Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: सावध ऐका पुढल्या हाका! 'हा' च फोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्यांना खास सूचना

शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावधानतेची भूमिका घेण्याची सूचना दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावधानतेची भूमिका घेण्याची सूचना दिली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष फोन वापरण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. (Maharashtra Politics Instructions for use of iPhone by workers Thackeray Group Ambadas Danve )

फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

शिवसेनेतील प्रमुख नेत्यांना आयफोन वापरण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दानवे यांनी विचारले असता. ते म्हणाले, अशा काही सुचना अद्याप आलेल्या नाहीत. आत्ताच्या घडील जे राजकारण सुरु आहे.

व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल होत असतात. त्यामुळे सुरक्षतेसाठी प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत. पण पक्षाकडून अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत.

जबाबदार लोकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. परंतु बोलता बोलता कधी अपशब्द निघतो. तो लगेच रेकॉर्ड होतो. त्याचा मोठ्या प्रमाणात बाऊ केला जातो. म्हणून आपण सावधगिरी घेतली पाहिजे. बंधन पाळिले पाहिजे.

महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. आत्ताच्या घडली सरकार मुद्दाम जाणीवपुर्वक नेत्यांच्या हालचालींवर लक्ष असते. घाबरण्याची गरच नाही.

सरकारवर विश्वास नाही का? अस सवाल उपस्थित केल्यानंतर, दानवे म्हणाले आत्ताचे सरकार लहान लहान लोकांना त्रास देत आहे. आत्ताचे सरकार कोणत्याही स्तराला जाऊ शकते. त्यामुळे असा काळात सरकारवर विश्वास नाही. पण आपण खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून मी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT