Monsoon Session Day 3 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session Day 3 : पावसामुळं दोन्ही सभागृहांचं आजच कामकाज तहकूब; दिवसभरात काय घडलंय जाणून घ्या

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन २०२३

Sandip Kapde

विधानसभेचं कामकाज तहकूब

मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. काही ठिकाणी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचा खोळंबा होऊ नये, म्हणून विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

विधानसभेतील कर्मचाऱ्यांचा खोळंबा होऊ नये,विधानसभा तहकूब करण्याची थोरातांची मागणी 

विधानसभेत काम करणारे अनेक कर्मचारी मुंबईमध्ये राहतात. सध्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी लोकल सेवा बंदही करण्यात आली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात यावं, अशी मागणी केली.

विधान परिषदेचे कामकाज तहकूब

आज विधानपरिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, पाऊसाची स्थिती पाहून नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केल्याची घोषणा केली.

मुसळधार पावसामुळे कर्मचाऱ्यांचा खोळंबा -बाळासाहेब थोरात

मुंबई आणि उपनगरात वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सभागृहात काम करणारे अधिकारी कर्मचारी उपनगरात राहतात.त्यांची सोय करावी.मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची माहिती मिळतीये. अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

चंद्रपूर गडचिरोली सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. संपूर्ण राज्यात परिस्थिती खालावली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याने शहर भरली आहेत. याबद्दल नियोजन कराण्याची मागणी नाना पटोले यांनी केली.

मुंबईमधील मुसळधार पावसामुळे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, " मुख्य सचिव यांच्या मार्फत सर्व नियोजन केलं आहे. गरज पडेल ते सर्व करू. सचिवांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकता पडेल तर सर्वाची सोय करू."

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर अजित पवार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला

उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आता ते पक्ष कार्यालयाकडे रवाना झाले आहेत.

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात त्यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी दोन्ही सभागृहातील काही नेते देखील सोबत आहेत.

औरंगाबाद दंगलीप्रकरणी पोलिसांवर कारवाई करता येणार नाही - गृहमंत्री

- औरंगाबादमध्ये रोशनगेट राम मंदीर परिसरात अफवा होती

- त्या ठिकाणी जमाव जमला होता

- पोलिसांवरती दगडफेक झाली

- ज्याचा मृत्यू झाला तो निष्पाप नव्हता

- माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, त्या जमावात तो तरुण होता

- जमाव पांगवताना पोलिसांची गोळी त्याला लागली, यात पोलिसांवर कारवाई करता येणार नाही

तलाठी भरतीची मुदत वाढवली - देवेंद्र फडणवीस

तलाठी भरतीची मुदत वाढवली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव नसल्याने कांदे रस्त्यावर फेकून दिले. हे निदर्शनास आणून दिले तरी सरकारी उत्तरात म्हटलयं की, कांद्याला अनुदान मिळणार नसल्याने कांदा फेकला. मात्र अशी कोणतेही प्रकरण उघडकीस आले नाही. मग जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर पंचनामे केले, अशी खोटी उत्तर का दिली, असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केला

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अधिवेशनात छापिल उत्तर दिले आहे. विधान परीषद कामकाज तारांकित प्रश्नोत्तर यादीत ही माहिती दिली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी सरकारने ज्येष्ठ विधीतज्ञांची एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा घेतला निर्णय

तसेच, तर सरकारने क्युरेटिव्ह याचिका फेटाळली तरीही मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकारने मोठे पाऊल उचलले आहे

'क्युरेटिव्ह' याचिका फेटाळल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी एक समर्पित मागासवर्ग आयोग नेमले जाईल

सविस्तर वाचा-

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग

नेमकी उत्तर मिळत नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. बियाण्यांबाबत सरकारला प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देता आले नाही. बोगस बियाणे असल्याचे नंतर कळते आहे.

