Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: "तुम्हाला बहिणीविरोधात लढवले अन् बहिणीची योजना काढायला लावली" ; सभागृहात अजितदादांना कुणी दिला सल्ला?

Maharashtra Monsoon Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीनंतर काही लोकांना तीर्थस्थळावर जाण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटले होते. सरकारने ती तजवीज करुन ठेवलीय. पण विजयराव तुमच्यावर ती वेळ येणार नाही, असे शिंदे म्हणाले होते.

Sandip Kapde

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आज सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सरकारच्या अर्थसंकल्पावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर कठोर टीका केली. "मी फार आकडेवारीत जाणार नाही. जनता सर्व बघत होती. मुख्यमंत्र्यांचे भाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर होत की बजेटवर? मुख्यमंत्री कुरघोडी अर्थमंत्र्यांवर करत आहेत," असे ते म्हणाले.

वीजबिल आणि कर्जाचा मुद्दा-

विजय वड्डेटीवारांनी विचारले की, "अर्थसंकल्पात वीजबिलासाठी तरतूद केली का? की कर्ज काढणार? सर्व योजनेसाठी कर्ज काढावे लागेल, कारण तुमच्याकडे पैसे नाहीत. सरकारने सर्व थकीत बिले माफ करावीत. ६५ हजार कोटींचे वीजबिल माफ करावे."

महिला योजना आणि महागाईचा प्रभाव-

वड्डेटीवारांनी लाडकी बहिण योजना आणल्याबद्दल सरकारला दोष दिला. "महिला हुशार आहेत. महागाईने कंबरडे मोडलंय. साखर महाग, डाळी महाग, त्यांचा बजेट आज पाच हजाराने वाढला आहे. आणि तुम्ही सांगता दीड हजार रुपये देऊ. सरकारी पैशाने मत विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले.

उद्योग आणि रोजगाराचे प्रश्न-

वड्डेटीवारांनी उद्योग गुजरातला गेले असल्याचा आरोप केला आणि नवीन उद्योग येत नसल्याचे सांगितले. "किती रोजगार मिळणार हे सभागृहात सांगा," असे ते म्हणाले.

२६/११ बाबत विवाद-

वड्डेटीवारांनी २६/११ संदर्भात केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण दिले. "जे पुस्तकात आहे त्यावर मी बोललो. असे असेल तर त्या पुस्तकांवर बंदी घाला," असे त्यांनी म्हटले.

अजित पवारांना सल्ला-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीनंतर काही लोकांना तीर्थस्थळावर जाण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटले होते. सरकारने ती तजवीज करुन ठेवलीय.पण  विजयराव तुमच्यावर ती वेळ येणार नाही, असे शिंदे म्हणाले होते.

यावरुन वड्डेटीवारांनी अजित पवारांना सल्ला दिला, "दादा तुम्ही बजेट मांडला पण तुम्ही दबावाखाली आहात. भाजपने तुम्हाला आधीच अग्नीवीर केलं आहे का? दादा, तुम्ही सांभाळून राहा नाहीतर तुमची तीर्थयात्रा करून आणतील."

वड्डेटीवारांनी अजित पवारांना अजून टोला मारला, "योजना तुम्ही मांडण्याऐवजी त्यांनी मांडली. तुम्हाला बहिणीविरोधात लढवले आणि आता बहिणीची योजना काढायला लावली."

सामाजिक न्याय विभागातील भ्रष्टाचार-

वड्डेटीवारांनी सामाजिक न्याय विभागातील भ्रष्टाचारावरही भाष्य केले. "मागासवर्गीयांसाठी बजेट मधून काय दिलंय? अल्पसंख्यांक समाजावर तुमचा राग दिसतोय. सामाजिक न्याय विभागात भस्मासूर आहे," असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT