Latest Maharashtra News live Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Latest Maharashtra News Live Updates: डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांकडून अभिवादन

सकाळ वृत्तसेवा

Satara Live: डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांकडून अभिवादन

रविवारी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती आहे. याच निमित्ताने साताऱ्यातील त्यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले.

वडीगोद्रीत ओबीसी आंदोलक रस्त्यावर

आमचे एक तत्व आहे की, जर आपल्याला शांततेने जगायचे असेल, तर आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध असले पाहिजेत- राजनाथ सिंह म्हणतात

एका सार्वजनिक रॅलीला संबोधित करताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणतात, "... आमचे एक तत्व आहे की, जर आपल्याला शांततेने जगायचे असेल, तर आपले शेजाऱ्यांशी चांगले संबंध असले पाहिजेत. आपल्याला आपल्या सर्वांशी चांगले संबंध हवे आहेत. शेजारी देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत आणि आम्ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर ते भारताच्या भूमीवर दहशतवाद सुरू करणार नाहीत त्यांच्यासोबत..."

Pune Live : वडगाव शेरी येथे दोन तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

वडगाव शेरी येथे मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त रविवारी सकाळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मिरवणूक रथावर चढवून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जकरिया बिलाल शेख वय वीस वर्ष (राहणार पीएन आमदार शाळेजवळ वडगाव शेरी) आणि अभय वाघमारे (वय १७, राहणार वाडेश्वर नगर, वडगाव शेरी) अशी अशी दोन तरुणांची नावे आहेत.

Sharad Pawar : महाविकास आघाडीत जागा वाटपात समन्वय चांगला;  शरद पवार

महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक ही आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. या निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी पुर्णपणे तयारीला लागली आहे. एकाबाजूला रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरु असल्या तरी महाविकास आघाडीत जागा वाटपात चांगला समन्वय आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.

Dhangar Reservation Live : मोहोळमध्ये  धनगर समाजाचा उद्या रास्ता रोको

मोहोळ : मोहोळ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने सोमवारी (ता. २३) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार व पोलिस निरीक्षकांच्या नावे देण्यात आले.

Satypal Malik Live: सत्यपाल मलिक यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

जम्मू आणि काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Pune EY Live: सीए तरुणीचा मृत्यू, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल

पुण्यात केरळमधील एका चार्टर्ड अकाउंटंट मुलीचा खाजगी कंपनीत कामाच्या कथित भारामुळे मृत्यू झाला होताा. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून याची दखल घेतली.

PM Modi In US: मोदींनी बायडन यांना दिली चांदीमध्ये हातानं कोरलेली रेल्वेगाडीची प्रतिकृती भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना चांदीमध्ये हातानं कोरलेली रेल्वेगाडीची प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती दुर्मिळ असून चांदीच्या वस्तू तयार करणाऱ्या महाराष्ट्रातील कारागिरांनी कुशलतेनं तयार केली आहे.

Maratha Reservation Live : मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजी नगरमध्ये सकल मराठा समाजाने रस्ता रोको केल्याप्रकरणी आता पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे.

Kolhapur Live: कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला करवीर पोलिसांनी केली अटक

कायदेशीरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या एकाला बाचणी येथून करवीर पोलिसांनी अटक केलीय. ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड जप्त केलंय. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने बाचणी येथे ही कारवाई केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरु आहे जरांगे यांची प्रकृती खालवत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

girni kamgar Live: गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन बसणार

गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

Delhi Arvind Kejriwal Live: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज जनता की अदालत आहे. सकाळी 11 वाजता जंतर-मंतरवर जनता की अदालतचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच केजरीवाल संबोधन करणार आहेत. अरविंद केजरीवाल काय बोलणार याकडे संपूर्ण दिल्लीचे लक्ष लागणार आहे.

Pune News Live: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठेत रस्त्यावर उभी केलेल्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दहशतवाद माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड केली जात आहे. एका चार चाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली असून काही वाहने या परिसरात फोडले आहेत का याचा तपास पोलिस करत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील परिसरातील गाडीची तोडफोड करण्यात आलीये.

Manoj Jarange Patil Agitaion Live: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत चालली आहे, त्यांच उपोषण तात्काळ संपावं या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत, आज त्यांच शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे,

Mumbai Airport News Live: मुंबई विमानतळावरून कोट्यावधींचं सोन आणि हिरे जप्त

मुंबई विमानतळावरून कोट्यावधींच सोनं आणि हिरे जप्त करण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १.५८ कोटी रुपये तसेच १.५४ कोटी रुपयांचे हिरे जप्त करण्यात आले. कमरेच्या पट्ट्यात तसेच परिधान केलेल्या कपड्यातून तस्करी सुरू होती.तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एकूण २.२८६ किलो सोन जप्त करण्यात आले आहे, तसेच १३ लाख ७० हजारांच एक रोलेक्स घड्याळ देखील जप्त करण्यात आलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताकडे चीनला मागे टाकत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची संधी; जाणून घ्या काय आहेत समीकरणे

Nitin Gadkari :... अन्यथा 'हे' दोन रस्ते ताब्यात घेऊ; नितीन गडकरींनी राज्य सरकारला दिला तीन महिन्यांचा वेळ

TRAI Marketing Calls : मार्केटिंग कॉल्सच्या त्रासाला म्हणा रामराम; TRAIने लागू केला एकदम भारी नियम,एकदा बघाच

Kiran Mane : तिकळी मालिका सोडून किरण मानेंची कलर्स मराठीवर एंट्री ; या मालिकेत करणार काम

Video: आपण PM मोदींसोबत आहोत हेच विसरले बायडेन; फजितीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT