eknath shinde with fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदेच्या स्वागतासाठी अमित शहांचा निर्णय; मुंबईत २ हजार जवान तैनात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडानंतर गुवाहाटीला मुक्काम हलवलेले सर्व आमदार गोव्याला रवाना झाले आहेत, त्यानंतर आता उद्या हे सर्व बंडखोर आमदार गोव्याहून मुंबईला येणार आहेत. यादरम्यान शिवसेनेकडून बंडखोर आमदारांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर केंद्रातील भाजप सरकारकडून या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सीआरफीएफचे तब्बल दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात येणार आहेत.(Maharashtra Political Crisis)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर हे बंडखोर आमदार बहुमताच्या चाचणीसाठी मुंबईत येणार असल्याने केंद्र सरकारने सीआरपीएफच्या तब्बल दोन हजार जवानांची सुरक्षा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदाराच्या गटाला दिली आहे. विमानतळापासून विधानसभेपर्यंत हे जवान आमदारांना सुरक्षा देणार आहेत. गेल्या एका आठवड्याहून अधिक काळ गुवाहाटीमध्ये घालवल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना झाले आहेत ते उद्या मुंबईत दाखल होतील.

या पार्श्वभूमीवर मोठी तीन विमानातून सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल होणार आहेत. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी या जवानांवर असणार आहे. यादरम्यान मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप, सपाच्या नेत्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, भडकाऊ वक्तव्ये करू नका किंवा आक्षेपार्ह पोस्ट करू नका. परिस्थिती बिघडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलीसांनी बजावले आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाला छावा संघटनेचे कार्यकर्ते सुरक्षा देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SA vs IND: मार्करमने जिंकला टॉस! T20I वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका आमने-सामने

Cannabis Farm in Dhule: धुळ्यात सव्वा दोन एकरात गांजाची लागवड, सहा कोटींचा माल... भयानक शेती पाहून पोलीसही चक्रावले

Pune Crime : मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामूहिक अत्याचार

SCROLL FOR NEXT