यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यासोबतच खासदार भावना गवळी यांचा गट देखील शिंदे गटात सामील झाला आहे. दरम्यान, भावना गवळी यांना धक्का देत त्यांचे पती प्रशांत सुर्वे शिवसेनेत दाखल झाले आहेत. खासदार गवळी यांचे सुर्वे हे पती असून त्यांचा घटस्फोट झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला आहे.(maharashtra politics crisis MP Bhavana Gawali husband Prashant Surve is in Shiv Sena)
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "2014 सालीच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरें यांना भेटलो होतो. पण परिस्थिती तशी नाही असं त्यावेळी उद्धव ठाकरेंचे मत होतं. त्यावेळी मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला."
खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा 2013 साली घटस्फोट झालेला आहे. भावना गवळी यांच्याशी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी 2014 मध्ये त्यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार भावना गवळी यांच्या समोर एक तगडं आव्हान मतदारसंघात उभं राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.