Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: विधान परिषदेचं गणित बिघडलं? ठाकरेंच्या विरोधी पक्ष नेते पदावर NCP ठोकू शकते दावा

कायंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं

धनश्री ओतारी

विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी काल रविवारी (१८ जून) रोजी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्यांच्या प्रवेशामुळे महाविकासआघाडीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कायंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते पदा धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. NCP may stake a claim on Thackeray's Leader of the Opposition post After Manisha Kayande join Shinde group

ठाकरे गटाच्या विधानपरिषदेतील जागांची संख्या कमी होत असल्याने अडचण वाढण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विचार केला नव्हात आता करु...

२०१४मध्ये विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सांगितलं ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांचा आमदार मी विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करणार. तुम्ही सांगताय त्याबद्दल आम्ही कोणताही विचार केलेला नाही. परंतु तुम्ही हे लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही निश्चितपणे यावर विचार करू. अस अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं.

आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे.

सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. इतकेच नव्हे तर आता काँग्रेसदेखील ठाकरेंच्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा ठोकू शकते.

विधानपरिषदेतील सध्याचं संख्याबळ

भाजप : 22

ठाकरे गट : 09

शिवसेना : 02

राष्ट्रवादी काँग्रेस : 09

काँग्रेस : 08

अपक्षइतर : 07

रिक्त जागा : 21

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT