Maharashtra MLC Election Live Updates Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra MLC Election Result News Updates : काँग्रेसची ८ मते फुटली, विधान परिषदेचा संपूर्ण निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra MLC Election Result : काँग्रेसची ८ मते फुटली, विधान परिषदेचा संपूर्ण निकाल जाहीर

सविस्तर वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा...

Girish Mahajan Live: विधानसभेआधी महाराष्ट्रात मोठा चमत्कार घडणार- गिरीश महाजन

महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीचे नेते मोठ्याप्रमाणात फुटली आहेत. महाविकास आघाडीचे कोण हरले हे काही वेळेत कळेल. क्रॉस वोटिंग झाले आहे..
पण एक नक्की की येत्या विधानसभेआधी महाराष्ट्रात मोठा चमत्कार घडणार आहे. 

Sunil tatkare live: उंबरठा ओलांडून आम्ही चार पावलं पुढे गेलो - सुनिल तटकरे

सुनिल तटकरे म्हणतात, "उंबरठा ओलांडून आम्ही चार पावलं पुढे गेलो." त्यांच्या मते, अनेक अदृश्य शक्ती आहेत ज्या पुढच्या काळात त्यांना मदत करतील. आमदारांचा अभिमान व्यक्त आहे आणि आणखी मिळालेल्या मतांचे आभार मानले.

MLC Election Result Live: भाजपचे योगेश टिळेकर विजयी

MLC Election Result Live :  समान पसंती दिल्यामुळे एक मत बाद

समान पसंती दिल्यामुळे एक मत बाद झाले आहे.

MLC Election Result Live :  पंकजा मुंडे यांना ६ मतं मिळाली

भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना ६ मतं मिळाली आहे.

Maharashtra MLC Election Result Live : मिलिंद नार्वेकर आठ मतांनी आघाडीवर

मिलिंद नार्वेकर आठ मतांनी आघाडीवर आहेत

MLC Election Result Live :  पहिलं मत योगेश टिळेकरांना मिळालं, तिसरं मत प्रज्ञा सातव यांना

पहिलं मत योगेश टिळेकरांना मिळालं, तिसरं मत प्रज्ञा सातव यांना मिळालं. तर मिलिंद नार्वेकर यांना ४ मते मिळाली आहेत.

MLC Election Result Live :  मतमोजणी सुरवात मत पेटी ओपन करण्यात आल्या, थोडाच वेळात निकाल

मतमोजणी सुरवात मत पेटी ओपन करण्यात आल्या, थोडाच वेळात निकाल लागणार आहे. निवडणूक प्रतिनिधींना सुचना वाचून दाखवण्यात आल्या.

MLC Election Result Live : परवानगी न आल्यानं मतमोजणी सुरु होण्यास विलंब

मतमोजणी परवानगी न आल्यानं मतमोजणी सुरु होण्यास विलंब होत आहे. अधिकारी मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीची प्रतिक्षा करत आहे.

MLC Election Result Live: ५ वाजता होणार मतमोजणीला होणार सुरुवात

५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विजयासाठी २३ मतांचा कोटाला लागणार आहे. मतदान पेटी सिल करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाला मतमोजणीसाठी परवानगी नियमानुसार घेतली जाणार.

MLC Election Live : बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी केलं मतदान, २७४ आमदारांचं मतदान पूर्ण

बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांनी मतदान केलं आहे. २७४ आमदारांचं मतदान पूर्ण झालं. आता काही मिनिटात निकाल येणार आहेत.

Maharashtra MLC Election Result Live : विधानपरिषद निवडणूक निकालासाठी उरले फक्त काही मिनिट

राज्यात आत विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. आता काही मिनिटात निकाल जाहीर होणार आहे.

MLC Election update live:बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार मतदानासाठी दाखल

बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार विधान परिषदे मतदानासाठी आले आहेत.

MLC Election live: मतदानासाठी शेवटचा १ तास, ४ आमदारांचं मतदान अद्याप बाकी

मतदानासाठी केवळ एक तास बाकी असताना शेवटचे ४ आमदार बाकी आहेत.

MLC Election Live: दुपारी २ वाजेपर्यंत २६९ एकूण मतदान

दुपारी २ वाजेपर्यंत २६९ एकूण मतदान झाले. गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, यांच्यासह तीन आमदारांचे मतदान बाकी आहे.

Maharashtra MLC Election Live News Updates : गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी

कारागृहात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांना निवडणूक आयोगाने मतदान करण्याची परवानगी दिली आहे.

MLC Election: रातभर दिल की धडकने जारी रहती है... शायरी म्हणत काँग्रेस आमदाराने केले मतदान

"रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम जिम्मेदारी रहती है," अशी शायरी म्हणत काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदान केले.

MLC Election Live News: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा अधिकार

विधान परिषद निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

MLC Election Live: शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडांना मतदान करू दिले नाही

शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याने तुरुंगात असलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड आज विधान परिषद निवडणुकीसाठी विधान भवनात आले आहेत. पण त्यांना काँग्रेसच्या आक्षेपानंतर मतदान करू दिलेले नाही.

MLC Election Live: शिंदे गटाच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण

विधान परिदेष निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे.

MLC Election Live: विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपच्या 97 आमदारांचे मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपच्या 97 आमदारांचे मतदान पार पडले आहे. याचबरोबर भाजपला पाठिंबा देणाऱ्या 9 अपक्ष आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra MLC Election Live: शहाजी बापूंचे मतदान हुकण्याची शक्यता?

राज्यात आज विधान परिषद निवडणुकांसाठी मतदान आहे. प्रत्येक पक्ष एकाएका मतासाठी प्रयत्न करत असताना, शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील रुग्णालयात असल्याने त्यांची मतदान हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला याचा फटका बसू शकतो.

MLC Election Live: ठाकरेंची पॉवर वाढली! 'हा' आमदार करणार नार्वेकरांना मतदान

विधान परिषद निवडणुकीत डहाणूचे माकप आमदार विनोद निकोले हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार आहेत. ते सध्या ठाकरेंच्या आमदारांसोबत हॉटलेमध्ये आहेत.

MLC Election Live: काँग्रेसच्या 10 आमदारांची मते फुटणार, भाजप आमदाराचा दावा

आज होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 10 आमदारांची मते फुटणार असल्याचा दावा भाजप आमदार संजय कुटे यांनी केला आहे.

Ganpat Gaikwad: गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, काँग्रेसची अधिकाऱ्यांकडे मागणी

गोळीबार केल्या प्रकरणी सध्या कारागृहात असलेले आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करू देऊ नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Maharashtra MLC Election NCP MLA Live: राष्ट्रवादीचे सर्व आमदार मतदानासाठी विधान भवनात

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात दाखल झाले आहेत.

Maharashtra MLC Election Live: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मतदानासाठी रवाना

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार मतदानासाठी विधान भवनाकडे रवाना झाले आहेत.

MLC Election Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे.

MLC Election: मतदानाची वेळ वाढवा ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी

ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ एका तासांनी वाढवावी अशी मागणी केली आहे. करण सध्या मुंबईत मुसळधार पाऊस असून त्यामुळे आमदारांना विधीमंडळात मतदानासाठी वेळेत पोहचण्यात अडचणी येऊ शकतात असे नार्वेकरांचे म्हणणे आहे.

MLC Election Candidate List Live: विधान परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून कोण? वाचा उमेदवारांची यादी

भाजपाचे उमेदवार

  1. पंकजा मुंडे

  2. अमित बोरखे

  3. परिणय फुके

  4. सदाभाऊ खोत

  5. योगेश टिळेकर

शिवसेना (एकनाथ शिंदे)

  1. कृपाल तुमणे

  2. भावना गवळी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

  1. शिवाजीराव गरजे

  2. राजेश विटेकर

काँग्रेस

  1. डॉ. प्रज्ञा राजीव सातव

शेतकरी कामगार पक्ष (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा)

  1. जयंत पाटील

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  1. मिलिंद नार्वेकर

Shiv Sena UBT Live: मतदानापूर्वी 'असा' आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल.

यासाठी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सकाळी 9 वाजता हॉटेलमध्ये येणार असून, ते आमदारांना मार्गदर्शन करतील. यानंतर सकाळी 9.30 च्या सुमारास सर्व आमदार एकत्रित विधानभवनच्या दिशेने निघणार आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे काल रात्रीपासूनच हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर रात्री उशिरा ITC ग्रँड या हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना मार्गदर्शन केले आहे.

Devendra Fadnavis Live: फडणवीसांकडून भाजप आमदारांना मतदान कसं करायचे याचे मार्गदर्शन

विधानपरिषद निवडणूकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमिवर सर्व भाजप आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मतदान कोणाला आणि कसं करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

MLC Election Live: विधान परिषदेत छोट्या पक्षांची मते ठरणार गेमचेंजर

आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे एकूण 3 आमदार मतदान करणार आहेत. त्यांनी जर महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता आणखी वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमची रणनीती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

याशिवाय बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि इतर असे एकूण ६ आमदार आहेत. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि विरोध याचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीच्या विजयावर होऊ शकतो.

MLC Election Congress Whip Live: काँग्रेस आमदारांना पक्षाकडून व्हीप

आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. या व्हिपमध्ये आमदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

MLC Election Live: विधान परिषदेसाठी आज मतदान, 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात

राज्यात आत विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असून, यासाठी सकाळी 9 वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी निकाल लागणार आहे.

सध्या देशभरातील विविध भागांत जोरदार पाऊस होत असून, राज्यातील विविध भागांनाही पावसाने झोडपले आहे.

मराठा आरक्षणाच्या संबंधीत विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाड्यात शातता रॅली सुरू आहे.

या सर्व घडामोडींसह देश विदेशासह क्रीडा, मनोरंजन आणि शिक्षण क्षेत्रातील विविध बातम्या एका क्लिकवर वाचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT