मुंबई : महाराष्ट्रातील संतांवर कथितरित्या टीका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना चहुबाजूनं टीकेचा सामना करावा लागत आहे. यामध्ये स्वयंघोषित किर्तनकार सुनिता अंधाळे यांनी शिवीगाळ करत टीका केली आहे. त्यांच्या टीकेला आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Maharashtra News Sushma Andhare hits back at Kirtankar Sunita Andhale)
अंधारे म्हणाल्या, "मला काही लोकांनी काही व्हिडिओ दाखवले. यामध्ये कोणीतरी फार अश्लाघ्य भाषा वापरली आहे. मला हे लोक किर्तनकार वाटत नाहीत. जे लोक अत्यंत गलिच्छ भाषा वापरतात जे आपल्या मनातून अद्याप काम-मोह-क्रोध-मत्सर अजून काढू शकलेले नाहीत. तसेच जे लोक स्वतःला राजकीय दावणीला बांधून घेतात ते किर्तनकार असू शकत नाहीत"
कीर्तनकार सुनिता अंधाळे काय म्हणाल्या होत्या?
कीर्तनकार सुनिता अंधाळे व्हिडिओत म्हणाल्या, "ज्ञानोबांनी रेडा बोलावला पण त्या दिवशी तू गैरहजर होतीस. रेडे तू जर एखाद्या कीर्तनात बसली असती तर तुला अक्कल आली असती, तुला कळलं असतं की ज्ञानोबाराय काय होते? आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी किर्तनामध्येही बोलू शकते. पण किर्तनात माझ्यातोंडून एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही. ती भुंकते की, हनुमंतराय उडाण घेऊन लंकेला गेले. हा ते लंकेला गेले. तू नाही का दुसऱ्या पक्षातून या पक्षात उडत उडत आली. ज्या संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या महाराष्ट्रात राहतेस. तू आमच्या देवाबद्दल संतांबद्दल बोलतेस तुला जिथं दिसेल तिथं फाडून टाकणार आहे. लाजा वाटायला पाहिजे हिला पक्षामध्ये ठेवलंय. गावाच्या बाहेरच काय देशाबाहेर हाकलून दिलं पाहिजे हिला. आज या घुबडीचा...जाहीर निषेध करते. जिथं दिसेल तिथं ठोकणार!"
हे ही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. त्यात अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या विधानांवरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहेत. अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली असली तरी वारकरी संप्रदाय हे आक्रमक असल्याचे दिसत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.