायचे. या नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले.

-आमच्या महाराजांचे नाव अभिमानाने आणि स्वाभिमानाने घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असेच नाव उच्चारले पाहिजे.

-यापूर्वीही राहुल गांधी यांना महाराजांचा पुतळा देण्यात आला होता तेव्हा त्यांनी तो एका हाताने उचलला होता. अशा राहुल गांधीकडून आज महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले ही आमच्यासाठी दुर्देवी घटना आहे. याचा निषेध समजातील सर्वच स्तरातील लोकांनी केला पाहिजे.

-महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक तयार झाले आहेत. लाचार महाविकास आघाडीला गांधीचे पाय चेपावे लागतात. दिल्लीला जावे लागते. या लाचारांनी हिंदुत्वाचे नाव देखील घेऊ नये.

Visakhapatnam Live Updates:  8 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम इथं बहुपक्षीय नौदल कवायत सागरी सराव मलबार २०२४ सुरु होणार

8 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम इथं बहुपक्षीय नौदल कवायत सागरी सराव मलबार २०२४ सुरु होणार. भारताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वर्षीच्या सरावामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि यूएसए यांचा सहभाग.

BJP MLA Nitesh Rane Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

  • हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

  • संविधानाच्या रक्षणासाठी नितेश राणे रस्त्यावर

  • भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत नितेश राणे यांच्या मतदार संघात महायुतीची आरक्षण बचाव रॅली

  • राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आरक्षणावरून वक्तव्य केले याला आता महायुतीकडून रॅलीतून उत्तर

Shivsena Live: माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेतील माजी आमदार सिताराम दळवी यांचे निधन झाले आहे. सिताराम दळवी हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत कायम एकनिष्ठ राहिले. मनसे नेते संदीप दळवी यांचे ते वडील होते.

PM Modi Live : कॉंग्रेसमुळे तरुण ड्रग्सचे व्यसनाधीन - मोदी 

Electricity Tariff Hike Live : वीज दरवाढीचा व्यावसायिकांना ‘शॉक’; प्रतियुनिट 2 रुपये कमी करण्याची मागणी

विजेच्या वाढलेल्या दरवाढीचा फटका घरगुती व छोट्या व्यावसायिकांना बसू लागला आहे. छोटे व मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यातच सध्या लागू केलेल्या वाढीव औद्योगिक वीजदरामुळे अनेक छोटे औद्योगिक घटक अडचणीत आले आहेत. वीज नियामक आयोगाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे ८.९४ रुपये प्रतियुनिट इतका दर आहे. सध्या लागू असलेला इंधन समायोजन आकारासह हा सरासरी दर ९.६० रुपये प्रतियुनिट इतक्या उच्च पातळीवर पोचला आहे. वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांची सुरू असलेली लूट थांबवावी आणि अन्य राज्यांच्या तुलनेने विचार करून महाराष्ट्रातील सध्याचे वीजदर सरासरी किमान दोन रुपये प्रतियुनिट कमी करावेत, अशी मागणी उद्योजक व सर्वसामान्य ग्राहकांतून होत आहे.

Subhash Gaikwad Live : महाविकास आघाडीने ‘आयारामां’ना तिकीट देऊ नये - सुभाष गायकवाड

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण, येथून इच्छुक उमेदवारांना डावलून महाविकास आघाडीने भाजप व इतर पक्षांतील आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.

PM Modi In Poharadevi: मोदीजींच बंजारा समाजाशी विशिष्ट नानातं- देवेंद्र फडणवीस

मोदीजींच बंजारा समाजाशी विशिष्ट नात आहे. या देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोदी पहिले पंतप्रधान आहेत जे पोहरादेवीला आले. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

Nashik Live News: अशोक स्तंभावर महाविद्यालयीन मुलांचा जोरदार राडा

- शिकच्या अशोक स्तंभावर महाविद्यालयीन मुलांचा जोरदार राडा

- दोन गटात तुंबळ हाणामारी

- अशोक स्तंभ परिसरात असलेल्या खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांचा भर रस्त्यात राडा

- भर रस्त्यात दोन टोळके एकमेकांना भिडले

Raj Thackeray: ३ हजार शिक्षकांनी मानले राज ठाकरेंचे आभार

३ हजार शिक्षकांनी राज ठाकरेंचे आभार माननले.

आमच्या मदतीसाठी ते धावून आले आहेत.. आम्ही सगळे शिक्षक त्याच्यासोबत आहोत

Pm Modi: नरेंद्र मोदींनी केली पोहरा देवीची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवी गडावर पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले व  देवीची पूजा केली


PM Modi In Thane Live: मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामाच्या विकास कामाचे उदघाटन ठाणे येथे होणार आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात आणि मुंबई या दोन्ही मार्गावर मागच्या चार ते पाच तासापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Live: माजी आमदार सिताराम घनदाट घेणार शरद पवारांची भेट

- माजी आमदार आणि अभ्युदय बॅंकेचे अध्षक्ष सिताराम घनदाट निसर्ग कार्यालयात दाखल

- ⁠शरद पवार यांची घेणार भेट

Rahul Gandhi In Kolhapur Live: डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधी

कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधी पोहोचले आहेत. गेल्या अर्ध्या तासांपासून ते संधे कुटुंबियांशी चर्चा करत आहेत.अजित संधे टेम्पोचालक आहेत.

Supriya Sule Live: या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू- सुप्रिया सुळे

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडू नये आमची अगोदर ही इच्छा होती, मात्र आता परत आले आनंद आहे. या ट्रिपल इंजिन सरकारची उलटी गिनती सुरू आहे.सत्तेमधला आमदार नाही तर उपसभापती मंत्रालययात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो हे किती दुर्दैव आहे. अतिथी देवो भव, त्यांचं स्वागत केलं पाहिजे, पंतप्रधान यांनी यावे पण माझ्या अपेक्षा आहेत की महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत, उपसभापती असणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राला शोभणार नाही,त्यांनी याकडे लक्ष घालावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Rahul Gandhi Kolhapur Live: राहुल गांधी कोल्हापूरमध्ये दाखल

राहुल गांधी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. राहुल गांधी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.

Pune News Live: आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लीमेट्री बोर्डची बैठक

आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पार्लियमेट्री बोर्डाची बैठक होणार आहे. आज शरद पवार बैठकीला उपस्थित असणार आहेत. आजच्या बैठकीत उमेदवारांवर चर्चा होणार आहे. पक्षाच्या उमेदवारांवर चर्चा करुन यादी फाइनल होणार आहे. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, वंदना चव्हाण बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत.

Pune Vanchit News: पुण्यात वंचितच्या नऊ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल...

शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणात जप्त केलेल्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह नऊजणांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वाहनाची तोडफोड केली होती.

PM Modi In Mumbai Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याच लोकार्पण होणार आहे. यामुळे मुंबईच्या लोकलवरील भार कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास देखील सुखकर होणार आहे. आरे ते बीकेसी स्थानकात सकाळी ६ ते रात्री १० या वेळात मेट्रो धावणार असून त्याचे दर सर्वसामान्य लोकांना परवडतील असेच ठेवण्यात आले आहेत.

PM Modi LIVE : पंतप्रधान मोदींच्या पोहरादेवी दौऱ्यात पोलिसांचा ढिसाळ कारभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोहरादेवी दौऱ्यात पोलिसांच्या नियोजनात मोठा गोंधळ झाला. पंतप्रधानांच्या दौऱ्यातच पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. बंजारा समाजाच्या नागरिकांच्या येण्यावर अनेक ठिकाणी निर्बंध आहे. पोलिसांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका प्रसार माध्यमांनाही बसला. पोलिसांच्या सुरक्षेतील गलथानपणामुळे सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना ५ ते ६ किलोमीटर पाटपीट करावी लागत आहे.

Vinesh Phogat LIVE : काँग्रेस उमेदवार विनेश फोगट यांनी जनतेला केलं मतदान करण्याचं आवाहन

जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार विनेश फोगट या चरखी दादरी येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचल्या आहेत. फोगट म्हणाल्या, "हरियाणासाठी हा एक मोठा सण आणि राज्यातील लोकांसाठी खूप मोठा दिवस आहे. मी राज्यातील जनतेला आवाहन करत आहे की, त्यांनी बाहेर पडून मतदान करावं."

Raj Thackeray LIVE : मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगरात दाखल

मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे देखील आहेत. ते मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील मनसे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. जिल्हानिहाय बैठक झाल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते नाशिककडे रवाना होणार आहेत.

Olympic Medalist Manu Bhaker LIVE : पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावताना काय म्हणाली ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर?

हरियानामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावताना ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर म्हणाली, "या देशातील तरुण असल्याने, सर्वात अनुकूल उमेदवाराला मतदान करणं ही आमची जबाबदारी आहे. मी पहिल्यांदाच मतदान केलंय."

Rain Alert : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा

आज (ता. ५) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील यलो अलर्ट जारी केला आहे.

Sachin Kurmi LIVE : भायखळ्यात झालेल्या हल्ल्यात अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाचा मृत्यू

भायखळ्यात झालेल्या हल्ल्यात अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाचा मृत्यू झाला आहे. सचिन कुर्मी असे मृत पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सचिन कुर्मी यांच्यावर म्हाडा काॅलनीत धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला.

Nagpuri Gate Police Station LIVE : अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक झालीये. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर करण्यात आला. हिंसक जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 29 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत तणावपूर्ण शांतता आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Haryana Assembly Elections LIVE : हरियानामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

नवी दिल्ली : हरियानामध्ये आज (ता. ५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा, माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान, प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट, माजी खासदार श्रुती चौधरी, ब्रिजेंद्र सिंग, अनिल वीज यांच्यासह १०३१ उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

PM Narendra Modi LIVE : महिला सशक्तीकरण अभियानासाठी पंतप्रधान मोदी आज ठाण्यात येणार

कासारवडवली येथे महिला सशक्तीकरण अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे शहरात येत आहेत. या कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील जड-अवजड वाहनांची वाहतूक मध्यरात्री एकपासून दुसऱ्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

Rahul Gandhi LIVE : राहुल गांधी आज येणार कोल्हापुरात, कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं होणार अनावरण

Latest Marathi Live Updates 5 October 2024 : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. गांधी कालच दिल्लीतून कोल्हापुरात येणार होते. मात्र, विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला. आता कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हरियानामध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील वाशिमला भेट देणार आहेत. या शिवाय, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली. ‘कोरोनामुळे यापूर्वी रद्द झालेले १०१ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन कोल्हापुरातच होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT