'गुलाबराव पाटलांना सगळे शिवसैनिक ढाण्या वाघ म्हणत होते.'
Maharashtra Politics Crisis : राज्यात सध्या राजकीय घटनांनी वातावरण गढूळ होताना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कथित बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता मैदानात उतरले असून बंडोखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळाला, अशी सडकून टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुलाबराव पाटलांवर केली होती. आता शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर (Vilas Parkar) यांनी गुलाबरावांवर निशाणा साधलाय. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निष्ठेबद्दल आपल्याला सहा महिन्यांपूर्वीच शंका आली होती, सत्तेचा लाभ शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना देण्याऐवजी त्यांनी भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनाच दिला, असं माझं निरीक्षण होतं. माझ्या या अहवालावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असतानाच त्यांच्यासह राज्यातील आमदारांनी बंडखोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला, असा गौप्यस्फोट पारकरांनी केलाय.
राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर जळगावातील विवेकानंद विद्या मंदिराच्या सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पारकर पुढं म्हणाले, ज्यांना सारे शिवसैनिक ढाण्या वाघ म्हणत होते, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठीच काम केलं. शिवभोजन थाळीची कंत्राटे तसेच अन्य शासकीय कामांचे कंत्राटेही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच दिली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी विचारही केला नाही. याबाबतची माहिती मला होती, संधी मिळेल तेव्हा गुलाबराव पाटील पक्ष सोडून जातील असं माझं निरीक्षण मी पक्षश्रेष्ठींकडे लेखी स्वरूपात दिलं होतं. ही शंका आल्यामुळंच मी कधीही गुलाबराव पाटलांकडं पक्ष वाढीचा किंवा कोणताही विषय घेऊन कधीही गेलो नाही, असंही पारकर यांनी सांगितलंय.
गुलाबराव पाटील पानटपरी चालवायचा. आता ढुंगणाला पाय लावून पळाला, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केलीय. दहीसरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेत आता एकच वाघ उरलाय, असा गुलाबराव पाटलांचा अविर्भाव होता. आता ढुंगणाला पाय लाऊन पळाला. हा आधी पानटपरी चालवायचा. आता पुन्हा त्याला पानटपरी चालवायला पाठवा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.