Maharashtra Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

फ्लोअर टेस्टपूर्वी शिंदे सरकारची आज 'अग्निपरीक्षा'; शिवसेनेकडून आमदारांना व्हीप

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर, आज (रविवार) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी शिवसेना (Shiv Sena) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) आणि भाजप (BJP) आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यात लढत होत आहे. एनडीएकडून भाजपचे आमदार राहुल नार्वेकर आणि एमव्हीएकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी मैदानात आहेत. खरं तर 4 जुलै रोजी होणाऱ्या फ्लोअर टेस्टपूर्वी एकनाथ शिंदे सरकारसाठी आजची ही अग्निपरीक्षाच असणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशानुसार, विधानसभेचे दोन दिवसांचं विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी मुंबईत होत आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर तातडीनं बोलावलेल्या या अधिवेशनात आज 3 जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. अध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना निवडून देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड पुकारत भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं असलं तरी शिवसेनेनं बजावलेल्या व्हीपचं पालन त्यांना करावं लागणार आहे, अन्यथा शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर शिवसेनेकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी निवडणुकीबाबत आमदारांना व्हीप जारी केलाय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, उपसभापती नरहरी झिरवळ हे त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव असूनही काळजीवाहू अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडू शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT