maharashtra politics shinde deepak kesarkar on shivsena symbol Uddhav Thackeray  Deepak Kesarkar Latest Marathi News
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच, त्यांना फक्त...; चिन्ह गोठवल्यानंतर केसरकरांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं, तसेच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये.अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाही असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट नव्याने एकमेकांसमोर आले आहेत. यानंतर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली.

केसरकर म्हणाले की, निवडूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबईमध्ये खोटी सहानुभूती पाहीजे म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडे म्हणणं मांडलचं नाही ते सारखं तारखा घेत राहीले. जेव्हा निवडूक आयोगाने चिन्ह गोठवलं तेव्हा त्यांचा अर्ज तयार होता. त्यांची चिन्हं तयार होती. त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच. त्यांना फक्त खोटी सहानुभूती घ्यायची होती. आम्हाला धनुष्यबाण बाळासाहेबांबद्दल आभिमान आहे म्हणून आम्ही आता ठरवतोय कुठलं चिन्ह घ्यायचं. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना ते मिळणार अशी आमची अपेक्षा होती आणि आज ना उद्या ते आम्हाला मिळणार कारण आमच्याकडे बहुमत आहे, असे केसरकर म्हणाले.

अडीच वर्षात कोणची भेट घेतली नाही, जेव्हा सत्ता गेली तेव्हा उंभरे झिजवायला सुरूवात केली, यात्रा, ट्विट करायला सुरूवात झाली असे केसरकर म्हणाले. तुम्ही शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं आणि ते पुर्ण केलं नाही त्यामुळे कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे लोक जाणू शकतात असे केसरकर म्हणाले.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ठाकरे गटाने खूप वेळा वेळ मागून घेतला होता. आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं धनुष्यबाण चिन्ह मागणार आहोत. आमच्याकडे जास्त लोकं आहेत. चिन्हं गोठवल्याचं दु:ख त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला आहे. जर त्यांना वाईट वाटत होतं तर त्यांनी नवीन चिन्ह आणि नावं का दिली? आम्ही आजही आमच्या चिन्हांवर आणि पक्षावर ठाम आहोत. आम्ही निवडणूक आयोगाकडून आमचं चिन्हं मागणार आहोत असे केसरकर म्हणाले आहेत.

पुढे काय?

दरम्यान चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम नाही, आगामी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे या प्रकरणी सुनावणी होईल आणि नंतर निर्णय घेण्यात येईल.

या निर्णयाविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीतली एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये जर ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना उमेदवार उभे करायचे असतील, तर ते निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबद्दल सहा महिन्यात आयोगाने निकाल देणं अपेक्षित आहे. आत्ता दोन्ही गटांनी आय़ोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलंय. तोंडी पुरावे काय दिले जातायत, हेही लक्षात घेतलं जाईल. त्यानंतर निवडणूक आयोग निकाल देईल आणि पक्षाचं भवितव्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT