IMD weather alert  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात 'या' जिल्ह्यात मुसळधार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

रोहित कणसे

देशासह राज्यात मागील तीन दिवसांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यादरम्यान राज्यात येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात गणपती उत्सवादरम्यान पाऊस हजेरी लावणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचे आगमन झाले होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाण्यासह नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे राज्यातील शेतकरी काही प्रणाणात सुखावला आहे.

दरम्यान हवामान तज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये २१ सप्टेंबरपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, राज्यात अंतर्गत जिल्ह्यांमध्ये ह्या येत्या ४,५ दिवसांत पिवळ्या इशाऱ्याने दर्शविल्या गेलेल्या तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास राज्यातील पीकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT