Sanjay Shirsat criticizes Rahul Gandhi ESakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi यांच्याकडून शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण होणं ही दुर्देवी घटना, शिंदे गटाच्या आमदाराची जीभ पुन्हा घसरली!

Sanjay Shirsat on Rahul Gandhi: कोल्हापुरात आज राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यानंतर संजय शिरसाट यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे.

Vrushal Karmarkar

Sanjay Shirsat on Rahul Gandhi: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज शनिवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते. काँग्रेसच्या लाचार लोकांनी आज राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, राहुल गांधी यांनी ठरल्याप्रमाणे आज नौटंकी केली. विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारा एका ड्राईव्हरच्या घरी जेवल्याचे कौतुक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने नेहमीच ही दुटप्पी भूमिका बाळगली. एखाद्या लहान मुलाला उचलायचे. एखाद्या वयोवृद्ध माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा त्याचे दर्शन घ्यायचे. या नौटंकीच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आमच्या महाराजांचे नाव अभिमानाने आणि स्वाभिमानाने घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असेच नाव उच्चारले पाहिजे. यापूर्वीही राहुल गांधी यांना महाराजांचा पुतळा देण्यात आला होता. तेव्हा त्यांनी तो एका हाताने उचलला होता. अशा राहुल गांधीकडून आज महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले ही आमच्यासाठी दुर्देवी घटना आहे. याचा निषेध समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक तयार झाले आहेत. लाचार महाविकास आघाडीला गांधीचे पाय चेपावे लागतात. दिल्लीला जावे लागते. या लाचारांनी हिंदुत्वाचे नाव देखील घेऊ नये.

कोल्हापुरात राहुल गांधी म्हणाले होते की, भाजप शिवाजी महाराजांची विचारधारा मानत नाही. हे लोक 24 तास विचारधारेच्या विरोधात काम करतात. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. आमचा लढा विचारधारेचा आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढली आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. आम्ही त्यांच्या मार्गावर चालत राहू आणि लोकांच्या 'न्याय हक्कासाठी' लढत राहू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT