Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Updates : दसऱ्यानंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; येथे घेणार सभा

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Live : दसऱ्यानंतर राहुल गांधी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर; येथे घेणार सभा

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच पुढच्या आठवड्यात राहुल गांधी यांचा नांदेड आणि चिमूर दौरा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी जाहीर सभा होणार असून विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेसचं ‌विशेष लक्ष असणार आहे.

Ratan Tata Health Live : रतन टाटांची तब्येत बिघडली! रुग्णालयात केलं दाखल

उद्योजक रतन टाटा यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live : छत्रपती संभाजीनगर 'बौद्ध लेणी बचाव'साठी लोकांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक मोठ्या संख्येने बौद्ध लेणी बचावसाठी लोक जमले आहेत.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या हस्ते झाले साहित्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोध चिन्हाचे अनावरण झाले

Badlapur Crime Live: महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना दिलासा

महिला पत्रकाराला शिवीगाळ प्रकरणी शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

Sambhajinagar : Live: थोड्याच वेळात निघणार बुद्धलेणी बचाव मोर्चा

छत्रपती संभाजीनगरात थोड्याच वेळात बुद्धलेणी बचावसाठी मोर्चा निघणार आहे. शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे.

Nagpur News Live : देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवस्थानी इच्छुकांची गर्दी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवस्थानी असलेल्या कार्यालयात आज कार्यकर्ते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.

Mahim Fire Live: माहीम परिसरातील इमारतीला आग

मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या मोहित हाइट्स इमारतीला आग लागली असून, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

India-Maldives Live: "भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे काहीही करणार नाही"

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांमध्ये सतत तणाव आहे. तथापि, दोन्ही देश आता संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारत दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत पाऊल ठेवताच ते म्हणाले की, मालदीव भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे काहीही करणार नाही.

Pimpri Politics LIVE : पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का? माजी नगरसेविका सीमा साबळे शरद पवारांच्या भेटीला

पिंपरी विधानसभेत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा साबळे यांनी शरद पवारांची भेट घेत असल्याची चर्चा आहे. शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक आहेत. शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्या मोदी बागेत दाखल झाल्या आहेत.

Yogi Adityanath LIVE : 2025 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे क्षेत्र दुप्पट असेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती

प्रयागराज (उत्तर प्रदेश) : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. २०१२ च्या तुलनेत २०२५ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे क्षेत्र दुप्पट असेल, असेही आदित्यनाथ यांनी सांगितले.

Mohit Heights Building Fire LIVE : मुंबईतील मोहित हाइट्स इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या मोहित हाइट्स इमारतीला भीषण आग लागलीये. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मुंबई अग्निशमन दलाने सांगितले.

Rain Alert LIVE : राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरु होणार; आज 'या' जिल्ह्यांना झोडपणार

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्यानं सांगितलंय.

Hema Malini LIVE : नवरात्रीनिमित्त भाजप खासदार हेमा मालिनींनी मथुरेत सादर केले नृत्यनाट्य

उत्तर प्रदेश : अभिनेत्री आणि मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मथुरेत नवरात्रीच्या निमित्ताने नृत्यनाट्य सादर केले. त्यांनी सादर केलेल्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Karad News : हजारमाचीतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कराड : मसूरजवळील रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. प्रसाद अशोक खुंटाळे (वय 27, रा. सिद्धिविनायक कॉलनी, हजारमाची ता.कराड) असे संबंधित मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Jinnah International Airport LIVE : जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भीषण स्फोट, तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू, 17 जण जखमी

कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १७ जण जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या जिओ न्यूजने वृत्त दिले आहे.

Kolkata Doctor Case LIVE : महिला डॉक्टरचा अत्याचार करून खून केल्याप्रकरणी कनिष्ठ डॉक्टरांचे बेमुदत उपोषण अद्याप सुरूच

कोलकता : कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिला डॉक्टरचा अत्याचार करून खून केल्याप्रकरणी कनिष्ठ डॉक्टरांचे बेमुदत उपोषण अद्याप सुरूच आहे. कोलकत्याच्या मध्यभागी असलेल्या धरमताला परिसरात त्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी सहभागी झालेले अनेक वरिष्ठ डॉक्टरही कनिष्ठ डॉक्टरांबरोबर उपोषणात सहभागी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मागण्या पूर्ण न केल्याने कनिष्ठ डॉक्टरांनी शनिवारी (ता.५) रात्रीपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे.

Bhuibawada Ghat LIVE : भुईबावडा घाट रविवारपर्यंत बंद राहणार

Latest Marathi Live Updates 7 October 2024 : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झालेल्या भुईबावडा घाटातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी या घाट मार्गातील अवजड वाहतूक रविवार (ता. १३) पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच भारत हे हिंदू राष्ट्र असून हिंदूंनी धर्माच्या संरक्षणासाठी भाषा, प्रांत आणि जातिभेद दूर सारून एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेय. लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलेले प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शेख जानी बाशा ऊर्फ जानी मास्टर यांना जाहीर झालेला राष्ट्रीय पुरस्कार केंद्र सरकारने परत घेतला आहे. इंदापुरात आज हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तर, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्बेत बिघडली; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात केले दाखल? नेमकं सत्य काय

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं कारण काय?

Raj Thackeray Nashik Daura : महाआघाडी-महायुतीवर जनता नाराज, तुम्‍हाला विजयाची संधी, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आत्मविश्वास

SBI Jobs: लागा तयारीला! SBI देणार 10 हजार नोकऱ्या, बड्या अधिकाऱ्याने सांगितले कोणती पदे भरणार

नवं नाटक नवा प्रवास, भाऊ कदम बनणार सिरियल किलर; 'या' दिवशी होणार शुभारंगाचा प्रयोग

SCROLL FOR NEXT