भाजप भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. तिथे गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुऊन जातात, अशी टीका विरोधकांकडून भाजपवर सातत्याने केली जाते. अशातच भाजप आमदाराने भर विधानपरिषदेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. खुद्द भाजपच्याच आमदाराने आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (maharashtra politics bjp mla ramesh patil controversial statement Nirma Powder)
ठाकरे गटाने नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावर रमेश पाटलांनी भाष्य केले.
आमच्याकडे गुजरात मधून....
आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश झाला आहे. रमेश पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
त्यानंतर आपली चुक लक्षात येताच रमेश पाटलांनी युटर्न घेतला. गुजरातमध्ये तयार होणाऱ्या निरमा पावडरबद्दल मी बोलत होतो. भूषण देसाई भाजपमध्ये आले तर ते का आले? या प्रश्नावर मी बोलत होतो. भूषण देसाई यांच्यावर आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही किंवा त्यांना आम्ही बोलावलेलं नाही.
त्यांना असे वाटलं असेल की, भाजप ही काम करणारी, न्याय देणारी पार्टी आहे. म्हणून त्यांना पक्षांमध्ये यावं असं वाटलं असेल, म्हणून ते आले आहेत, असं रमेश पाटील म्हणाले. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला असतानाही रमेश पाटील अनेकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.