ऑक्सिजन प्लांट esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ४३० ऑक्सिजन प्लांट अपूर्ण

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून माहिती समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड संसर्गाच्या पहिल्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांसह रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यामुळे सरकारसह खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले होते; मात्र कोरोनाच्या २० महिन्यांनंतरही ऑक्सिजनचे अनेक प्लांट अपूर्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात सर्व रुग्णालयांना स्थानिक पातळीवरून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे ध्येय सरकारने ठेवले होते. यासाठी ८५३ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये हवेतून ऑक्सिजन आणि द्रवरूपी प्राणवायू स्टोअरेज प्रकल्प उभारण्यात येणार होते; मात्र अजूनही राज्यातील एकूण ४३० प्रकल्प अपूर्ण आहेत, असे अहवालातून समोर आले आहे. राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे (पीएसए-प्रेशर स्विंग अब्झॉर्पशन) ५५१ प्रकल्प नियोजित होते. नियोजित पीएसए प्रकल्पांमधून ६५७.१६ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार होता; मात्र आतापर्यंत केवळ २६८ पीएसए प्रकल्प पूर्ण झाले असून त्याची एकूण क्षमता २७५.७६ मेट्रिक टन इतकीच आहे.

नियोजित पीएसए प्रकल्पाच्या निम्मे प्रकल्पदेखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. राज्यात ३०३ द्रवरूपी प्राणवायू स्टोअरेज प्रकल्प (एलएमओ-लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) नियोजित होते. त्यातून ४,८०९.९९ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार होता; मात्र आतापर्यंत १५६ एलएमओ प्रकल्प पूर्णत्वास आले असून त्यातून २,३०७.८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. चौकट प्रकल्प पीएसए एलएमओ पूर्ण २६८ १५६ अपूर्ण २८३ १४७ एकूण ५५१ ३०३ चौकट ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची उपलब्धता राज्यात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहेत. १० लिटर क्षमतेचे ६,९७० व ५ लिटर क्षमतेचे १२,११२ असे एकूण १८,०८२ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलब्ध असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या अहवालात दिली आहे.

चौकट मुंबईत ३० प्रकल्प पूर्ण मुंबईत एकूण ४३ प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. २६ एलएमओ प्लांटसपैकी २२ पूर्ण केले असून त्यातून ३०२.८५ मेट्रिक टन ऑक्सिजन स्टोअरेजची क्षमता उपलब्ध झाली आहे. मुंबईत १७ पीएसए प्लांट नियोजित होते. त्यातून ७७.७७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार होता; मात्र केवळ ८ पीएसए प्लांट पूर्ण केले आहेत. त्यातून केवळ १९.७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. ठाण्यातही ३८ पैकी केवळ १० प्लांट पूर्ण झाले आहेत. चौकट या जिल्ह्यातही प्रकल्प अपूर्ण पीएसए- बीड, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सिंधुदुर्ग, वाशीम एलएमओ- अहमदनगर, बीड, भंडारा, बुलडाणा, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची झाली ऑनलाइन बैठक

Pre Wedding Photoshoot: 'या' लोकेशनवर फोटोग्राफरशिवायही करू शकता जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशुट

Google Gemini : गुगल जेमीनीची मेमरी झाली शार्प! काय आहे या नव्या फीचरमध्ये खास?

SCROLL FOR NEXT