Maharashtra MLC Election MVA Esakal
महाराष्ट्र बातम्या

MLC Election: "काँग्रेसचे 4 आमदार क्रॉस व्होटिंग करणार," जयंत पाटलांच्या खळबळजनक विधानानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चिंतेत

Jayant Patil: शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवत संभाव्य क्रॉस व्होटिंग टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

आशुतोष मसगौंडे

राज्यात आज 11 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये विधानसभेचे आमदार मतदान करणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार हे निश्चित असले तरी क्रॉस व्होटिंगमुळे यामध्ये मोठा उलठफेर होऊ शकतो. अशात सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांनी सुरक्षित ठिकाणी ठेवत घोडेबाजार टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

असे असले तरी काँग्रेसचे चार आमदार आहेत, जे महाविकास आघाडीला मतदान करणार नाहीत अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

दरम्यान या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात आहेत. यात काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी खळबळजन दावा केला आहे. ते म्हणाले की, "या निवडणुकीत काँग्रेसचे असे तीन ते चार आमदार आहेत ते क्रॉस व्होटिंग करणार आहेत. कारण ते फक्त कागदोपत्रीच काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आमच्यात मोजत नाही."

जयंत पाटलांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली असून, यामध्ये कोणाशी दगाफटका होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महायुतीलाही धसका

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत भाजपची महायुतीही मजबूत दिसत आहे. महायुतीचा 11 पैकी 9 जागांवर विजय जवळपास निश्चित मानला जात आहे, परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेनेचे काही आमदार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे काही आमदार महाविकास आघाडीला मतदान करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महायुतीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

घोडेबाजार टाळण्यासाठी आमदार हॉटेलमध्ये

शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवत संभाव्य क्रॉस व्होटिंग टाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे कोणत्याही आमदारावर बाहेरून दबाव टाकता येणार नाही. याचबरोबर घोडेबाजारही टाळता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT