Latest Rain Update Maharashtra : महाराष्ट्रावरील उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, मध्य भागावर १००४ हेप्टापास्कल व दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब उद्या (ता. १२) पर्यंत राहील. मंगळवार (ता.१३) पासून पुढे उत्तरेकडील भागावर १००४ व दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्याचा थेट परिणाम पावसाच्या प्रमाणावर होऊन काही काळ उघडीप, तर हलक्या पावसाची शक्यता राहील.
पावसाचे प्रमाण कमी होऊन पावसात उघडिपीचे प्रमाण अधिक राहील. कमाल तापमानात ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, वाशीम, सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २१ किमीपेक्षा अधिक राहील. पावसाच्या प्रमाणात घट होईल.
कमाल तापमानात ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल. ही हवामान स्थिती पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल. मात्र किडींचा प्रादुर्भाव वाढण्यास ही स्थिती अत्यंत अनुकूल ठरेल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून सर्वच जिल्ह्यांत राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत मध्यम, तर कोकणात विस्तृत स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १४ ते २२ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘ला-निना’च्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्याचे तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे विषुववृत्तीय भागातील तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्याचाही फायदा पावसाचे प्रमाण वाढण्यासाठी होईल.
आज व उद्या (ता.११,१२) प्रतिदिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३९ मिमी, रायगड जिल्ह्यात ३९ मिमी, ठाणे जिल्ह्यात ३८ मिमी व पालघर जिल्ह्यात २८ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ८ ते ९ किमी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ताशी १५ किमी, तर पालघर जिल्ह्यात ताशी २१ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के राहील.
आज व उद्या (ता.११,१२) नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ मिमी, तर नंदूरबार जिल्ह्यात ८ किमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात २१ किमी, नंदूरबार जिल्ह्यात ताशी २५ किमी, नाशिक व धुळे जिल्ह्यांत ताशी २६ ते २८ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कमाल तापमान नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ८९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७४ टक्के राहील.
आज व उद्या (ता.११,१२) बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत प्रतिदिनी २ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत प्रतिदिनी १ मिमी इतक्या अल्प पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. कमाल तापमान बीड जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर जालना व लातूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मात्र अधूनमधून सूर्यप्रकाश राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६० टक्के इतकी कमी राहील.
आज व उद्या (ता.११,१२) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपात राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १८ ते २० कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. या आठवड्यात पावसाची उघडीप आणि चांगल्या सूर्यप्रकाशाची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ८९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६४ टक्के राहील.
आज व उद्या (ता.११,१२) यवतमाळ जिल्ह्यात ५ मि.मी., वर्धा जिल्ह्यात ६ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १० मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १६ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७१ टक्के इतकी कमी राहील.
आज व उद्या (ता.११,१२) गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत विस्तृत स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता आहे. प्रतिदिन गोंदिया जिल्ह्यात २२ मि.मी., तर गडचिरोली जिल्ह्यात १५ मि.मी., भंडारा जिल्ह्यात ७ मि.मी. व चंद्रपूर जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली जिल्ह्यात ७ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी १२ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.
सर्वच जिल्ह्यांत आज व उद्या (ता.११,१२) पावसाचे प्रमाण अल्प राहील. सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाची उघडीप राहणे शक्य आहे. सांगली व नगर जिल्ह्यांत प्रतिदिनी १ मि.मी. व सातारा जिल्ह्यात २ मि.मी., तर कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २१ ते २६ किमी, तर कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ताशी १४ ते १७ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ७६ टक्के राहील.
- वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वेलींना आधार देण्यासाठी मंडप तयार करावा.
- तुरीचा फुटवा वाढविण्यासाठी ३५ व ५५ दिवसांनी शेंडा खुडणी करावी.
- विविध पिकांमध्ये कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतींचा अवलंब करावा.
- भात खाचरात पाणी पातळी २.५ सेंमी ते ५ सेंमी ठेवावी.
- कुक्कुटपालन शेडमध्ये योग्य वायुविजन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.