SSC 10th Result 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

SSC Result 2023 : दहावीचा निकाल घसरला, ९३.८३ टक्के विद्यार्थी यशवंत; तुमच्या विभागाचा निकाल किती?

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांपैकी ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागातील ९८.११ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नागपूर विभागाचा ९२.०५टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.

राज्य मंडळातर्फे घेतलेल्या या परीक्षेसाठी १५ लाख ४१ हजार ६६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १०वी निकालात तब्बल ३.११ टक्क्यांनी घट झाली आहे.

सर्व विभागीय मंडळातून ९५.८७ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ९२.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ३.८२ टक्क्यांनी जास्त आहे.

राज्यात ३६ हजार ६४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१ हजार २१६ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ७४.२५ आहे.

निकालाची वैशिष्ट्ये: (SSC Result 2023)

- ९२.४९ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण

- परीक्षा माध्यमे : ०८

- एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात प्रश्नपत्रिका नेणाऱ्या रनरचे जीपीएस झाले ट्रॅकिंग

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी

पुणे : ९५.६४ टक्के

नागपूर : ९२.०५टक्के

औरंगाबाद : ९३.२३ टक्के

मुंबई : ९३.६६ टक्के

कोल्हापूर : ९६.७३ टक्के

अमरावती : ९३.२२ टक्के

नाशिक : ९२.२२ टक्के

लातूर : ९२.६७ टक्के

कोकण : ९८.११टक्के

गेल्या काही वर्षातील एकूण निकालाची टक्केवारी :

वर्ष : उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी

२०२३ : ९३.८६ टक्के

२०२२ : ९६.९४ टक्के

२०२१ : ९९.९५ टक्के

२०२० : ९५.३० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT