Maharashtra Weather And Rain Updates Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Updates: पुढील तीन दिवस पावसाचा धुमाकूळ, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

Maharashtra Rain Updates In Mumbai, Pune: अंदमानवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊसाचा धुमाकूळ असणार आहे.

आशुतोष मसगौंडे

Maharashtra, Pune And Mumbai Rain Updates:

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात मान्सूनचे पुनरागमन होणार आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अंदमानवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊसाचा धुमाकूळ असणार आहे.

दरम्यान हवामान विभागाच्या पुणे खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्तानातून परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आज गोवा आणि कोकण परिसरात तुरळक पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस राज्यांतील अनेक भागांत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

24 सप्टेंबर रोजी रायगड, परभणी, हिंगोली आणि नांदेड; 25 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, पुणे व 26 सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

सध्याच्या हवामान परिस्थितीनुसार प्रदीर्घ विश्रांतीनंतर सोमवारपासून मुंबईत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

या आठवडाभर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबरमध्ये रिमझिम आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: भारताला एकच विमान मिळेना, संपूर्ण संघाला एकत्र जाता येईना! BCCI चा जुगाड, रोहित शर्मा...

Kalyan East Assembly Election : विरोधी पक्षांकडून वोट जिहादचा नारा दिला जातोय; भाजपा नेता स्मृती इराणी यांचा आरोप

Ulhasnagar News : उल्हासनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त सचिन गोरे ॲक्शन मोडमध्ये; 18 गुंड केले तडीपार

Sambhaji Raje Chhatrapati: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु केवळ जिजामाता, संभाजीराजे छत्रपतींचे अमित शहांना उत्तर!

Amit Deshmukh : महाविकास आघाडीला लोकसभेपेक्षा अधिक कौल; अमित देशमुख यांचा विश्वास

SCROLL FOR NEXT