Monsoon Session LIVE Sala;
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session: पडळकरांना शिक्षा ते गोऱ्हे अन् जगताप यांच्यात खडाजंगी; जाणून घ्या अधिवेशनात दिवसभरात काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

गोपिचंद पडळकरांवर सभापती नीलम गोऱ्हे भडकल्या

भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्या वर्तुणुकीवरुन सभापती नीलम गोऱ्हे या चांगल्याच भडकलेल्या पहायला मिळाल्या. दोघांमध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध पहायला मिळालं. चिडलेल्या गोऱ्हेंनी मार्शल बोलावून पडळकरांना बाहेर काढावे लागेल, असं सांगत पडळकरांना त्यांच्या वर्तणुकीबद्दल उद्या सभागृहात बोलू न देण्याची शिक्षा ठोठावली.

सभापतींचा रुद्रावतार पाहत गोपिचंद पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांची शिक्षा कायम राहणार आहे. निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त करत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी ताकीद सर्व सदस्यांना दिली.

मुंबईत उद्या शाळांबरोबर कॉलेजेसलाही सुट्टी जाहीर

हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरांसाठी उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं इथल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळांसह कॉलेजेसनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली.

शाळांबरोबरच कॉलेजलाही सुट्टी जाहीर करा - कायंदे

बारावीपर्यंत उद्या मुंबईत पावसाचा रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आल्यानं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पण फक्त बारावीपर्यंतच्या शाळांनाच अशा वेळी सुट्टी जाहीर केली जाते. पण वरिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली जात नाही. पण पावसाचा त्रास या विद्यार्थ्यांना देखील होतो. त्यामुळं शालेय शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांनी मिळून उद्या याबाबत सविस्तर निर्णय जाहीर करावा अशी मागणी विधानपरिषदेत मनिषा कायंदे यांनी केली.

विधानपरिषदेत सुरेश धस यांच्याकडून महसूल मंत्र्यांचे अभिनंदन

जमीन मोजणी प्रकरणी आणि तहसीलदार, तलाठी भरती आणि रिक्त नसलेल्या जागेच्या मुद्द्यावरून आमदार सुरेश धस यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं अभिनंदन केलं आणि पुरवण्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

विधानसभेचे कामकाज संपले

पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवसाचे विधानसभेचे कामकाज संपले असून उद्या सकाळी ९ वाजून ४५ मिनीटांनी कामकाजाला सुरूवात होणार आहे.

विधानसभा लक्ष वेधी

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सर्व संबधित संस्थांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यावरच्या लक्ष वेधी सूचनेवर केली. विद्या ठाकूर यांनी ती उपस्थित केली होती.

मुंबईत १५ हजार ४३८ घरे त्यांच्यासाठी बांधली जात आहेत, याशिवाय आणखी सात हजार घरांची निविदा लवकरच काढली जाईल.

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

निधी वाटपामध्ये अनेक मतदारसंघावर अन्याय झाला असून निधी देण्यात आला नाही असा आरोप करत काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहे.

निलम गोऱ्हे आणि भाई जगताप यांच्यात खडाजंगी

सभागृहात भाई जगताप यांना निलम गोऱ्हे यांनी बोलू न दिल्याने भाई जगताप चांगलेच संतापले. देवेंद्र फडणवीस यांनी बोला म्हणून विनंती केली तरी निलम गोऱ्हे यांच्या दिशेने हात करत भाई जगताप यांनी संतापाने आपलं म्हणणं मांडणे टाळलं आहे.

निलम गोऱ्हे यांना भाई जगताप यांचा टोला

निलम गोऱ्हे यांच्यात खूप बदल झाला आहे. आता त्यांना जे काम दिलं आहे, ते इमाने इतबारे करत आहेत असा टोला भाई जगताप यांनी मारला आहे.

"मी कुणालाही जाणीवपूर्वक थांबवत नाही. माझं काम मी करत आहे. उगाच राजकीय शेरेबाजी करू नका. जाणीवपूर्वक मला बोललेले चालणार नाही. भाई जगताप तुम्ही एकटेच बोलत बसा. मी माझे अधिकार वापरणार, मी काही कमकुवत नाहीये." असं उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्या खिशातील हातावरून हशा 

कृषी मंत्री धनंजय मुंडे हे कृषी विभागाचा डॅशबोर्ड तयार करण्याच्या संदर्भात सभागृहात बोलत असताना राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्यावर हरकत घेतली आणि "मंत्री महोदयांनी खिशातील हात काढावा" असं सांगितलं. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

गरोदर महिलेच्या मृत्यूवरून नाना पटोले सभागृहात आक्रमक

नाशिकमध्ये गरोदर महिलेचा मृत्यू झाला, सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या पण आदिवासी भागात रस्ते नाहीत, त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही काँग्रेसने सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मागण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? ज्यांच्याकडून आपण पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? असा खोचक सवाल नाना पटोले यांनी सभागृहात केला आहे.

विधान परिषद - पालिका अधिकाऱ्यांच्या संदर्भात गोऱ्हेंचे निर्देश

महापालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक सुरक्षेच्या प्रश्नावरून उपसभापती नीलम गोऱ्हेंनी पालिका अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीवरून नाराजी व्यक्त केली.

मुंबई पालिकेचे अनेक अधिकारी आमदारांना सोबत दुजाभाव करतात. पालिकेच्या अधिकाऱ्यांची मुजोर गिरी वाढली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कुठेही बदल्या होत नाहीत म्हणून असं घडत आहे. सरकारने योग्य दखल घ्यावी असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

विधानसभेत काँग्रेसच्या नेत्यांकडून सभात्याग

काँग्रेसच्या नेत्या वर्षा देशपांडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सभागृहात शाब्दिक चकमक झाली असून काँग्रेसच्या नेत्यांनी सभात्याग केला आहे.

अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मंजूरी

INDIA आघाडीकडून NDA सरकारवर अविश्वास प्रस्ताव ठेवण्यात येणार असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी मंजूरी दिली आहे.

बोगस बियाणे आणि खते विक्री संदर्भात मुद्दा सभागृहात उपस्थित

बोगस बियाणे आणि खते देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

गोंधळात कामकाजाला सुरुवात... विरोधी पक्षांचा लोकसभेत गोंधळ सुरूच

मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

BRS चे खासदार नामा राव यांनी देखील सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. NDA कडे सध्या 329 खासदार आहेत. तर विरोधात 142 खासदार आहेत. बहुमत 269 ला आहे.

जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा : विरोधकांची मागणी

जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. जत तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे, आम्हाला पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार असो, असमान निधी वाटप करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे.

९० मतदार संघाला निधी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार - विरोधकांच्या घोषणा

काल आमदारांना केलेल्या निधीवाटपावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. त्याचबरोबर आज ९० मतदार संघाला निधी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत.

पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस

पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून कालचा दिवस निधीवाटपावरून गाजला. आपल्याकडे आलेल्या आमदारांना सांभाळण्यासाठी सरकारने पुरवणी मागण्या मांडल्या असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेर थोरात यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT