मुंबई : राज्यातील आजच्या नव्या कोरोना (Corona) बाधितांच्या आकडेवारीने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढवली असून, गेल्या 24 तासांत 2,701 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याने चिंतेत भर पडली असून, एकट्या मुंबईत 1,765 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. तर, दुसरीकडे आज राज्यात 1,327 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आज राज्यात एकाही कोरोना मृत्युची नोंद करण्यात आलेली नाही. (Maharashtra Corona Update)
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.02 टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 9,806 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक सक्रिय रूग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरोनाचे 7,000 सक्रिय रूग्ण असून, ठाण्यात कोरोनाचे 1,482 इतके सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
देशातील बाधितांच्या संख्येतही वाढ
दरम्यान, राज्यासह देशाती आकडेवारीतही मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 5, 233 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. सध्या देशात 28,857 इतक्या कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.