संजय राऊत  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत गरजले; शहाचं राज्याचे अन् मराठी माणसांचे...

नुकताच शहांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला आहे. त्यानंतर राऊतांनी हे मोठं विधान केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : शिवसेनेचे नाव आणि चिन्हाच्या वादावरून राज्यात वाद पेटलेला असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

शिवसेना फोडण्यासाठी शेकडो कोटी खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच शिवसेना हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्याचं ते म्हणाले.

नुकताच शहांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला आहे. त्यानंतर राऊतांनी हा आरोप केला आहे. राऊतांच्या या आरोपांमुळे भाजप आणि ठाकरे गटातील वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, भाजप याला कसे उत्तर देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा सर्वात मोठे शत्रू केंद्रीय मंत्री अमित शहा असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा

दुसरीकडे राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल करताना पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आमची लढाई मिंधे गटासोबत नसून, देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपविरोधात असल्याचे राऊत म्हणाले. मिंधे गटाची आमच्या विरोधात लढण्याची पात्रता नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT