sudhir mungantiwar after bjp core committee on rebel shivsena mla eknath shinde maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: राज्यपाल कोश्यारींच्या व्हायरल पत्रावरुन वाद

एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल कोश्यारी यांच्या 'त्या' व्हायरल पत्रावरुन वाद निर्माण झाला आहे. सदरील पत्रात बहुमत चाचणीसाठी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात आली. यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे खोटे पत्र व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे शिंदेच्या गटात, लवकरच गुवाहटीला जाणार असल्याची माहिती

गुवाहटीतले आमदार ऊद्या दुपारी हॉटेल सोडणार अशी माहिती आली आहे. मात्र हे आमदार कुठे जाणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

भाजपने राज्यपालांना पत्र दिल्यानंतर शिंदे गटाची गुवाहटीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे मागणी केली आहे असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. "महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीचा मागणी केली आहे. यासंदर्भातील आम्ही पत्र राज्यपालांना दिलं आहे." असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या बहुमत चाचणीचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे. 

मोठी अपडेट - भाजपचे सर्व नेते राजभवनाच्या दिशेने रवाना

देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार राजभवनच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्यानंतर आता ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. एवढ्या दिवस शांत असलेल्या भाजपने हालचाली सुरू केल्याने आता सर्वांच्या नजरा भाजकडे गेल्या आहेत.

राज्यपालाची भेट घेऊन सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू उद्या काही अपक्ष आमदारांना घेऊन गुवाहटीवरून मुंबईला येणार असल्याची माहिती आहे. तर उद्या विदर्भातील भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईला येण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात आज भाजप आमदारांची बैठक घेतली आहे. बैठकीनंतर सर्व आमदारांना मुंबईत बोलावल्याची माहिती आहे.

३ जुलैपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.

सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 

मुंबईत शिवसेना आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. मातोश्रीवर ही बैठक सायंकाळी सात वाजता होणार असून या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित असणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराची मागणी केली आहे असं अनिल परब म्हणाले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत ७,२३१ पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गृहमंत्रीदिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या संपर्कात बंडखोर आमदार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी संपर्कात असलेल्या आमदारांची मुख्यमंत्र्यांनी नावे सांगावीत असं शिंदे म्हणाले आहेत. तसेच आम्ही लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे. बैठकीनंतर ते माध्यमाला बोलत होते.

राज्य मंत्रीमंडळ बैठक पार पडली आहे. त्यामध्ये सर्व मंत्रीमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्यास तयार असल्याच यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

संजय राऊत म्हणाले...

संजय राऊत हे रायगडमधील अलिबाग येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत आहेत.

  • ही सभा झाल्यावर आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे.

  • मला आनंद वाटला की, माझा अलिबाग सुपुत्र म्हणून उल्लेख केला.

  • ठाण्याच्या भाईला अलिबागचे भाई भारी पडतील, हे गद्दार मुंबईच्या रस्त्यावर फिरता कामा नये. त्यांच्याकडे बहुमत असेल तर ते लपून का बसले आहेत?

  • आपल्या इकडे बैलगाडा शर्यती होतात, पण आता बैल बदलायची वेळ आली आहे.

  • काय हॉटेल, काय झाडी, काय डोंगार असं म्हणत त्यांनी शहाजी पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

  • त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवता काय? आता हिंदुत्वाच्या नावाखाली दिघे साहेबांच नाव घेतात पण त्यांचा मृत्यू २२ वर्षापूर्वी झाला. एवढ्या दिवस त्यांचे विचार आठवले नाही का?

  • 2019ला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या मनात शिंदे यांचं नाव होत पण भाजपने शिवसेनेला दगा दिला आणि आज तुम्ही त्यांच्याकडे जाताय का? मुंबईत या मविआतून बाहेर पडू.

  • तुम्ही गुवाहटीच्या त्या हॉटेलमध्ये गुलाम आणि कैदी म्हणून राहत आहात.

  • यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून यांची ही नाटकं आहेत. जे गेलेत त्यांना मी माजी आमदार म्हणत नाही.

राऊतांच्या विखारी टिकेला प्रत्युत्तर मिळेलंच - दीपक केसरकर

  • आम्ही भाजपमध्ये विलिनीकरण करणार अशा चर्चा केल्या जात होत्या पण आम्ही भाजपात विलिन झालो का? आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत आणि आमचे नेते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत.

  • संजय राऊत यांच्या विधानामुळेच मोदी आणि ठाकरे यांच्यातील संबंध बिघडले.

  • राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान राखत नाहीत. सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर होऊ शकले नाही.

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत राहून छत्रपती शिवरांयांच्या पराक्रम आणि संभाजी राजेंचं बलिदान असं कसं विसरता तुम्ही?

  • त्यामुळे फडणवीस आणि शिवसेनेने चर्चा करावी आणि युतीचं सरकार स्थापन कराव.

  • राष्ट्रवादीने शिवसेना फोडण्याचा तीनवेळा विचार केला पण ते फोडू शकले नाहीत कारण शिवसेनेमागे बाळासाहेबांचा हात आहे. पवारांवर विश्वास होता पण राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला.

  • शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर तो कोर्टाचा अवमान असेल. कारण शिवसेनेच्या घटनेपेक्षा कायदा मोठा आहे.

  • आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आमच्या भावनेचा अंत पाहू नका यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले असून भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ते भेट घेत आहेत. नड्डा यांच्या घरी ते पोहोचले आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या...

आज बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते, त्यांनी लहानपणापासून मला प्रेम दिलं. उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री पुन्हा होवू शकत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदेंच्या निर्णयांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांनी मागवल्या

एक जूनपासून नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी मागवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नगरविकास विभागाला याबद्दलचे निर्देश दिले आहेत.

उद्धव ठाकरेंचं गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल, आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र

उद्धव बाळासाहेब ठाकरे

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल; सत्तास्थापनेचा मुहुर्त ठरणार?

विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आल्याची चिन्हं दिसत आहेत. सहा दिवसांत हा फडणवीसांचा चौथा दौरा आहे.

"सध्याची परिस्थितीत पाहता उद्धव व राज यांनी एकत्र यावे"

भावाने बिकट परिस्थितीत भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना असे वाटते, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील म्हणाल्या. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी खूप योगदान दिले आहे. आताच्या परिस्थितीत त्यांच्या दोन्ही मुलांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

ईडीने संजय राऊत यांना दुसरं समन्स बजावलं. 1 जुलै रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून कागदपत्रांसह ईडीने मुंबई कार्यालयात बोलावलं आहे.

आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे गेल्या आठ दिवसांपासून गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तिथून त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला आहे. दीपक केसरकर भूमिका मांडतायत, आमच्या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती देतायत. आम्ही शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे नेतोय. इथे सगळं नीट आहे. सगळे आमदार स्वेच्छेने इथे आले आहेत. जे लोक म्हणतायत की तिकडचे आमदार संपर्कात आहे वगैरे, त्यांनी समोर येऊन नावं सांगावीत. ते केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

बंडाचं कारण राष्ट्रवादी-काँग्रेस; उदय सामंतांनी गुवाहाटीतून व्यक्त केली नाराजी

शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. एकनाथ शिंदेंनी उदय सामंत यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

सदा सरवणकरांच्या मुलाची युवासेनेतून हकालपट्टी

बंडखोर आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.

शिंदे गटातील २० आमदार आमच्यासोबत, अनिल देसाईंचा खळबळजनक दावा

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले २० आमदार आमच्या नेतृत्त्वासोबत संपर्कात आहेत, असं खळबळजनक वक्तव्य देसाईंनी केले आहे. त्यांचं म्हणणं ठाम आहे की, आम्ही मुंबईत किंवा विधानसभेत मतदानाला आल्यास शिवसेनेचे समर्थन करू. त्यामुळे देसाई यांचा हा दावा खरा ठरल्यास एकनाथ शिंदे यांचे बंड पूर्णपणे फसण्याची शक्यता आहे, असंही देसाई म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात शिवसेनेतलं बंड सुरू झाल्यापासून देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. सहा दिवसातला हा चौथा दिल्ली दौरा आहे. दरम्यान, त्यांनी सकाळीच आशिष शेलारांची भेट घेतली आणि ते दिल्लीकडे रवाना झाले.

बंडखोर मंत्र्यांविरोधात असीम सरोदेंची कोर्टात धाव

बंड केलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री असलेल्या आमदारांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आठ दिवसांपासून राज्यातील आठ मंत्री असलेले आणि आमदार यांनी बंडखोरी करुन स्वतःच्या स्वार्थासाठी राज्याबाहेर गेले आहेत याच विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक उपद्रव पसरवल्या प्रकरणी आणि सामान्य नागरिकाचे प्रश्न विसरल्याने कारवाई व्हावी यासाठी ही जनहित याचिका असीम सरोदे यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक; शिंदे गटाची सत्तास्थापनेची खलबतं

आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचीही दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. उद्या एकनाथ शिंदे मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे मुंबईला राज्यपालांकडे जाणार आहेत आणि सरकारचा पाठिंबा काढण्याचं पत्र देणार असल्याची माहितीही हाती येत आहे. या बैठकीत सत्तास्थापनेतबाबत चर्चा होणार आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली आहे. आता या सगळ्या राजकीय गोंधळात भाजपाची थेट एन्ट्री होताना दिसत आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता रुग्णालयातून उपचार घेऊन परतले आहेत. राज्यातल्या राजकारणात आता ते अॅक्टिव्ह होताना दिसत आहेत. जाणून घ्या सर्व राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Specile Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिज्जा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

Mumbai: कामाठीपुरातील महिलांचा संकल्‍प, विधानसभेसाठी करणार १०० टक्‍के मतदान

SCROLL FOR NEXT