CM Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महाराष्ट्रात आता 'शिंदे सरकार'!!

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची गोव्यात बैठक होणार आहे. त्यानंतर मुंबईत येण्याचं नियोजन ठरणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्यामध्ये राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्राच्या सर्वच भागाचा विकास करणं आमचं काम आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्या गोव्याला जाऊन बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत परतणार आहेत.

आज बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं - दीपक केसरकर

मुख्यमंत्रीपदानंतर एकनाथ शिंदे म्हणाले...

राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्राच्या सर्वच भागाचा विकास करणं आमचं काम आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यासोबत आपण काम करणार आहोत. भाजपकडे जास्त संख्याबळ असूनही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यासाठी मी फडणवीसांचा आभारी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेटची बैठक घेत आहेत. 

शरद पवार म्हणाले...

  • जे आमदार महाविकास आघाडी सरकार सोडून गेले त्यांची नतृत्व बदलाची अपेक्षा होती

  • भाजपमध्ये दिल्ली आणि नागपूरच्या आदेशाच तडजोड नसते. आदेश दिल्यानंतर तंतोतंत पाळावा लागतो याचं उदाहरण म्हणजे फडणवीस. ते उपमुख्यमंत्री होतील आणि शिंदे मुख्यमंत्री होतील याची कल्पना कुणालाही नव्हती.

  • हा तर राष्ट्रवादीला धक्का होता.

  • माझ्या मंत्रीमडळात शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते.

  • मी एकनाथ शिंदे यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. पण फडणवीस हे नाराज दिसत होते, त्याचा चेहराच सांगत होता.

  • एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना प्रभावी ठरले म्हणून हे घडलं. त्यांच्यासोबत ३९ आमदार जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांची तयारी आधीच होती, त्यांचं ते यश आहे. पण आम्ही कमी पडलो नाही. ठाकरेंनी पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याचे हे परिणाम आहेत.

  • सुरत-गुवाहटी-गोवा ही सोय एका दिवसात होत नाही. त्यांचं प्लॅनिंग आधीपासून होतं.

  • उद्धव ठाकरेंच्या पुढच्या प्रवासाबद्दल मी काय सांगू? त्यांनी मोकळ्या मनाने राजीनामा दिला. ते सत्तेला चिकटून राहिले नाहीत.

  • शिवसेना संपुष्टात आली नाही.

  • शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली हा आरोप पोरकटपणाचा आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत तर 'सोच समझकर कदम उठाईये' असा सल्ला दिला आहे.

थोड्याच वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्वीटरचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो लावला आहे.

उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे.

एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडला असून शपथेची सुरूवात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने केली.

काही क्षणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून थोड्याच वेळात शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. त्यानंतर फडणवीस सुद्धा आज शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण राजभवनात तशी तयारी केलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा आहे असं सूत्रांच्या माहिती नुसार कळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी आशा भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी असावं त्याचं सरकारमध्ये असणं गरजेचं आहे, सरकारच्या बाहेर असू नये असं ते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पण यासाठी ते उपस्थित राहणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

राजभवनात शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. काही वेळात शपथ विधी पार पडणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर शरद पवारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…! महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…" असं ट्वीट शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान त्यांनी ट्वीट करत भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

शपथविधीनंतर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब स्मृतीस्थळावर जाणार आहेत.

शिंदे समर्थकांनी त्याच्या घरासमोर घोषणाबाजी केली असून फटाके फोडले जात आहेत. दरम्यान मुंबईतील विविध भागात जल्लोष व्यक्त केला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या घोषणेनंतर बऱ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्या दिल्या आहेत तर अनेकांनी भाजपवर टीका केली आहे.

आज संध्याकाळी सात वाजता एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची शपथविधी होणार असून हा कार्यक्रम छोटेखानी होणार आहे. त्यासाठी कुणीही शपथविधीसाठी येऊ नये असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले...आआम

  • आमदारांच्या मतदारसंघातील आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. सेनेचे दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या, निर्णय घेता येत नव्हते. आम्हाला खूप मर्यादा होत्या पण आता बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेणार आहोत. आम्ही अहोरात्र काम करून राज्याचा विकास करू.

  • काल झालेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.

  • महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना ग्रामपंचायत सदस्यालाही विरोध केला जात होता म्हणजे विचार करणे गरजेचं आहे.

  • त्याचबरोबर ५० आमदार वेगळी भूमिका घेणार म्हणजे आत्मपरिक्षणाची गरज आहे ना. त्या ५० आमदारांनी अन्यायाल वाचा फोडण्याचं काम केलं.

  • देवेंद्र यांचं मन मोठं आहे. त्यांच्याकडे बहुमत असतानाही त्यांनी दुसऱ्याला मुख्यमंत्री केलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एक मजबूत सरकार तुम्हाला येत्या काळात महाराष्ट्रात दिसेल.

  • नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार.

  • देवेंद्र फडणीसांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे, त्यांचे आभार. मी कधीच या पदाची अपेक्षा केली नव्हती पण देवेंद्रजींनी मला हे पद दिलं.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू

  • २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. जनतेने महाविकासआघाडीला मत दिले नव्हते. शिवसेना भाजप युतीला दिले होते.

  • महाविकास आघाडीच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला. दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणं हे खूप खेदजनक आहे.

  • एकीकडे बाळासाहेबांनी दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री जेलमध्ये जातो.

  • शेवटच्या दिवशी औरंगाबादचं संभाजीनगर झालं पण त्याचा निर्णय येणार्या सरकारला पुन्हा घ्यावे लागतील. ठाकरे सरकारने कॅबिनेटचं पत्र आल्यानंतर निर्णय घेतले. पण त्यावर फेरविचार करावे लागतील.

  • शिवसेना नेत्यांची महाविकास आघाडीत कुचंबना झाली. हारलेल्या विरोधकांना निधी दिला गेला पण शिवसेनच्या नेत्यांना निधी नव्हता.

  • एकनाथ शिंदे यांचा गट आमच्या सोबत आला आहे. अजूनही अपक्ष आमच्यासोबत आले आहेत. याबाबतचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार.

  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.

  • मी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल असं फडणवीस यांनी सांगितलं. आज सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

  • आज मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.

  • देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत.

नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री?

नवीन सरकार बनल्यास देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, गृहमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असतील. त्यांच्याकडेच अर्थमंत्रीपद असेल, असे बोलले जात आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेनेसह अपक्षांमधील ५० आमदारांपैकी (मंत्री सोडून) किमान २० जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असेही बोलले जात आहे.

सागर बंगल्याबाहेर गोंधळ; शिंदे समर्थक पोलिसांच्या ताब्यात

एकनाथ शिंदे मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचताच परिसरात थोडा गोंधळ उडाला आहे. काही तरुणांनी या बंगल्याबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यांना ताब्यात घेतल्यावर लक्षात आलं की हे तरुण शिंदे समर्थक आहेत.

एकनाथ शिंदेंनी केलं समर्थकांना अभिवादन

एकनाथ शिंदेंना मंत्रिपदाआधीच 'झेड' दर्जाची सुरक्षा

सकाळीच एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईकडे रवाना झाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरल्यानंतर ते फडणवीसांच्या भेटीला रवाना झाले. ते राजभवनातही जाणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. ट्वीट करत राज ठाकरे म्हणाले की, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजत असतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.

ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हाला आनंद नाही - एकनाथ शिंदे

मुंबईत गेल्यावर नव्या सरकार स्थापनेबद्दल बैठक होईल. मी राज्यपालांना भेटणार आहे, त्यानंतर याबद्दलची रणनीती ठरणार आहे. शिवसेनेचा गटनेता म्हणून ५० आमदारांकडून माझी निवड झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर दुःख झालं - केसरकर

काल उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणतही सेलिब्रेशन आम्ही केलेलं नाही. जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्या बरोबर युती करायची होती. सेलिब्रेशन केलं नाही मनातून दुःख झालं आहे. त्यांच्या बद्दलचा आदर कायम आहे, अशी भावना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

शिंदे फडणवीसांना आजच मुंबईत भेटणार; सत्तास्थापनेचा दावा करणार

एकनाथ शिंदे मुंबईत येणार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. सत्तास्थापन दावा करायला जाताना एकनाथ शिंदे भाजप शिष्टमंडळ बरोबर असणार आहे.

आता धुणी भांडीच करायची, संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल

तुम्ही काय करणार आहात. तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आहात का ? की तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे ? असा सवाल उपस्थित करत तुम्हाला आता धुणी भांडीच करावी लागणार आहेत. अशा शब्दात राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल चढवला.

रुपाली चाकणकरांचं उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ ट्वीट

लढता लढता हरलो जरी,

हरल्याची मला खंत नाही…

लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझ्या अंत नाही…

पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन - रुपाली चाकणकर

मला असं वाटतं की त्यांनी (उद्धव ठाकरे) विश्वासदर्शक ठरावाचा सामना करायला हवा होता पण त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीअखेर त्यांचे निरोपाचे भाषण केले. उद्धव ठाकरे हे साधे स्वभावाचे संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांना काही गोष्टी आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा..; प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत एक पोस्ट लिहिलीय. उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिलीय. ‘तुम्ही खूप छान काम केलंत सर! उद्धव ठाकरे आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील.. चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो!’, असं त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलंय.

नेमकं हेच घडलं! संजय राऊतांनी शेअर केला फोटो

तब्बल दहा दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT