मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 28 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,542 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,449 इतकी आहे.
नवीन बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली झाली. आज 2294 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,77,872 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 1823 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,01,287 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.
नागपूर, लातूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 9, नाशिक 3, पुणे 10, कोल्हापूर 3, औरंगाबाद 1, लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,41,892 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.