देशभरात सध्या मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला आहे यानंतर काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मागील आठवडाभरापासून देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत होत असून बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मात्र काही दिवासांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
दरम्यान महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची उघडीप राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) आणि मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत महाराक्षतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
सप्टेंबरअखेर देशात ९३४.८ मिलिमीटर (८ टक्यो अधिक) पाऊस झाला, यंदाच्या हंगामात १२ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल आहेता मॉन्सून ३० मे रोजी केरळमध्ये पोहोचाता. जरबी समुद्रातून प्रगती करत ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. तर, २ जुलै रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला.
मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आहे. सह्याद्रीच्या कुशीतील धरणे यंदा ओसंडून वाहिली. राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे कोयना, उजनी आणि जायकवाडी धरणांत 10o टक्के पाणीसाठा असून, सर्वच मोठ्या परणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी जमा झाले आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील बारही विभागांत पावसाने सरासरी ओलांडती आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक ३९ टक्के पाऊस झाला आहे तर कोकण- गोवा विभागात २९ टक्के अधिक, मराठवाडयात २० टक्के अधिक, तर विदर्भात १७ टक्के अधिक पाऊस आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाची आकडेवारी भरून आली असती तरी पावसाचे असमान वितरण मात्र यंदाही पाहायला मिळाले.
८८ धंदा चांगले मॉन्सून वार्ष होते मध्य मारतासह देशभरात चांगला पाऊस ज्ञाता हंगामात एक-निनो स्थिती निवळल्यानंतर प्रकांत महासागरात तटस्य स्थिती असून, 'हा-निना' स्थिती तयार झाली नाही. इंडियन ओशन हायपोत सामान्य स्थिीित राहिता ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, महाराष्ट्रतही अधिक पावसाचे संकेत आहेत. - डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान शास्त्र विभाग
राज्यातील जिल्हानिहाय पठलेल्या पावसाची स्थिती विचारात घेता यंदा मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वांगले असाल्याचे दिसून आले. नगर जिल्ह्यात सर्वाधिक (४९ टक्के अधिक) पाऊस झाला. सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगती या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाठसाची नोंद झाली. तर मराठ्यासातील हिंगोली जिल्ह्यात हंगामाच्या सुरुवातीपासूरव पावसात टूट असल्याचे दिसून आहे. ३० सप्टेंबर अखेर हिंगोली जिल्ह्यात ४८९.९ मिलिमीटर म्हणजेच उणे ३५ टक्के पाऊस झाला तर अमरावती जिल्लातही पावसात उणे २ टक्क्यांची तूट दिसून आली.
यंदाच्या मॉन्सूल हंगामात (जून ते सप्टेंबर) पाऊस दमदार बरसला मात्र संपूर्ण हंगामात पातसाचे वितरण असमान होते. मॉन्सूनचे वेळेआधी आगमन झाल्यानंतर जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तर जुलै महिन्यात धुवाधार बरसल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील अखेरच्या टप्प्यात दमदार पाऊस कोसळला, सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात १२५२.१ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा २६ टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्यष्ट केले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनव्या पावसाचा हंगाम मानला जातो. या कालावधीत राज्यात दीर्घकालीन सरासरीनुसार १९९४.५ पाऊस पडतो. यंदा राज्यात तब्बल १२५२.१ मिलिमीटर (२६ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली. गत वर्षी राज्यात ९६५.७ मिलिमीटर (१७ टक्के) म्हणजेच ३ टक्के कमी पाऊस झाला होता. गतवर्षी पावसाने चिंता वाढवली होती. मात्र यंदा बारही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.