Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hanuman Chalisa Row LIVE| पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलले? जाणून घ्या प्रमुख मुद्दे!

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसैनिक आक्रमक झाले असून विविध भागांमध्ये हनुमान चालिसा वाजवण्यात आली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाईस सुरूवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलले? जाणून घ्या प्रमुख मुद्दे!

  • ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाहीत , तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागणार

  • मुंबई पोलीस या १३५ मशिदींवर काय कारवाही करणार आहेत ? हे एकदा समजू दे

  • कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार सरकारने करावा

  • तुम्ही प्रार्थना करा, धर्म तुमच्या घरात असायला पाहिजे

  • आम्हाला धार्मिक सलोखा बिघडवायचा नाही, पण तुम्ही धार्मिक घेतलं तर आम्हीही घेऊ

  • आपल्या घरच्या मिक्सरच्या आवाज इतकाच डेसीबल असावा

  • हा सामाजिक विषय.. जर त्यांनी हा विषय धामिर्क केला तर आम्हीही तसेच करू

  • हा विषय फक्त सकाळच्या अजान पुरता नाही. दिवसभरात जर त्यांनी परत अजान दिली. तर अमाचे लोक त्या त्या वेळेला हनुमान चालिसा वाजवणार

  • महाराष्ट्रतील ९०-९२ टक्के मशीदींमध्ये आज अजान झाली नाही

  • मौलवींना माझा विषय समजला

  • विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला होता. मशिदींमध्ये अजान लावणार नाही असं त्यांनी सांगितलं.

  • हा विषय क्रेडिट घेण्याचा नाही. हा सामाजिक विषय आहे

  • नांगरे पाटलांनी सांगितलं की ठराविक मशिदींवर अजान घेण्यास परवानगी दिली आहे. पण अनधिकृत मशिदींवर भोंगे बसवण्यात आलेत. त्याला सरकारने अधिकृतपणे परवानगी कशी दिली?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषदेतून राज ठाकरे पक्षाची भूमिका मांडत आहेत. या पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न घेतले जाणार नसून केवळ आपली आणि पक्षाची भूमिका मांडण्यात येणार आहे. काही सूचना तातडीने द्यायच्या असल्याने सहा वाजता नियोजित असलेली पत्रकार परिषद आपण एक वाजताच घेत आहोत, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.

...आणि संदीप देशपांडे पोलिसांच्या हातातून निसटले!

मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यानंतर बाहेर येत देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर तत्काळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना चालत जाण्याचा बहाणा केला. याच क्षणी देशपांडे यांचा ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचला. पोलीस पाठीमागे पळत असतानाचा देशपांडे यांनी गाडीत बसून थेट पळ काढला. शिवतीर्थ समोरच त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी दिली.

नवी मुंबईतील ऐरोली सेकटर 17 मधील जामा मशिदीसमोर हनुमान चालीसा म्हणण्या साठी आलेल्या मनसे पदाधिकाऱ्याना रबाले पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले, नवी मुंबई सह सचिव नितीन लष्कर, विभाग अध्यक्ष भूषण आगीवले, विध्यार्थी सेनेचे दशरथ सुरवसे अशा चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कासा वरोती येथील सुन्नी जामा मस्जिद बाहेर पोलीस बंदोबस्त असून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही.

Masjid in Navi Mumbai

पुण्यात महाआरती होताच मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

मनसेचे प्रवक्ते हेमंत संभूस यांना महाआरती झाल्या झाल्या लगेच अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय अजय शिंदे, विजय तनपुरे बाळा शेडगे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात पोलिसांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे.

राज्यात आज कुठेही कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झाली नाही. मुंबईत आजच्या आजानसाठी ११४० पैकी १३५ मशिदींनी भोंग्यांचा वापर केला. राज्यात आतापर्यंत १८ हजार कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस दिली आहे. आज महाराष्ट्रात सहा भागात अतिरिक्त पोलीस महासंचालक घटनास्थळी येत परिस्थितीचा आढावा घेत होते. ज्या १३५ मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन केलं आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या गृह विभागाने दिली आहे.

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाआरती करण्याचं ठरवलं होतं. यावर ठाम राहात कार्यकर्त्यांनी आरती पार पाडली. यानंतर पोलिसांनी त्यातील काही जणांना ताब्यात घेतलंय.

मिनारा मस्जिद, पायधुनी

मुंबईतील मिनारा मस्जिद परिसरात सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. याठिकाणी अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. पायधुनी पोलिसांनी मशीदीच्या ट्रस्टच्या सदस्यांसोबत बैठकीत पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मिनारा मशीदीने चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अत्यंत शांततेत याठिकाणची परिस्थिती होती. याठिकाणी कोणतेही आंदोलन झाले नाही.

मुंबईतील मिनारा मस्जिद परिसरात सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारनंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचं स्पष्ट केलं. याआधीच त्यांच्या निवासस्थानी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी दाखल झाले आहेत. सध्या मनसेचे अनेक नेते आऊट ऑफ द रिच आहेत. त्यांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

भेंडी बाजार 

मुंबईतील संवेदनशील अशा भेंडी बाजार परिसरातील मोगल मस्जिद येथे आज सकाळी अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. शिया मुस्लिमांचे हे प्रार्थनास्थळ आहे. डोंगरी पोलिसांचा बंदोबस्त याठिकाणी पहाटेपासूनच होता. कोणतेही आंदोलन किंवा अप्रिय घटना घडली नसल्याचे स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले.

शिया मुस्लिमांचे हे प्रार्थनास्थळ आहे.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले यांना निगडी गावठाण येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तत्पूर्वी त्यांना नोटीस देण्यात आली होती. नंतर मोठा पोलीस फौजफाटा घरासमोर दाखल झाला.

पुण्यातही मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ नोटिसा धाडल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांचे फोन सध्या नॉट रिचेबल आहेत. तर काहींची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या दरम्यान मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

राज्यातल्या अनेक भागांमध्ये पहाटेची अजान भोंग्यांविना झाली आहे. रत्नागिरी, कल्याण सह अनेक मशिदींमध्ये अजान आणि नमाज पठण शांततेत करण्यात आली. धारावीतही पहाटेची अजान आणि नमाज पठण शांततेत पार पडलं.

तर, मुंबई आणि पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू झाली आहे. अनेक मशिदींबाहेर सरकारने कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी छावणीचं रुप आलंय.

लोकलमध्ये आज सकाळी हनुमान चालीसा म्हटली गेली. हार्बर आणि सेंट्रल लाईनवर आज प्रवाशांची गर्दी होती. लोकल काही काळ उशीराने सुरू असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत झाला.

मात्र, सकाळी सात वाजता दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यात आलं.

माहीम परिसरात पहाटेची अजान झाली नाही

राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाविकास आघाडीच्या नेत्याच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून काही मुस्लीम बांधवांनी आज भोंग्यांवरून अजान वाजवली नाही. माहीममध्ये नेहमी अजान वाजते, काही मनसैनिक तिथे हनुमान चालिसा वाजवण्यास गेले होते. पण तिथे गेल्यावर सुखद धक्का मिळाला, हनुमान चालिसा वाजली नाही. त्यामुळे त्या मुस्लीम बांधवांचं अभिनंदन, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

मुंबईतल्या धारावीसह ऐरोली भागातही मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण कऱण्यास गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर कल्याण डोबिंवलीतल्या २० ते २५ कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दादरमधून मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांना दादर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना भवन हनुमान चालिसा लावली होती आणि सामना कार्यालयासमोर संजय राऊत यांच्या विरोधात बॅनरबाजी केली होती.

मुंबईच्या चारकोप परिसरात अजानच्या वेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा स्पिकरवर वाजवली. नेरुळच्या मशीद परिसरात मनसेकडून हनुमान चालिसा वाजवण्यात आली, तसंच कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती. (Hanuma Chalisa Row)

राज्य सरकारने काल राज ठाकरेंसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवरही कारवाईला सुरूवात केली. पण तरी मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे पोलीस रात्रीपासूनच सतर्क आहेत. आज सकाळी राज्यातल्या विविध भागांमध्ये पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली आहे. (Raj Thackeray Hanuman Chalisa aCOntroversy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT