Maharashtra rain, weather live update: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली महाराष्ट्राकडे आल्याने राज्यात पावसाने तडाखा दिला आहे. मंगळवार (ता. २७)पासून सूरू असलेल्या मुसळधार वादळी पावसाने मराठवाड्यासह विदर्भात अक्षरशः हाहाकार उडवून दिला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मंगळवारी मराठवाड्यात पावसामुळे 13 जणांचा बळी गेला आहे. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकासान झालेय. बुधवारीही (ता. २८) अनेक जिल्ह्यांत पावसाचा दणका सुरूच होता.आजही (बुधवारी) राज्यातील जवळपास 17 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात कुठे पाऊस कोसळणार, कुठे काय परिस्थिती आहे.. या सर्व घडामोडीचा आढावा आजच्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत...
NASHIK : पालकमंत्री भुजबळ यांनी केली गोदावरीच्या पुराची पाहणी
नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुरस्थितीबद्दल आढावा घेतल्यावर पत्रकारांशी साधलेला संवाद. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची व त्यावर उपययोजनांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी भुजबळ आणि कांदे यांच्यातील वादाला त्यांनी कलाटणी दिली.
उस्मानाबाद : पावसामुळे तुरोरी परिसरात सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान
तुरोरी (जि.उस्मानाबाद) : तुरोरीसह परिसरात गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीला पाणी लागल्याने तुरीही हाताच्या जाणार आहेत. तसेच वाऱ्यामुळे ऊस आडवा झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. ( व्हिडिओ - बालाजी माणिकवार)
पंचनामे करून भरपाई द्या
औरंगाबाद : खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहेत पालेभाज्या सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी किसान सेना चे जिल्हा उपसंघटक नानासाहेब पळसकर यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
( व्हिडिओ: प्रकाश बनकर)
नांदेड जिल्ह्य़ात पुराच्या पाण्यात उतरून शेतकर्यांची शासनाकडे मदतीची मागणी
बरडशेवाळा (जि. नांदेड) : पिंपरखेड महसूल मंडळातील चेंडकापुर शेतशिवारात कयाधु नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली असल्याने दोन दिवसांपासून चेडकांपुर बरडशेवाळा संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात उतरून शेतकऱ्यांची शासनाकडे तात्काळ मदत करण्याची मागणी करीत आहेत.
(Video - प्रभाकर दहीभाते)
तेरणा नदीवरील मदनसुरी, लिंबाळा, नदी हत्तरगा बॅरिजवरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला
मदनसुरी (जि.लातूर) : माकणी (ता.लोहार) येथील निम्न तेरणा धरणाच्या पाण्याचा मोठा विसर्ग तेरणा नदीला होत असल्याने तेरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पाण्यामुळे निलंगा तालुक्यातील नदी काठच्या जेवरी, सांगवी, मदनसुरी, रामतीर्थ, कोकळगाव, धानोरा, लिंबाळा,येलमावडी,नदी हत्तरगा या गावातील जवळपास चार ते पाच हजार हेक्टर वरील खरीप पीकाचे नुकसान झाले.
येलदरी धरणातून एक लाख ५६१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
जिंतूर (जि.परभणी) : येलदरी धरणाचे बुधवारी सकाळी काही दरवाजे दोन व तीन मीटर उघडून वीजनिर्मितीसह एक लाख तीन हजार २६१.५० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. ऊर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात सोडलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात होणारी आवक यामुळे येलदरी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने मंगळवारी (ता.२८) संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास धरणातून एकूण ५३,६३६.७६ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. (व्हिडिओ - राजाभाऊ नगरकर
Nashik : गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर
DSCRPN - नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्यात गोदाकाठची दुकाने हलवली जात आहेत; पुराच्या पाण्याची पातळी अजून वाढणार असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्क केले जात आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि शासकीय यंत्रणेकडून ई पीक पहाणी करावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे युवा अध्यक्ष मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.(व्हिडीओ : नवनाथ इधाटे, फुलंब्री)
कांद्याच्या शेतात पाणीच पाणी, बळीराज्याच्या या अवस्थेला जबाबदार कोण?
Rain Updates Nanded : विष्णुपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, पाहा सविस्तर
उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होणार, मुंबई वेधशाळेनं व्यक्त केला अंदाज. मराठवाड्यात पसामुळं दाणादाण. मुंबई,कोकणातही मुसळधार पाऊस.
खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून
वाळूज (जि.औरंगाबाद) : खाम नदीला दोन दिवसांपासून पूर आला आहे. त्यामुळे पंढरपूर-वळदगावचा संपर्क तुटला. परिणामी नागरिकांना व वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगारांना कामावर ये-जा करण्यास मोठी दिक्कत होत आहे. नदीत पुराच्या पाण्यात वाळूज औद्योगिक वसाहतीतील एक कामगार दुचाकीसह आज बुधवारी (ता.29) सकाळी आठ वाजेच्या सुमारास वाहून गेला. (व्हिडिओ - रामराव भराड)
शेतकर्यांना दूध आणण्यासाठी नदी पोहून जावे लागते
पाटोदा (जि.बीड) : पाटोदा तालुक्यातील अनपट वाडी येथे नदीवर पूल नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सकाळी दूध आणण्यासाठी मांजरा नदीतून पोहून जावे लागत आहे.
Video - सुधीर एकबोटे
लोअर दूधना प्रकल्प धरणाचे चौदा दरवाजे उघडले
सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील लोअर दूधना प्रकल्प धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून पाण्याची आवक बघता बुधवारी ( ता.२९) प्रकल्पाचे द्वार क्र.१, २ , ३, ४, ५, ६, ७ व १४, १५, १६, १७, १८, १९, २० हे चौदा दरवाजे उचलून ३०,३२४ क्यूसेक्सने दूधना नदी पात्रात विसर्ग बुधवारी सकाळी साडेसात वाजता सोडण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Video : विलास शिंदे
औरंगाबाद - खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील एक कामगार दुचाकीसह आज सकाळ वाहून गेला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सांगली ढगाळ वातावरण असून अद्याप पाऊस नाही. कोल्हापुरात अगदी तुरळक पाऊस आहे.
लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर, पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचं रेक्स्यू ऑपरेशन
लातूर हेलिकॉप्टरमधून कुटुंबियांना एअर लिफ्ट करून वाचवलं NDRF टीमने
निलंगा तालुक्यात दवंडीद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
निलंगा (जि.लातूर) : नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून दवंडीद्वारे माहीती देण्यात आली आहे. (Video : राम काळगे)
लातूर : औराद शहाजनी येथील लातूर-बिदर रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तुर्भे : नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण मंगळवारी ओव्हर फ्लो झाले आहे. धरणातील सध्याची पाण्याची पातळी ८८ मीटर इतकी असून धरणाचे दोन्ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.