गुवाहाटी : गेल्या एका आठवड्याहून अधिक काळ गुवाहाटीमध्ये घालवल्यानंतर अखेर बंडखोर एकनाथ शिंदे आणि इतर आमदार गोव्याकडे रवाना झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि गुवाहाटी येथील नागरिकांचे आभार मानले. (Eknath Shinde Latest News)
ते म्हणाले की, येथील नारिकांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहयोग केला. एका परिवारातील सदस्या प्रमाणे आमचा येथे पाहूणचार केला गेला. उद्या आम्ही मुंबईमध्ये दाखल होऊ असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
शिंदे म्हणाले की, उद्या मुंबईत दाखल झाल्यानंतर आम्ही विश्वासदर्शक ठरावामध्ये सहभागी होऊ. त्यानंतर आमच्या आमदारा गटाची बैठक पार पडेल त्यानंतरच आमची पुढील रणनीती काय असेल याबद्दल निर्णय घेतला जाईल. आम्ही बंडखोर नाही आम्ही शिवसेना आहोत असे म्हणत शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांचं जे धोरण आहे ते पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत. यावेळी आम्ही राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या या विधानानंतर गुवाहाटी विमानतळावरच सत्ता स्थापनेचा दावा केल्याचे दिसून येत आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार असेल असेही विधान केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.