खतांच्या किमती आहेत त्यावर सुद्धा उत्तर आलं नाही. खताच्या किमती स्थिर नाहीत. नफेखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. राज्यात कर्जमाफीसुद्धा झाली नाही. सरकारने शेतकऱ्यांवर आणि खरिप हंगामावर पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

अजित पवार म्हणाले, खतांबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. केंद्राने खताच्या किंमतींवर नियंत्रण राहावे म्हणून एक लाख कोटी अनुदान दिले. १६४ मेट्रिक टन साठा बियाणे जप्त केले आहेत. गेल्या कॅबिनेटमध्ये कमिटी केली. या अधिवेशनात कायदा आणला जाईल. बोगस खत-बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होणार आहे.

खतांच्या किमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशना आज तिसरा दिवस आहे. आज खतांच्या किमतीवरुन विजय वडेट्टीवर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले. यावेळी दोघेही आक्रमक झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी दोघांना शांत केले.

सविस्तर वाचा -

विरोधकांना निधी का मिळत नाही?, यशोमती ठाकूर आक्रमक 

कुशलच्या पैशांवर सभागृहात गोंधळ सुरू आहे. यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला. विरोधकांना निधी का मिळत नाही, असे ठाकूर म्हणाल्या.

अजित पवार सत्ताधारी बाकावर बसून भाषा बदलत आहेत.

यावर आमदार संदिपान भूमरे म्हणाले, कुशलाचा नीधी सर्वांना मिळतो. विरोधकांचा आरोप चुकीचा आहे.

रोहित पवारांची सरकारवर टीका

कोकण आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. 21 जिल्हे अशे आहेत तिथेही पाऊस झाला नाही. मात्र याकडे सरकारचे लक्ष नाही.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री देखील दिसत नाहीत.

आपल्या राज्यात अत्याचार प्रमाण वाढले आहे. पुण्याचा विषय नाही तर राज्याचा विषय आहे. अमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. सरकार सुरक्षेच्या दृष्टीने कमी पडत आहे.

विधानसभा अधिवेशन LIVE

उद्धव ठाकरे आज विधान परिषदेत उपस्थित राहणार

उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता वाजता विधान भावनात येणार आहेत. विधान परिषद सभागृहात ते उपस्थित राहणार आहे. आजचे अधिवेशन वादळी ठरणार आहे.

महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता; विरोधकांच्या घोषणा

महिलाविरोधी कंलंकित घटनाबाह्य सरकारचा धिक्कार अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात आहेत.

राज्यातील पाच हजार महिला गेल्या कुठे गेल्या कुठे? महिला झाल्या बेपत्ता - सरकारला नाही पत्ता, अशा घोषणा विरोधक देत आहेत.

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

विधानभवानच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधक आंदोलन करत आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या सरकारच्या धिक्कार असो, अशा घोषणा विरोधक करत आहेत.

भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी - अंबादास दानवे

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपने सोमय्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली.

सविस्तर बातमी वाचा -

नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता

आज देखील सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हेंच्या उपसभापती पदासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. काल अंबादास दानवे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, हे मुद्दे गाजणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आज चर्चेत अनेक विषय शेतकऱ्यांशी निगडीत आहे. बी बीयाणे आणि खते किमती वाढ यावर चर्चा होणार आहे.

राज्यातील महीला मुलींवर आत्याचाराच्या प्रकरणात वाढ (महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर)

औरंगाबाद दंगल प्रकरण

शिवशाही बसला अचानक लागणाऱ्या आगी यावर चर्चा ( विधान परिषद)

सातारा जिल्ह्यातील सामुहीक बलात्कार प्रकरण सभागृहात आज गोंधळ होऊ शकतो (विधान परिषद )

महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. काल भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणात चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. आज नीलम गोऱ्हे अपात्रतेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील चर्चेत येऊ शकते.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल भाष्य केलं

अनेकांनी भाषणात मराठवाड्याबद्दल प्रेम व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT