विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहातही खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना नेते अदित्या ठाकरे यांनी केलेल्या गद्दार या शब्दाचा चांगलाच समचार घेतला.(Maharashtra Monsoon Session Deepak Kesarkar criticizes Aditya Thackeray )
अलिबाग येथे झालेल्या सभेत अदित्य ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झालंय. आज गद्दार अधिवेशनाला आले होते. पण ते नजरेला नजर भिडवू शकले नाहीत. त्यांची हिंमतही झाली नाही. कारण ते 40 जण गद्दार आणि निर्लज्ज आहे, अशी घणाघाती टीका केली. तसेच '50 खोके एकदम ओके' या घोषणेचाही समचार घेतला.
अदित्य ठाकरेंच्या या विधानांचा केसरकरांनी समचार घेतला. एकाच घरात दोन मंत्री का? हे बाळासाहेबांना मान्य असतं का? असे सवाल उपस्थित करत केसरकरांनी अदित्य ठाकरे यांनाही सुनावलं. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तरी गेलात का? अशी विचारणादेखील केसरकरांनी यावेळी केली.
गद्दार म्हणत भाषणं करत आहात. तुमच्याबद्दल आदर आहे पण तुम्ही असं बोलत राहिलात तर आम्हाला तुमची दुसरी बाजू समोर आणावी लागेल. अशा शब्दात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाना साधत सूचक इशारा दिला.
कोरोना काळात मृत्यूच्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं अशी शंका उपस्थित करत मध्यान्ह भोजन योजनेची चौकशी व्हावी. अशी मागणी केली.
तसेच '50 खोके एकदम ओके' या घोषणेचाही समचार घेतला. 50 खोके बद्दल मला माहिती नाही. पण 70 हजार खोक्यांबद्दल महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. पायऱ्यांवर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वाना आहे. पण आमच्या लोकांना पण सोबत घेऊन घोषणाबाजी करता. अनैसर्गिक युती आहे म्हणता एकत्र कशाला राहता. असा सवाल त्यांनी विरोधकांना उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.