शिंदे गटातील लोकांना खाती कशी मिळाली कशी हे सर्वांना माहीत आहे. शिंदे गटाला निधी कमी मिळाला पण यात मला काही पडायचं नाही. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदतची मागणी केली आहे. आज अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावी अशी आमची मागणी आहे, असं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितलं.
विधान परिषद सभागृह नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिंदे सरकारने २५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मांडल्या. जनतेतून थेट सरपंच आणि नगराध्यक्ष यांच्या निवडी संदर्भातील विधेयक , प्रभाग रचना विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं.
पुरवण्या मागण्याच्या माध्यमातून कोणत्या विभागाला किती निधीच्या मागण्या?
गृह विभाग - १५९३ कोटी
सार्वजनिक बांधकाम - ५९३ कोटी
नगर विकास - ८८६ कोटी
कृषी, दुग्ध व्यवसाय - १३६१ कोटी
ग्रामविकास - १३०१ कोटी
सामाजिक न्याय - २६४२ कोटी
सार्वजनिक आरोग्य - २२३७ कोटी
सहकार - ५१४५ कोटी
महिला व बाल विकास - १६७२ कोटी
आणीबाणी अटक झालेल्यांना पेन्शन - ११९ कोटी
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी - ७५ कोटी
बाळशास्त्री जांभेकर योजना - १५ कोटी
वेळेत कर्जफेड करणार्या शेतकऱ्यांना - ४७०० कोटी
एसटी विशेष सहाय्य - १ हजार कोटी
इलेक्ट्रीक वाहनांसाठी प्रोत्साहन पर निधी - १०० कोटी
खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, असा टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यासोबत शिंदे गटात निष्ठेला कुठेही स्थान नाही. सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. तिथे जाऊन आमदार फसलेले आहेत. अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत..जर यायचे तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुर्मू यांच्या निवडीने देशाची मान उंचावल्याची भावना व्यक्त केली आहे. मूर्मू यांच्या निवडीने जगाला संदेश मिळालाय, असंही शिंदे म्हणाले.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेत्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. 'ईडी सरकार हाय हाय', बेकायदा सरकार, '५० खोके, एकदम ओक्के' अशा घोषणा दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.
भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या नव्या ट्वीट्सची अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक नेता देशमुख, मलिक यांच्यासोबत तुरुंगात जाणार असं म्हणत मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याच्या तपासाची मागणी केली आहे. त्यावरुन आता जोरदार चर्चा रंगत आहेत. हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. त्याचसोबत विरोधी पक्षनेतेही दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे येणार नसल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी विधिमंडळात हजेरी लावली आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा तिसरा टप्पा आज रायगड इथं आहे. आजच्या एक दिवसीय दौऱ्या दरम्यान अलिबाग आणि महाड येथे 'शिव संवाद' होणार आहे. आता या दौऱ्यामुळे आदित्य ठाकरे अधिवेशनाला पहिल्याच दिवशी दांडी मारणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाने होईल. त्यानंतर विधेयकं मांडली जातील आणि शोक प्रस्तावाने आजच्या दिवसाची सांगता होईल.
आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी १० वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशनासाठीची रणनीती ठरवण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडची खाती इतर मंत्र्यांनी विभागून दिली आहेत. आपल्या मूळ विभागाची कामं सांभाळून हे मंत्री मुख्यमंत्री शिंदेंकडच्या विभागाचीही कामं पाहतील. ही यादी खालीलप्रमाणे -
माहिती व तंत्रज्ञान - उदय सामंत
परिवहन - शंभूराज देसाई
पणन - दादा भुसे
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य - संजय राठोड
मृदा व जलसंधारण - तानाजी सावंत
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन - अब्दुल सत्तार
पर्यावरण व वातावरणीय बदल - दीपक केसरकर
अल्पसंख्याक व औकाफ - संदीपान भुमरे
Maharashtra Monsoon Assembly Session Live: आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळेल. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, वादग्रस्त नेते, आमदार, निर्णयांना दिलेली स्थगिती, ओल्या दुष्काळाची मागणी अशा सगळ्या कारणांमुळे यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.